Type Here to Get Search Results !

नेताजी सुभाषचंद्र बोस भाषण निबंध मराठी | Netaji Subhash Chandra Bose Speech Essay Marathi

नेताजी सुभाषचंद्र बोस भाषण निबंध मराठी| Netaji Subhash Chandra Bose Speech Essay Marathi


नेताजी सुभाषचंद्र बोस भाषण निबंध मराठी


     नमस्कार मित्रांनो आज आपण भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढत असलेले स्वातंत्र सेनानी म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल निबंध,भाषण, कविता आणि त्यांचे प्रेरणादायी विचार आपण बघणार आहोत.

अनुक्रनिक toc

नेताजी सुभाषचंद्र बोस निबंध मराठी| shubhas chandra bose essay in marathi

     भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी प्राणांचे बलिदान देणारे तसेच 'जयहिंद' ही जबरदस्त घोषणा देऊन जगाचे लक्ष वेधून घेणारे बंगालचे थोर सुपुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस हे होते.

     नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओरिसा प्रांतातील कटक या शहरात झाला. त्यांनी कलकत्यातील आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील उच्च शिक्षण इंग्लंडला घेतले.त्यांनी कुशाग्र बुद्धिमत्ता व कठोर परिश्रमाला अभ्यासाची जोड दिली त्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस आय. सी. एस परिक्षा पास झाले.त्यांनी इंग्रजांची नोकरी पत्करली पण त्यात त्यांचे मन रमले नाही. तेथील नोकरी सोडून ते मायदेशी परतले. मायदेशी आल्यानंतर गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. स्वातंत्र्यचळवळीत भाग घेण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा देणारे ते पहिले आय.सी.एस्. अधिकारी होते.

     भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र यांनी काँग्रेसबरोबर अनेक चळवळीत भाग घेतला. त्याच्यावर क्रांतिकारी विचारांचा प्रभाव होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जनतेसमोर केलेली भाषणे म्हणजे पेटत्या मशाली होत्या. सुभाष बाबूंनी स्वतंत्र आझाद हिंद सेना' स्थापन केली. आझाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून सुभाषचंद्रांना भारतीय जनता प्रेमाने व आदराने नेताजी म्हणू लागली. नेताजींनी झाशीची राणी' नावाचे स्त्री सैनिकांचे पथकही उभारले. त्यांनी दिलेली 'जय हिंद' ही घोषणा आज सर्वतोमुखी झाली आहे.

     १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस विमान प्रवास करीत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला. स्वातंत्र्य सेनानी सुभाषबाबूंची स्वातंत्र्याच्या होमकुंडात आहुती पडली. प्रखर बुध्दीमत्ता, साहस, अलौकिक देशभक्ती हे सुभाषबाबूंचे गुण भारतीय जनतेच्या मनात कायमचे "कोरले गेले. पुढे दोन वर्षांनी देश स्वतंत्र झाला; पण देशासाठी जीवाचे रान करणारा हा सूर नेता कायमचा आपल्याला दुरावला.
नेताजी सुभाषचंद्र बोस भाषण मराठी | Netaji Subhash Chandra Bose Speech in marathi.


 "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा" ही लोकप्रिय घोषणा देणारी व्यक्ती म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस.

 नमस्कार मित्रांनो आज 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती.

    भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या जिवाची पर्वा न करता संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित करणाऱ्या नेताजी चंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. नेताजी सुभाष चंद्र बोस हे इंग्लंडला जाऊन आय. सी. एस झाले. जालियनवाला बाग हकीकत वाचून ते विलक्षण अस्वस्थ झाले. भारतात परत आल्यानंतर त्यांनी चित्तरंजनदास यांच्या मार्गदर्शनाखाली देशसेवेचे कार्य केले.

     नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी वेळोवेळी सत्याग्रहाच्या चळवळीत भाग घेऊन अनेक वेळा तुरुंगवास भोगला. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीसाठी यापेक्षा जहाल मार्ग स्वीकारला पाहिजे. क्रांतीला आता पर्याय नाही प्रसंगी ती क्रांती सशस्त्रही असेल असे त्यांचे मत होते.

    २१ ऑक्टोबर १९४३ रोजी नेताजींनी सिंगापुरात अर्जी हुकूमत-ए आझाद हिंद ची स्थापना केली. सुभाष चंद्र बोस यांनी दिलेला "जय हिन्द" चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. 

     ६ जुलै १९४४ रोजी आझाद हिंद रेडिओ वरचे आपले नेताजींनी गांधीजींना उद्देशून केलेले भाषण या भाषणात नेताजींनी गांधीजींचा "राष्ट्रपिता"असा उल्लेख करत आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशाप्रकार नेताजींनी सर्वप्रथम, महात्मा गांधी यांना "राष्ट्रपिता" असे संबोधले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यात त्यांचा विश्वास होता.

 "तुम मुझे खून दो,
 मै तुम्हे आजादी दूंगा" 

असे म्हणत भारतीयांना इंग्रजांच्या विरुद्ध पुकारलेल्या त्यांच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. 

प्यारा सुभाष, नेता सुभाष

भारत भू का उजियारा था।

पैदा होते हि गणिको ने

जिसका भष्य लिख डाला था।
      असे सांगण्यात येते की १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस हे मरण पावले परंतु त्यांचा मृतदेह सापडला नाही.त्यांचा मृत्यू एक रहस्य बनून राहिला आहे.अशा या महान व्यक्तिमत्वास माझा कोटी कोटी प्रणाम.नेताजी सुभाषचंद्र बोस कविता शायरी | Netaji Subhash Chandra Bose poem 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आज आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर लिहिलेली एक कविता हिंदीमध्ये बघणार आहोत.

नेता जी के बोल बडे है अनमोल !
जिन्दगी की कसोटी पर तोल सके तो तोल !!

देश की सीमा से बाहर रहकर देश पर उपकार किया भारी !अपनो से अपमान सहकर भी राष्ट्रभक्ति रखी थी जारी !!

उनकी वाणी में कितनो ने जहर दिया था घोल !
जिन्दगी की कसोटी पर तोल सके तो तोल !!

रक्त शिराओ मे उनकी देखो तो कैसे खोला था !
विदेश की धरती पर जाकर जय हिन्द का नारा बोला था !!

नेता जी के पराक्रम का कोई, कर सका न तोल !
जिन्दगी की कसोटी पर, तोल सके तो तोल !!


नेताजी सुभाषचंद्र बोसयांचे प्रेरणादायी विचार मराठी | netaji subhash chandra bose quotes in marathi


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! 

   नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आपण विचार मराठी मध्ये बघणार आहोत. हे विचार आपण वाचल्यानंतर यातुन नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि हे विचार आपल्या मित्रांना किंवा परिवारातील सदस्यांना नक्की शेअर करा.

 •  संघर्षाने मला मनुष्य बनवलं, माझ्यात आत्मविश्वास केला, जो माझ्यात आधी नव्हता.

 • कधीही अधीर होऊ नका. तसेच कधीही अशी अपेक्षा करू नका की, ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अनेकांनी आयुष्य समर्पित केलं, ते तुम्हाला 1-2 दिवसातच मिळेल.

 • मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे की, जेव्हा मी जीवनात भरटकलो आहे तेव्हा कोणत्या तरी किरणाने मला साथ दिली आणि जीवनात भरकटू दिलं नाही.

 • एक व्यक्ती, एक विचार मरू शकतो, पण हाच विचार त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एक हजार आयुष्यात जन्म घेईल.

 •  आपला मार्ग भलेही कठीण आणि खडकमय असो, आपला प्रवास कितीही खडतर असला तरीही आपण पुढे गेलंच पाहिजे.

 • यशाचा दिवस दूर असेल पण तो येईलच, हे मात्र नक्की.

 •  आपल्याला फक्त कार्य करण्याचा अधिकार आहे. कर्म हेच आपलं कर्तव्य आहे. कर्माच्या फळाचा स्वामी देव आहे, आपण नाही.

 • आईचं प्रेम हे स्वार्थ विरहीत आणि सर्वात निस्सीम असते. या प्रेमाचं मोजमाप कोणत्याही मापाने करता येत नाही.

 • जर संघर्षचं नसेल, कोणतंही भय समोर नसेल तर जीवनातील अर्धा रस सपेल.

 •  आपल्या कॉलेज जीवनाच्या उंबरठ्यावर उभा असताना मी अनुभवलं की, जीवनाचा काहीतरी अर्थ आणि उद्देश्य आहे.

 •  जीवनामध्ये प्रगतीचा आशय हा आहे की, निसंकोचपणे शंका उपस्थित करा आणि त्याचे समाधान मिळवण्याचा प्रयन्न करा.

 •  सकाळचा पहिला काही वेळ अंधाराचा नक्की असतो. पण धाडसी व्हा आणि संघर्ष सुरु ठेवा.

 •  माझ्यात जन्मजात प्रतिभा नव्हती. पण कठोर मेहनत टाळण्याची प्रवृत्तीही माझ्यात कधी नव्हती.

 • एवढं तर तुम्हीही मानत असालच की, एक ना एक दिवस मी तुरुंगातून मुक्त होईन. कारण प्रत्येक दुःखाचा अंत हा निश्चित आहे.

 • फक्त मनुष्यबळ, पैसे आणि वस्तूंच्या दमावर स्वातंत्र्य मिळवता येणार नाही.

 •  आपल्याकडे प्रेरणा देणारी शक्तीही असली पाहिजे. जी आपल्याला साहसपूर्ण काम करण्याची प्रेरणा देईल.

 • लक्षात ठेवा की, अन्याय आणि चुकीच्या गोष्टींबाबत तडजोड करणे सर्वात मोठा अपराध आहे.

 •  भारताच्या भाग्याबाबत निराश होऊ नका. जगात अशी कोणतीही शक्ती नाही, जी भारताला गुलाम बनवून ठेवू शकेल.

 •  आमच्या सार्वत्रिक जीवनाचा आदर्शभूत पाया न्याय, समता, स्वातंत्र्य, शिस्त आणि प्रेम हा असावा.

 • कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे, जे दुसऱ्यासाठी झटतात, त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो.

 •  डोळ्यात आशेचे स्वप्न, हातात मृत्यूचे फुल आणि अंतःकरणात स्वातंत्र्याचे वादळ, हाच खरा क्रांतिकारकाचा बाणा आहे.

 •  भिक मागून कधीनी कोणाला स्वातंत्र्य प्राप्त करता येणार नाही, ते ताकदीनेच मिळवले पाहिजे, आणि त्याची किंमत रक्त आहे.

 •  स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये आपल्यात कोण टिकेल हे मला माहीत नाही. पण मला हे माहीत आहे की शेवटी विजय आपलाच होईल.

 •  माझ्यावर कितीही संकटे आली तरी मी घाबरणार नाही, मी पळून जाणार नाही. मी त्याचा सामना करत पुढे जात राहील.

 • मला आयुष्यातील एक निश्चित ध्येय साध्य करायचे आहे. त्या करिताच माझा जन्म झाला आहे. मला नैतिक विचारांच्या प्रवाहात जायचे नाही.

 •  वेळेआधीच परिपक्वता येणे चांगले नाही. ते वृक्षांच्या बाबतीत असो अथवा व्यक्तींच्या कालांतराने त्याचे परिणाम भोगावे लागतात.

 •  जीवनात शंका आणि सदेह सतत निर्माण होत राहिल्या पाहिजे आणि त्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न चालू ठेवले पाहिजे. हाच जीवनाच्या प्रगतीचा अर्थ आहे.

FAQ
Q.1)नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कधी झाला ?
Ans. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओरिसा प्रांतातील कटक या शहरात झाला. 

Q.2) नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आई-वडिलांचे नाव काय होते ?
Ans.नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad