11th Admission 2025 Self Declaration Minority sports quota Declaration Form PDF
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
उद्यापासून म्हणजेच २६ मे २०२५ पासून अधिकारिक ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. ( 11th Admission registration)
आपण याआधी १९ व २० मे रोजी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि PART 1 फॉर्म भरायचा सराव केला आहे.
परंतु, ती फक्त प्रॅक्टिस होती.
🎯11th Admission 2025 Self Declaration Minority sports quota Declaration Form PDF
🛑 आता काय करायचं?
1. प्रॅक्टिससाठी वापरलेला Login ID व Password काम करणार नाही.
2. नवीन Registration ID व Password तयार करून लॉगिन करावे लागेल.
📌 लॉगिन केल्यानंतर काय करायचं? 11th Admission Part 1
लॉगिन केल्यानंतर आपल्याला आपली संपूर्ण माहिती भरायची आहे तसेच पार्ट १ ( 11th Admission part 1) भरायचा आहे पार्ट वन मध्ये आपला संपूर्ण पत्ता आणि इतर माहिती अपलोड करायची आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा पार्ट वन मध्ये जो असतो तो असतो डॉक्युमेंट अपलोड करणे.
सध्या तुमच्याकडे मार्कशीट आणि लिंक सर्टिफिकेट नाहीये काळजी करू नका दोन्ही नसतील तरी चालेल तुम्हाला त्याऐवजी सेल्फ डिक्लेरेशन हा फॉर्म अपलोड करायचा आहे. लक्षात घ्या तुमच्याकडे मार्कशीट ,लिविंग सर्टिफिकेट, जातीच्या दाखला ,नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट किंवा इतर कुठले डॉक्युमेंट नसतील परंतु तुम्हाला परंतु भविष्यात तुम्ही ते डॉक्युमेंट काढणार आहात आणि ऍडमिशन च्या वेळेस ते तुम्हाला मिळणार आहेत तर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन मध्ये तसे टिक करून ते सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचे आहे.
🎯 लक्षात घ्या
जर तुम्ही कास्ट मधून फॉर्म भरत असाल आणि तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तुमचेही नसेल आणि वडिलांचे नसेल तर तुम्हाला ओपन मधून फॉर्म भरावा लागेल आणि जर तुमचे कास्ट सर्टिफिकेट प्रोसेस मध्ये असेल आणि ॲडमिशनच्या वेळेस ते तुम्हाला मिळणार असेल तर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्ममध्ये एस करून ते अपलोड करायचा आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तेव्हा ते तुम्हाला सबमिट करावे लागेल.
🔷 Self Declaration Form म्हणजे काय?
तुम्ही कोणती कागदपत्रे आत्ता अपलोड करत आहात आणि कोणती पुढे Admission च्या वेळी करणार आहात, याची माहिती त्यात असते.
तो फॉर्म भरून स्कॅन करून अपलोड करायचा आहे.
विशेष सूचना:
जर तुम्ही खालील कोट्यांतून अर्ज करत असाल, तर खालील डिक्लरेशन फॉर्म्स आवश्यक आहेत:
1. मायनॉरिटी कोटा – Minority Declaration Form
2. Sports कोटा – Sports Declaration Form
🎯 वरील सर्व फॉर्म्स डाउनलोड करण्यासाठी खालील "Download" बटनावर क्लिक करा.
सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि वेळेत Registration पूर्ण करावे.