११ वी – विशेष 2 री फेरी वेळापत्रक 11th Admission 2nd Open to All Round Timetable 2025
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय (पुणे) यांनी इयत्ता ११ वी (CAP) प्रवेशासाठी विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही फेरी रिक्त जागा भरण्यासाठी असून, नवीन तसेच आधीपासून नोंदणीकृत विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध आहे.
📅 वेळापत्रक व टप्पे
- नवीन विद्यार्थी रजिस्ट्रेशन आणि भाग एक दुरुस्ती
- 12 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2025 पर्यंत
१. रिक्त जागा प्रसिद्ध करणे (Vacancy)
- सर्व महाविद्यालयांतील उपलब्ध रिक्त जागांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल.
- तारीख: १४ ऑगस्ट २०२५ – सकाळी १०.०० वा.
२. नवीन नोंदणी (भाग-१) व अर्ज भरणे (भाग-२)
- प्रवेशासाठी पात्र नवीन विद्यार्थी भाग-१ मध्ये नोंदणी करतील.
- आधीपासून नोंदणी केलेले विद्यार्थी भाग-२ मध्ये प्राधान्यक्रमासह पर्याय भरतील.
- तारीख: १५ ऑगस्ट २०२५ ते १७ ऑगस्ट २०२५, संध्याकाळी ६.०० वा.
३. विशेष फेरीचा Allotment जाहीर करणे
- पोर्टलवर allotment लिस्ट प्रसिद्ध होईल.
- विद्यार्थी व महाविद्यालयांनी लॉगिनमधून निकाल पाहावा.
- तारीख: १९ ऑगस्ट २०२५ – सकाळी ११.०० वा.
४. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे (Proceed for Admission)
- Allotment मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह allotted कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा.
- तारीख: १९ ऑगस्ट २०२५ ते २० ऑगस्ट २०२५, संध्याकाळी ६.०० वा.
५. कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्रवेश मंजूर/नाकार/रद्द करणे
- महाविद्यालयांनी प्रवेश निश्चित करून प्रणालीमध्ये नोंद करणे आवश्यक आहे.
ℹ️ महत्त्वाची टीप
- सर्व विद्यार्थी व महाविद्यालयांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही करणे बंधनकारक आहे.
- ठरलेल्या कालावधीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास प्रवेशाची संधी गमावली जाऊ शकते.
📍 स्थान: पुणे
📅 दिनांक: १२ ऑगस्ट २०२५