Type Here to Get Search Results !

रक्षाबंधन मराठी निबंध माहिती 2022 | raksha bandhan Marathi Nibandha Mahiti 2022

रक्षाबंधन मराठी निबंध माहिती 2022 | raksha bandhan Marathi Nibandha Mahiti 2022

रक्षाबंधन मराठी निबंध माहिती 2022

रक्षा बंधन 2022: नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्षाबंधन हा सण पूर्ण रीति रिवाजी नुसार साजरा करणार आहोत.तर आपण रक्षाबंधन मराठी निबंध,चारोळ्या आणि कविता बघनर आहेत.

 अनुक्रनीका (toc)


रक्षाबंधन मराठी निबंध माहिती 2022 | raksha bandhan Marathi Nibandha Mahiti 2022

      सण हा मांगल्याचा, सण हा प्रेमाचा 
        सण हा बहिण भावाच्या अतूट नात्याचा 
             सण हा रक्षाबंधनाचा !!

भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो.हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण असतो या दिवशी आपली बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि तिच्या भावाची प्रगती आणि सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते,भावाकडून पण बहिणीला संरक्षणाचे वचन दिले जाते. रक्षाबंधन हा सण पूर्ण भारतात साजरा करतात.

      देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे.उत्तर भारतात 'कजरी पौर्णिमा' पश्चिम भारतात 'नारळी पौर्णिमा' या नावाने तो साजरा केला जातो. रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस असा म्हणल तर चालत.श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी असे धर्मशास्त्रात म्हटले आहे या विधीस 'पवित्रारोपण' असेही म्हणतात.भावाची प्रगती व्हावी तो सुखी रहावा आणि त्यानं आपले रक्षण करावे हा या दिवसा मागची मंगलमय कामना असते.

➡️९ ऑगस्ट क्रांती दिन भाषण निबंध मराठी माहिती

➡️जागतिक आदिवासी दिन भाषन निबंध मराठी माहिती 


       भारत आणि नेपाळ व बाकीचे देश जिथे तिथे हिंदू धर्माला मानणारे लोक राहतात तिथे रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. आणि रक्षाबंधन हा सण प्राचीन काळापासून सर्व लोक साजरा करत आहेत.  अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये रक्षाबंधनच्या उल्लेख केला आहे. राखी बांधण्याचा अर्ध ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बंधनाच्या या सणातून स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे.पण काही भागात नोकर त्याच्या मालकाला,ब्राह्मण त्याच्या यजमानाला, मुलगी तिच्या वाडीला आणि बायको तिच्या नवऱ्याला राखी बांधते.

       आपल्यापेक्षा बलवान समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे ही त्या मागची भावना आहे. बहिण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावा विषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, संयम आणि साहस. काहीही स्वार्थ नसलेल नात म्हणजे भाव बहिणीच नातं अस पूर्वजांनी या नात्याच्या पावित्रेतेची महिमा गायला आहे. 

         रक्षाबंधनाच्या दिवशी आजकाल बहिणी आपल्या भावाच्या घरी राखी व मिठाई घेऊन जातात. आणि बहीण आपल्या भावाला राखी बांधल्यावर भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून पैसे किंवा उपहर देतो. अश्या प्रकारे एकमेकांना गिफ्ट दिल्याने भाऊ बहिणी मधे प्रेम वाढत.रक्षाबंधनच्या दिवशी सर्वजण नवे कपडे परिधान करतात. सर्वांचे मन आनंदाने भरुन जाते. बहीण भावाला राखी बांधण्यासाठी एक दिवस आधी बाजारात जाऊन चांगल्या प्रकारच्या राख्या खरिदी करतात. भाऊ सुद्धा बहिणीसाठी काहीतरी उपहार विकत आणतात.हा रक्षा बंधन सण भाऊ बहिणीच प्रेम टिकवून ठेवण्याचा सण आहे.हिंदू धर्मात असे अनेक सण परंपरा फार पूर्वी पासून सुरु आहेत.ह्या सर्व परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग आहे आणि रक्षाबंधन ही सुद्धा आपली एक परंपरा आहे, म्हणून माझा आवडता सण हा सक्षाबंधन आहे.

       दर वर्षी रक्षा बंधन हा सण श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.हा सण भाऊ-बहिणीचे प्रेम आणि कर्तव्याच्या प्रतीक असतो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात आणि भाऊ आपल्या बहिणीला सदैव संरक्षण करण्याचं वचन देतो.  

        रक्षाबंधनाचा हा सण आपल्या भारत देशात बऱ्यच काळापासून साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी सकाळी लवकर अंघोळ करून पूजेचे ताट सजवतात, पूजेच्या ताटात कुंकू, राखी, अक्षदा, दिवा, मिठाई इत्यादी वस्तू ठेवल्या जातात आणि नंतर भावाला घराच्या पूर्व दिशेला पाटावर बसून त्याची आरती ओवळली जाते,आणि त्याच्या डोक्याला कुंकू व अक्षदा लाऊन बहिण भावाला राखी बांधते.आणि सर्व झाल्यावर बहीण भावाला गोड मिठाई खाऊ घालते आणि भाऊ सुद्धा बहिणीला मिठाई खाऊ घालतो आणि बहिणी साठी अनलेला उपहार (गिफ्ट) तिला भेट देतो.

        पूर्वी लोक रक्षा बंधन अतिशय योग्य पूजा पद्धतीने साजरी केली जायची पण आता पहिल्या सारखं राहिल नाही आता लोक पुर्वी सारखं सणाला कमी महत्व देत आहेत त्यामुळे आपण आपल्या संस्कृती पासून दूर जात आहोत.आता रक्षा बंधनाच्या दिवसी सर्व भाऊ बहिण एकत्र नसतात त्यामुळे काही बहिणी रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला पोस्टाने राखी पाठवतात याशिवाय मोबाईल वर राखी पटवून रक्षाबंधनाच्या शुभेच्छ देखिल दिल्या जातात. आपण स्वतः ला मॉडर्न दाखवण्यासाठी आपण आपल्या संस्कृतीला विसरत आहोत. तसा आपण आपल्या पुजेच्या पद्धतीत बदल केलेले आहेत. जर आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीचे संरक्षण करायचे असेल तर जुन्या पद्धतीनुसार सण उत्सव साजरे करायला पाहिजेत. तसेच आजचा सण रक्षाबंधनाच्या याचे महत्व लक्षात घेऊन योग्य पध्दतीने आजचा हा सण साजरा करायला हवा.

        रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे दानवांचा राजा वृत्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले तेव्हा इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी सूची हिने विष्णू कडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला.त्या भगवान विष्णु ने दिलेल्या राखी च्यायाप्रभावा मुळे इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल आशी तिची श्रद्धा होती. आणि इंद्राचा त्या युद्धात विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले तेव्हापासून त्या गोष्टीची आठवण म्हणून मनगटावर  राखी बांधण्याची पद्धत पडली.

      "स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा" असा महान संदेश देणाऱ्या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबा पुरतेच मर्यादित ठेवले आहे.अशा सुंदर प्रेम आणि भावबंधनाच्या सणाला कुटुंबा पुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही.समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. सख्या बहिणीने सख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्कर एखाद्या बहिणीने दुसऱ्या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते.

        रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे, रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे, रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर, भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरणा पोषक आणि पूरक आहे हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देण आहे.हा सण एकमेकांना जोडणारा सण आहे  हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही आणि सामाजिक एकतेची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात.

        रक्ताच्या नात्या व्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे वाव मिळतो. ज्या समाजात एकरूपता एक्य असते असा समाज सामर्थ शाली बनतो असाच या रक्षा बंधनाचा संदेश आहे. स्त्री कितीही मोठी मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवू इच्छिते हा तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो.

       रक्ताचे नाते असणारे भाऊ-बहीण असोत किंवा मानलेले असो पण या नात्या मागची भावना पवित्र व खरी आहे या नात्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. आपल्या भारत देशात प्रेम आणि आपुलकी अजूनही कायम असल्यामुळे रक्षाबंधनाचे महत्व आजही कायम राहील आहे.

 तोडे से भी ना तुटे, 
ऐसा भाई बहन का अनोखा बंधन है, 
इस बंधन को सारी दुनिया
कहती रक्षाबंधन है !!

हे पण वाचा⤵️


FAQ

Q.1) रक्षा बंधन कधी साजरा केला जातो ?Ans.श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.

Q.2) रक्षाबंधन हा सण उत्तर भारतात आणि पश्चिम भारतात कोणत्या नावांनी साजरा केला जातो ?Ans.उत्तर भारतात 'कजरी पौर्णिमा' पश्चिम भारतात 'नारळी पौर्णिमा' या नावाने तो साजरा केला जातो.

Q.3) इंद्राच्या पत्नीचे नाव काय आहे ?
Ans. इंद्राच्या पत्नीचे नाव 'सूची' हे आहे.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad