Type Here to Get Search Results !

इ.११ वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया वेळापत्रकात परत बदल २०२५ २६ | 11th Admission Timetable changed 2025

 इ.११ वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया वेळापत्रकात परत बदल २०२५ २६ | 11th Admission Timetable changed 2025

दिनांक १९ मे, २०२५ रोजी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रणालीचा विद्यार्थी व पालक यांचेसाठी सराव करणेकरीता पोर्टल सुरु करण्यात आले होते. सराव करतेवेळी राज्यातील पालक, विद्यार्थी तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी व शिक्षणतज्ञ यांच्या अमूल्य सूचना प्राप्त झाल्या आहेत. सदरील सूचनांचा अंतरभाव ऑनलाईन प्रवेश प्रणालीमध्ये करण्यासाठी संबंधित तांत्रिक बदल करणेबाबत सूचित केले आहे.



🛑 महत्वाचे

विद्यार्थ्यांनी केलेल्या सूचना वेबसाईटवर असलेले काही त्रुटी आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी न केलेले रजिस्ट्रेशन यामुळे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून पूर्वीचे वेळापत्रक रद्द करण्यात आले आहे. 

नवीन रजिस्ट्रेशन आणि पार्ट 1 आणि पसंती क्रम भरण्यासाठी दिनांक 26 मे 2025 पासून विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन पार्ट 1 आणि पसंती क्रम देता येईल . 




📌 नवीन वेळापत्रक PDF याच पोस्टवर दिले जाणार आहे त्यामुळे ही पोस्ट सेव करून ठेवा.



11th Admission new Timetable Maharashtra 2025

यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार फेरी क्रमांक १ चे सविस्तर दिनांक १९ मे २०२५ ते १३ जून २०२५ दरम्यानचे विद्यार्थी नोंदणी, प्राधान्यक्रम व उच्च माध्यमिक विद्यालयांची अलॉटमेंट इत्यादी बाबींच्या दिनांक जाहीर केल्या होत्या. दिनांक २१ मे २०२५ रोजी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेत स्थळाबाबत तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळ योग्य प्रकारे विद्यार्थी नोंदणी व प्राध्यान्यक्रम कामकाज पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी यापुढे विद्यार्थी हित लक्षात घेता व तांत्रिक बाबीची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, या बाबी लक्षात घेता इ.११ वी प्रवेश प्रक्रियेचे सुधारीत वेळापत्रक दिनांक २६ मे, २०२५ पासून विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन पार्ट वन आणि पसंतीक्रम  देता येईल.


🎯११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी कॉलेज कसे सर्च करावे ? 


🎯 ११वी मागिल वर्षीच्या सर्व कॉलेजेस ची CutOff डाऊनलोड करा


पोर्टलवर अर्ज भरण्याची सुरुवात विलंबाने होत असले तरी विद्याव्यांना अर्ज भरण्यास व पसंतीक्रम नोंदविण्यास पुरेसा कालावधी देण्यात येईल. प्रवेशाचे पोर्टल परिपूर्ण व उत्कृष्ट स्वरुपात उपलब्ध झालेले असेल. कोणतीही छोटयात छोटी त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रवेशाचे पोर्टल सुरु होण्याची वेळ ऑनलाईन दर्शविण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना ई-मेल व मोबाईल संदेशाव्दारे कळविण्यात येईल. त्रुटीसह अर्ज भरण्याचे सुविधा देण्याऐवजी पोर्टल सुलभ व त्रुटीरहित करून सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना अर्ज भरणे सोईचे व सुलभ व्हावे व एकंदर प्रवेशाची कार्यवाही कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ व उचित सोयी-सुविधा, मार्गदर्शन विद्याथी व पालकांना पुरविले जाईल तरी कोणीही गोंधळून जाऊ नये. या बाबीची व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी. ही विनंती.




🎯 अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया साठी ऑफिशियल वेबसाईट ई-मेल ऍड्रेस आणि हेल्पलाइन नंबर.

  • अधिकृत संकेतस्थळ-https://mahafyjcadmissions.in
  • ई-मेल आयडी support@mahafyjcadmissions.in
  • हेल्पलाईन नंबर ८५३०९५५५६४.

📌 ११ वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया महत्वाचे


  1.  विद्यार्थी मित्रांनो आज अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी खालील वेबसाईटवर डेमो रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे
  2. लक्षात घ्या डेमो रजिस्ट्रेशन हे फक्त तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे


  • लक्षात घ्या आज १९ आणि उद्या २० मे फक्त डेमो रजिस्ट्रेशन होणार आहे . 
  • दिनांक 21 मे 2025 पासून खरे रजिस्ट्रेशन सुरू होणार होते परंतु काही तांत्रिक अडचणी आणि  विद्यार्थ्यांनी डेमो रजिस्ट्रेशन मध्ये भाग न घेतल्यामुळे आणि वेबसाईटवर जास्त ट्रॅफिक आल्यामुळे वेबसाईट हँग होत असल्यामुळे लवकरच 22 मे 2025 रोजी दुपारी तीन वाजता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
  • ज्यांनी डेमो रजिस्ट्रेशन केले आहे ज्यांनी डेमो रजिस्ट्रेशन केले नाही अशा सर्वांना परत आपले खरे रजिस्ट्रेशन करायचे आहे.
  • रजिस्ट्रेशन करण्यासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड परत जनरेट करायचा आहे .
  • कारण डेमो रजिस्ट्रेशन ज्यांनी केले आहे ते सर्व डिलीट होणार आहे व परत आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे 

📌 रजिस्ट्रेशन करते वेळेस ..

  • रजिस्ट्रेशन करते वेळेस चालू मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस लागणार आहे 
  • रजिस्ट्रेशन या टॅब वर क्लिक केल्यानंतर  आपल्याला एप्लीकेशन आयडी मिळणार आहे तो जपून ठेवायचा आहे 
  • एप्लीकेशन आयडी आणि जो तुम्ही पासवर्ड तयार केलेला आहे तो वापरून लॉगिन करायचे आहे 

📌 नंतर पार्ट 1 भरायचा आहे !

  • पार्ट 1 मध्ये आपल्याला आपली संपूर्ण माहिती, पत्ता ,आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत 

📌 डॉक्युमेंट काय लागणार आहेत ?

  • आपल्याला लिविंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट आपल्याला मिळालेली नाही त्यामुळे घाबरू नका मार्कशीट आणि लिविंग सर्टिफिकेट आपल्याला लागणार नाही ते अपलोड केले नाही तरी चालेल. 
  • फक्त तुम्ही जर कास्ट मधून फॉर्म भरत असाल तर तुमचे किंवा तुमच्या वडिलांचे कास्ट सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करावे लागेल 
  • त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन फीस १०० रुपये ऑनलाइन भरायचे आहे 
  • सर्वात शेवटी आपल्याला आपला फॉर्म व्हेरिफाय करायचा आहे 
  • जर तुम्ही ओपन मधून फॉर्म भरला असाल तर तुमचा फॉर्म ऑटो व्हेरिफाय झालेला असेल आणि जर तुम्ही कास्ट मधून फॉर्म भरला असेल तर तुमचा फॉर्म तुमच्या शाळेतून किंवा गायडन्स सेंटर मधून वेरिफाय करून घ्यायचा आहे. 
  • त्यानंतर आपला फॉर्म लॉक करायचा आहे.*
  • एकदा का फॉर्म लॉक केला की आपले काम झाले !

📌 कॉलेज प्रेफरन्स भरणे - पार्ट 2 भरणे!

  • पाठवण भरल्यानंतर व्हेरिफाय केल्यानंतर दुसरी स्टेप आपल्याला आपले कॉलेजची प्रेफरन्स टाकायचे आहे 
  • आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील कॉलेज सर्च कसे करायचे याची सविस्तर माहिती या पोस्टमध्ये दिलेली आहे 
  • सध्या तरी कॉलेज प्रेफरन्स म्हणजे पार्ट २ सुरुवात झालेल्या नाही लवकरच सुरू होईल. 
  •  पार्ट टू सुरू झाल्यावर त्यावर लगेच माहिती ग्रुप वर दिली जाईल. 
  • कॉलेज प्रेफरन्स कसे निवडावे , कॉलेज कसे सर्च करावे याची सविस्तर माहिती ग्रुप वर दिली जाणार आहे

🛑 अधिक माहिती साठी आमच्या आमच्या wahtasapp चॅनेल ला जाऊन व्हा 

https://chat.whatsapp.com/CK6dAEvvy5LFJj4WFoOTuT
➖➖➖➖➖➖➖➖➖➖


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad