११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी कॉलेज कसे सर्च करावे ? How to search college for 11th Admission 2025
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दिनांक 21 मे 2025 पासून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया चे विद्यार्थी रजिस्ट्रेशन पार्ट वन आणि पार्ट टू फॉर्म भरणे सुरू होणार असून पार्ट टू मध्ये आपल्याला कॉलेज प्रेफरन्स निवडायचे असतात . कॉलेज प्रेफरन्स निवडण्यासाठी आपल्याला अगोदर कॉलेज ची माहिती हवी असते. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते कॉलेज आहे त्या कॉलेजचा पूर्ण पत्ता ,कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत, कोणते कॉलेज अनुदानित आहे ,कोणते कॉलेज प्रायव्हेट आहे, त्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत, किती माध्यम आहेत, त्या कॉलेजचा यु डायस नंबर कोणता आहे, त्या कॉलेजचा कोणता नंबर याची सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत
🛑 लक्षात ठेवा
कॉलेज प्रेफरन्स देण्यासाठी आपल्याला कॉलेजचा स्ट्रीम कोड STREAM CODE किंवा यु डायस नंबर Udise No आवश्यक आहे कारण STREAM CODE किंवा यु-डायस नंबर जर आपल्याकडे असेल तर कॉलेज सर्च करायला आपल्याला सोपे जाणार. प्रत्येक कॉलेजचा STREAM CODE आणि यु डायस नंबर कसा शोधायचा किती सीट्स अवेलेबल आहेत कॉलेज Aided आहे किंवा नाही याची सविस्तर माहिती बघूया .
🆔 मागील वर्षाची सर्व कॉलेजची Cutoff लिस्ट डाऊनलोड करा.
कॉलेज अनुदानित असेल तर कॉलेज फीस आपल्याला कमी लागेल लक्षात ठेवा त्यामुळे कॉलेज प्रेफरन्स निवडताना जर आपल्याला गुण चांगले असतील तर अनुदानित कॉलेज निवडा.
🎯११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी कॉलेज कसे सर्च करावे ? How to search college for 11th Admission 2025
"https://mahafyjcadmissions.in/ या वेबसाईटवरून कॉलेज डिटेल्स कसे शोधायचे?"
🆔3. शोध पर्याय निवडा:
- Stream: Science / Commerce / Arts
- District किंवा Taluka निवडा
- Medium: English / Marathi / Hindi
- College Type: Aided / Unaided / Government
- UDISE Code (जर माहित असेल तर)
लक्षात घ्या कॉलेज निवडते वेळेस आपल्याला सर्वात अगोदर आपण आपल्याला कुठल्या स्ट्रीम मध्ये ऍडमिशन घ्यायचे आहे ते Stream निवडा, Arts commerce and Science या तीन Stream पैकी एक Stream निवडा.
📌 माध्यम निवडा
आपल्याला कुठल्या माध्यमातून ऍडमिशन घ्यायचे आहे ते माध्यम निवडा , मराठी हिंदी इंग्रजी किंवा इतर माध्यम ज्या माध्यमातून आपल्याला ऍडमिशन घ्यायचे आहे ते माध्यम निवडा.
Region, Stream type , College type हे तीन पर्याय नाही निवडला तरी चालेल.
📌 आपला तालुका निवडा
जर आपल्याला आपल्याला प्रत्यक्ष तालुक्यांमधील कॉलेज शोधायचे असेल तर आपल्याला तालुका निवडा अन्यथा फक्त जिल्हा निवडा आणि सर्च बटनवर क्लिक करा. आपल्याला तालुक्यामधील सर्व कॉलेजची लिस्ट दिसेल.
बस एवढे फक्त स्ट्रीम, माध्यम, जिल्हा आणि तालुका हे चार पर्याय निवडा बाकीचे पर्याय नाही निवडले तरी चालेल आणि खाली सर्च बटणावर क्लिक करा तुम्हाला सर्व कॉलेजची लिस्ट दिसणार आहे.
4. "Search" बटन क्लिक करा.
5. तुमच्या सर्चनुसार कॉलेजसची यादी येईल, जिथे खालील माहिती दिसेल:
- कॉलेजचं नाव
- पत्ता
- कोड
- उपलब्ध सीट्स
- माध्यम
- फी
- मागील वर्षाचा कट-ऑफ