Type Here to Get Search Results !

११वी प्रवेशप्रक्रिया - पार्ट १ पार्ट २ भरल्यानंतर काय करावे ? 11 th Admission After Part 2 Procedure 2025

११वी प्रवेशप्रक्रिया - पार्ट १ पार्ट २ भरल्यानंतर काय करावे ?  11 th Admission After Part 2 Procedure 2025


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

११वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (11th Admission process Maharashtra)  ही २६ मे २०२५ पासून सुरू झाली असून ३ जून २०२५ पर्यंत आपल्याला आपले रजिस्ट्रेशन आणि पार्ट वन आणि कॉलेज प्रेफरन्स भरायचे आहेत.

पार्ट १ पार्ट २ भरल्यानंतर काय करावे ?  व्हिडिओ बघा 👇

➡️ https://youtu.be/y66fNEKdius


विद्यार्थी मित्रांनो, (11th Admission Part 1 Part 2) पार्ट १ आणि पार्ट २ भरल्यानंतर आपल्याला काय करायचे? कॉलेज आपल्याला कसे मिळणार? आपल्याला कोणते कॉलेज मिळाले हे कसे चेक करावे ? आणि कॉलेज मिळाल्यानंतर आपल्याला काय प्रक्रिया करायची आहे, याची सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत.


♎ आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा 


 

इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक २०२५ | 11th admission time table 2025




📌 ११वी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण माहिती (toc)

📌 इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक २०२५ | 11th admission time table 2025

1️⃣ कॉलेज रजिस्ट्रेशन आणि प्रेफरन्स निवडणे 

दिनांक २६ मे ते ३ जून २०२५ पर्यंत आपल्याला आपले पार्ट वन आणि पार्ट टू भरून लॉक करायचा आहे.

लक्षात ठेवा, पार्ट टू लॉक केल्याशिवाय आपल्याला कॉलेज अलर्ट होणार नाही त्यामुळे आपला फॉर्म लॉक झाला आहे याची खात्री करा, त्यामुळे फॉर्म लॉक करणे अत्यावश्यक आहे.


➡️ "Click here to read the complete information in English."


विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी

  1. बऱ्याच विद्यार्थ्यांना पार्ट वन भरताना अडचणी येत आहेत.
  2. काहींचे पेमेंट झाले असूनही "Pending" दाखवत आहे.
  3. काहींना पार्ट टू ऑप्शन दिसत नाही.
  4. अनेकांना प्रेफरन्स कसे टाकावे हे माहीत नाही.

मित्रांनो ह्या ज्या काही अडचणी आहेत ह्या आपल्या ऑफिशियल वेबसाईट वर जास्त लोड आल्यामुळे येत आहेत आपल्याला तीन जून पर्यंत वेळ आहे त्यामुळे फॉर्म रजिस्ट्रेशन पाठवा आणि पाठव भरण्याची घाई करू नका.


2️⃣ तात्पुरती गुणवत्ता यादी (५ जून २०२५)

  • तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणजे महाराष्ट्रातील सर्व कॉलेजमध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी.
  • यात आपण भरलेली माहिती तपासायची असते.
  • काही चूक असल्यास ती ६ आणि ७ जून रोजी दुरुस्त करावी.
  • तात्पुरती गुणवत्ता यादी डाऊनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवरील provisional merit list या टॅब वर क्लिक करा.



3️⃣ अंतिम गुणवत्ता यादी (८ जून २०२५)

  • अंतिम गुणवत्ता यादी ही विद्यार्थ्यांच्या गुणांच्या उतरत्या क्रमाने तयार केली जाते.
  • यामध्ये आपण महाराष्ट्रात किती क्रमांकावर आहोत हे समजते.
  • फक्त आपली माहिती तपासून खात्री करावी.
  • अंतिम गुणवत्ता यादी डाऊनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवरील Final merit list या टॅब वर क्लिक करा.


4️⃣ शून्य फेरी — कोटा अंतर्गत प्रवेश (९ जून २०२५)

  1. ज्या विद्यार्थ्यांनी कोटा अंतर्गत अर्ज केले होते त्यांची यादी लागणार आहे.
  2. अशा विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले असल्यास "Process to Admission" वर क्लिक करावे.
  3. कॉलेज नको असल्यास काहीही कोठेही क्लिक करू नये — तुम्ही दुसऱ्या फेरीसाठी पात्र राहाल.


5️⃣ पहिल्या फेरीचा निकाल / College Allotment List Declare date (१० जून २०२५)

  • १० जून रोजी तुम्हाला कुठले कॉलेज मिळाले आहे हे आपल्या लॉगिनवर दिसेल.
  • कॉलेज मिळाले असल्यास १८ जून २०२५ पर्यंत ऍडमिशन कन्फर्म करायचे आहे.


6️⃣ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तारीख 

मिळालेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन आपल्याला १० जून ते १८ जून २०२५ पर्यंत करून घ्यायचे आहे. 




🎯 मला ११ वी साठी कोणते कॉलेज मिळाले आहे ? कसे तपासावे?

  1.  लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाका.
  2.  Check Allotment Status टॅब वर क्लिक करा.
  3.  कॉलेज मिळाले असल्यास दिसेल.
  4.  जर पसंतीचे कॉलेज मिळाले असेल तर Process to Admission वर क्लिक करा.
  5.  डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  6. ११ ते १८ जून दरम्यान कॉलेजमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंटसह हजर राहून प्रवेश घ्या.


🔷 कॉलेज अलॉट झाल्यानंतर पुढील प्रक्रिया

१. आपल्या पसंतीचे कॉलेज मिळाल्यास काय करावे?

जर तुम्हाला आपल्या पसंतीचे कॉलेज मिळाले असेल, तर पुढील प्रक्रिया अशाप्रकारे करा:

  • आपल्या लॉगिनमध्ये जाऊन "Process to Admission" या टॅबवर क्लिक करा.
  • त्यामुळे तुमचा ऍडमिशन फॉर्म संबंधित कॉलेजकडे ऑनलाईन पाठवला जाईल.
  • जर काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे बाकी असतील, तर ते अपलोड करा.
  • त्यानंतर ११ जून ते १८ जून २०२५ या कालावधीत संबंधित कॉलेजमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहा आणि ऍडमिशन पूर्ण करा.



२. जर तुम्हाला अलॉट झालेले कॉलेज नको असेल तर काय करावे?

  • जर मिळालेले कॉलेज आपल्या पसंतीचे नसेल, आणि तिथे ऍडमिशन घ्यायचे नसेल, तर "Process to Admission" या टॅबवर क्लिक करू नका.
  • काहीही इतर कारवाई करू नका.
  • जेव्हा दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू होईल, तेव्हा:
    • आपला फॉर्म अनलॉक करा,
    • नवीन प्रेफरन्स निवडा,
    • आणि पुन्हा फॉर्म लॉक करा.
  • अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्या फेरीसाठी भाग घेऊ शकता.

महत्त्वाची सूचना — प्रथम पसंतीबाबत लक्षात ठेवा

  • जर तुम्हाला प्रथम पसंतीचे कॉलेज मिळाले असेल, तर त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणे आवश्यक व बंधनकारक आहे.
  • जर तुम्ही प्रथम पसंतीचे कॉलेज नाकारले, तर दुसऱ्या व पुढील सर्व फेरीसाठी पात्र राहणार नाहीत. एकूण चार फेऱ्या होत असतात. अशा विद्यार्थ्यांना पाचव्या फेरीसाठी प्रवेश दिला जातो.
  • मात्र, जर तुम्हाला दुसऱ्या ते दहाव्या क्रमांकातील (पसंतीच्या) कॉलेजपैकी एखादे मिळाले असेल आणि तिथे ऍडमिशन घ्यायचे नसेल, तर:
    • "Process to Admission" वर क्लिक करू नका,
    • आणि दुसऱ्या फेरीत भाग घेण्यासाठी फॉर्म अनलॉक करून प्रेफरन्स बदल करा, व पुन्हा फॉर्म लॉक करा.


दुसऱ्या किंवा त्यापुढील प्रेफरन्सचे पसंतीचे कॉलेज नको असल्यास?

चुकूनही Process to Admission वर क्लिक करू नका.बाकी काहीही करायचे नाही.दुसऱ्या फेरीसाठी फॉर्म अनलॉक करा आणि नवीन प्रेफरन्स भरा.


रिक्त जागांचा तपशील (२० जून २०२५)

प्रत्येक कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत याचा तपशील वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल.

यादी डाऊनलोड करून अंदाज घेता येतो.


११ वी प्रवेशा संदर्भात विद्यार्थ्यांना पडणारे काही सामान्य प्रश्न !


प्रश्न: मला कोणते कॉलेज मिळाले हे कसे तपासावे?

उत्तर: लॉगिन करा → Check Allotment Status → कॉलेज दिसेल → Process to Admission क्लिक करा


प्रश्न: स्ट्रीम (Science to Commerce) बदलता येईल का?

उत्तर: पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या फेरीमध्ये स्ट्रीम आणि प्रेफरन्स बदलता येतील.


प्रश्न: दुसऱ्या फेरीत परत फी भरावी लागते का?

उत्तर: नाही, दुसऱ्या फेरीत कोणतीही फी भरावी लागत नाही.


प्रश्न: मी रजिस्ट्रेशन नाही केले नाही आणि पार्ट 1 आणि पार्ट 2 ही भरला नाही तर मला आता भाग घेतला नाही तर?

उत्तर: दुसऱ्या राउंडसाठी रजिस्ट्रेशन करून भाग घेता येतो.


प्रश्न: फर्स्ट राउंडमध्ये भाग घेतला नाही तर?

उत्तर: दुसऱ्या राउंडसाठी रजिस्ट्रेशन करून भाग घेता येतो.


प्रश्न: मला मिळालेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असल्यास?

उत्तर: Process to Admission क्लिक करा, Allotment letter प्रिंट काढा ,  उर्वरित डॉक्युमेंट अपलोड करा आणि दिलेल्या वेळेत कॉलेजमध्ये हजर राहा.


प्रश्न: मला मिळालेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे नसेल तर?

उत्तर: Process to Admission क्लिक करू नका, बाकी काहीही क्लिक करू नका.दुसऱ्या फेरीसाठी फॉर्म अनलॉक करून प्रेफरन्स बदला आणि पुन्हा लॉक करा.


प्रश्न: चुकून Process to Admission क्लिक केल्यास?

उत्तर: कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन रद्द करा. परंतु दुसऱ्या फेरीसाठी अपात्र असाल आणि तिसऱ्या फेरीमध्ये भाग घेऊ शकता.हे फक्त दुसऱ्या ते दहाव्या पसंतीसाठी लागू.प्रथम पसंतीसाठी कॅन्सल केल्यास पुढील तिन्ही फेरीसाठी अपात्र ठरता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad