आज लागणार ११वी प्रवेशाच्या पहिल्या फेरीचा निकाल 11 th Admission 1st Round Result 2025
दरवर्षी दहावीचे निकाल लागल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले असते ते ११वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेगवेगळ्या टप्प्यांकडे –विशेषतः पहिल्या फेरीतील कॉलेज अलॉटमेंटकडे! यावर्षीही, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीच्या ११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी २६ जून २०२५ रोजी जाहीर होत आहे.
11 th Admission 1st Round Result 2025
ही पहिली फेरी म्हणजे अनेक विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या स्वप्नातील कॉलेज मिळवण्याचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा. या टप्प्यावर योग्य निर्णय घेणे अत्यावश्यक आहे कारण यावर पुढील सर्व प्रवेश प्रक्रियेचा पाया ठरतो. त्यामुळेच ‘आपणास कोणते कॉलेज मिळाले आहे’, ‘त्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे की नाही?’, ‘प्रथम पसंतीचे कॉलेज मिळाले आहे का?’, ‘Process to Admission वर क्लिक करायचे का नाही?’ अशा अनेक प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना आणि पालकांना हवी असतात.
याच गोष्टी लक्षात घेऊन, या पोस्ट मध्ये आपण ११वीच्या पहिल्या फेरीतील कॉलेज अलॉटमेंटनंतर काय करावे, कोणती टॅब्स वापराव्यात, काय करणे टाळावे आणि पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी काय करावे – याचे संपूर्ण, टप्प्याटप्प्याने आणि सुलभ भाषेत मार्गदर्शन केले आहे.
या माहितीचा उपयोग करून विद्यार्थी स्वतःच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये योग्य निर्णय घेऊ शकतील आणि गैरसमज टाळू शकतील. विशेषतः प्रथम पसंती, दुसऱ्या फेरीत सहभागी होण्यासाठी आवश्यक बदल, फॉर्म लॉक-अनलॉक यांसारख्या तांत्रिक बाबींचा सखोल ऊहापोह येथे करण्यात आलेला आहे.
तुम्ही विद्यार्थी असाल किंवा पालक — वाचा ही माहिती पूर्णपणे, समजून घ्या, आणि योग्य निर्णय घेऊन तुमच्या ११वीच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात आत्मविश्वासाने करा!
🎯 पहिल्या फेरीचा निकाल / College Allotment List Declare date (२६ जून २०२५)
- २६ जून रोजी तुम्हाला कुठले कॉलेज मिळाले आहे हे आपल्या लॉगिनवर दिसेल.
- कॉलेज मिळाले असल्यास २६ जून ते ३ जुलै २०२५ पर्यंत ऍडमिशन कन्फर्म करायचे आहे.
🎯 कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तारीख
मिळालेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन आपल्याला २६ जून ते ३ जुलै २०२५ पर्यंत करून घ्यायचे आहे.
🎯 मला ११ वी साठी कोणते कॉलेज मिळाले आहे ? कसे तपासावे?
- लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाका.
- Check Allotment Status टॅब वर क्लिक करा.
- कॉलेज मिळाले असल्यास दिसेल.
- जर पसंतीचे कॉलेज मिळाले असेल तर Process to Admission वर क्लिक करा.
- डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- २६ जून ते ३ जुलै २०२५ दरम्यान कॉलेजमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंटसह हजर राहून प्रवेश घ्या.
🔷 कॉलेज अलॉट झाल्यानंतर पुढील प्रक्रिया
१. आपल्या पसंतीचे कॉलेज मिळाल्यास काय करावे?
जर तुम्हाला आपल्या पसंतीचे कॉलेज मिळाले असेल, तर पुढील प्रक्रिया अशाप्रकारे करा:
- आपल्या लॉगिनमध्ये जाऊन "Process to Admission" या टॅबवर क्लिक करा.
- त्यामुळे तुमचा ऍडमिशन फॉर्म संबंधित कॉलेजकडे ऑनलाईन पाठवला जाईल.
- जर काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे बाकी असतील, तर ते अपलोड करा.
- त्यानंतर २६ जून ते ३ जुलै २०२५ या कालावधीत संबंधित कॉलेजमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहा आणि ऍडमिशन पूर्ण करा.
२. जर तुम्हाला अलॉट झालेले कॉलेज नको असेल तर काय करावे?
- जर मिळालेले कॉलेज आपल्या पसंतीचे नसेल, आणि तिथे ऍडमिशन घ्यायचे नसेल, तर "Process to Admission" या टॅबवर क्लिक करू नका.
- काहीही इतर कारवाई करू नका.
- जेव्हा दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू होईल, तेव्हा:
- आपला फॉर्म अनलॉक करा,
- नवीन प्रेफरन्स निवडा,
- आणि पुन्हा फॉर्म लॉक करा.
- अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्या फेरीसाठी भाग घेऊ शकता.
महत्त्वाची सूचना — प्रथम पसंतीबाबत लक्षात ठेवा
- जर तुम्हाला प्रथम पसंतीचे कॉलेज मिळाले असेल, तर त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणे आवश्यक व बंधनकारक आहे.
- जर तुम्ही प्रथम पसंतीचे कॉलेज नाकारले, तर दुसऱ्या व पुढील सर्व फेरीसाठी पात्र राहणार नाहीत. एकूण चार फेऱ्या होत असतात. अशा विद्यार्थ्यांना पाचव्या फेरीसाठी प्रवेश दिला जातो.
- मात्र, जर तुम्हाला दुसऱ्या ते दहाव्या क्रमांकातील (पसंतीच्या) कॉलेजपैकी एखादे मिळाले असेल आणि तिथे ऍडमिशन घ्यायचे नसेल, तर:
- "Process to Admission" वर क्लिक करू नका,
- आणि दुसऱ्या फेरीत भाग घेण्यासाठी फॉर्म अनलॉक करून प्रेफरन्स बदल करा, व पुन्हा फॉर्म लॉक करा.
दुसऱ्या किंवा त्यापुढील प्रेफरन्सचे पसंतीचे कॉलेज नको असल्यास?
चुकूनही Process to Admission वर क्लिक करू नका.बाकी काहीही करायचे नाही.दुसऱ्या फेरीसाठी फॉर्म अनलॉक करा आणि नवीन प्रेफरन्स भरा.
रिक्त जागांचा तपशील (०६ जून २०२५)
प्रत्येक कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत याचा तपशील वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल.
यादी डाऊनलोड करून अंदाज घेता येतो.
११ वी प्रवेशा संदर्भात विद्यार्थ्यांना पडणारे काही सामान्य प्रश्न !
प्रश्न: मला कोणते कॉलेज मिळाले हे कसे तपासावे?
उत्तर: लॉगिन करा → Check Allotment Status → कॉलेज दिसेल → Process to Admission क्लिक करा
प्रश्न: स्ट्रीम (Science to Commerce) बदलता येईल का?
उत्तर: पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या फेरीमध्ये स्ट्रीम आणि प्रेफरन्स बदलता येतील.
प्रश्न: दुसऱ्या फेरीत परत फी भरावी लागते का?
उत्तर: नाही, दुसऱ्या फेरीत कोणतीही फी भरावी लागत नाही.
प्रश्न: मी रजिस्ट्रेशन नाही केले नाही आणि पार्ट 1 आणि पार्ट 2 ही भरला नाही तर मला आता भाग घेतला नाही तर?
उत्तर: दुसऱ्या राउंडसाठी रजिस्ट्रेशन करून भाग घेता येतो.
प्रश्न: फर्स्ट राउंडमध्ये भाग घेतला नाही तर?
उत्तर: दुसऱ्या राउंडसाठी रजिस्ट्रेशन करून भाग घेता येतो.
प्रश्न: मला मिळालेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असल्यास?
उत्तर: Process to Admission क्लिक करा, Allotment letter प्रिंट काढा , उर्वरित डॉक्युमेंट अपलोड करा आणि दिलेल्या वेळेत कॉलेजमध्ये हजर राहा.
प्रश्न: मला मिळालेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे नसेल तर?
उत्तर: Process to Admission क्लिक करू नका, बाकी काहीही क्लिक करू नका.दुसऱ्या फेरीसाठी फॉर्म अनलॉक करून प्रेफरन्स बदला आणि पुन्हा लॉक करा.
प्रश्न: चुकून Process to Admission क्लिक केल्यास?
उत्तर: कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन रद्द करा. परंतु दुसऱ्या फेरीसाठी अपात्र असाल आणि तिसऱ्या फेरीमध्ये भाग घेऊ शकता.हे फक्त दुसऱ्या ते दहाव्या पसंतीसाठी लागू.प्रथम पसंतीसाठी कॅन्सल केल्यास पुढील तिन्ही फेरीसाठी अपात्र ठरता.