Type Here to Get Search Results !

15 ऑगस्ट भाषण मराठी 2024 | 15 august bhashan marathi pdf

 15 ऑगस्ट भाषण मराठी 2024 | 15 august bhashan marathi pdf | 15 august bhashan marathi madhe | 15 ऑगस्ट भाषण मराठी pdf | 15 ऑगस्ट भाषण मराठी मध्ये | 15 ऑगस्ट भाषण मराठी pdf download 


15 ऑगस्ट भाषण मराठी 2024


15 ऑगस्ट भाषण मराठी 2024 :-   नमस्कार मंडळी आज, 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे, भारताच्या स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आज आपण एकत्र आहोत. या शुभ प्रसंगी, आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण देशभक्तीची भावना व्यक्त करतो.


15 ऑगस्ट भाषण मराठी 2024 | 15 august bhashan marathi pdf | 15 ऑगस्ट भाषण मराठी मध्ये 

तिरंगा झेंडा फडकतो 

जयजयकार बोला, 

१५ ऑगस्ट आज आपला 

भारत स्वतंत्र झाला ..... 


माननीय अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित जमलेल्या माझ्या मित्र - मैत्रिणींनो, सर्वांना नमस्कार.


आज १५ ऑगस्ट, आपल्या भारताचा स्वातंत्र्यदिन आहे. प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा ! आपल्या भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. तेंव्हापासून आपण हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा करतो.


मित्रांनो, हा दिवस आपल्याला महात्मा गांधीजी, भगतसिंग, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, लाला लजपतराय, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह शेकडो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. आज आपण त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना सलाम करूया.


या दिवशी भारताचे पंतप्रधान दिल्ली येथील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात. यानंतर ते देशाला संबोधित करतात. आपल्या देशाने कशी प्रगती केली आहे आणि भविष्यातील योजनांबद्दल माहिती देतात. या दिवशी देशभर तिरंगा डौलाने फडकताना दिसतो.


आज भारताने सर्व क्षेत्रात जगभर आपला ठसा उमटवला आहे. कृषी, विज्ञान, आर्थिक, साहित्य, क्रीडा, शिक्षण, अंतराळ अशा विविध आघाड्यांवर उल्लेखनीय प्रगती केली आहे. आज आपण सर्वांनी मिळून देशाला जगातील एक संपन्न, सक्षम देश बनवण्याची प्रतिज्ञा करूया.


जय हिंद, जय भारत. धन्यवाद !


हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ १५ ऑगस्ट मराठी भाषण निबंध 

➡️ स्वातंत्र्य दिन चारोळ्या मराठी 

➡️ रक्षाबंधन मराठी निबंध माहिती 

➡️ बैलपोळा निबंध मराठी 

➡️ श्री कृष्ण जन्माष्टमी निबंध मराठी 




FAQ

Q.1) भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले ?

Ans. भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले.


Q.2) 15 ऑगस्ट 2024 हा कितवा स्वातंत्र्य दिन आहे ?

Ans. 15 ऑगस्ट 2024 हा 78 वा स्वातंत्र्य दिन आहे.


3) 15 ऑगस्ट 1947 रोजी काय झाले ?

Ans. आपल्या भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. तेंव्हापासून आपण हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा करतो.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad