श्री कृष्ण जन्माष्टमी निबंध मराठी माहिती | shri krishna janmashtami Essay marathi Mahiti | Shri Krishna Janmashtami marathi mahiti pdf | श्री कृष्ण जन्माष्टमी मराठी माहिती
श्री कृष्ण जन्माष्टमी २०२२: नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो दर वर्षी प्रमाणे याही वर्षी आपण श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहोत.या वर्षी श्री कृष्ण जन्माष्टमी १८ तारखेला साजरी करणार आहोत.तर त्या विषयी आपण पूर्ण माहिती, श्री कृष्ण जन्माष्टमी निबंध, गवळणी आणि जन्माष्टमी चा पाळणा खालील प्रमाणे बघणार आहोत.
➡️हरतालिका तृतीया मराठी माहिती
➡️रक्षाबंधन मराठी निबंध माहिती 2022
अनुक्रनीका(toc)
श्री कृष्ण जन्माष्टमी निबंध मराठी माहिती | shri krishna janmashtami Essay marathi Mahiti
सुदामा ज्याचा मित्र होता खास,
गोपिकांसोबत ज्याने रसला रास,
त्याचा जन्म दिवस आहे आज"
श्री कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू समूहाद्वारे साजरा केला जाणारा उत्सव आहे.या दिवशी सर्वांच्या लाडक्या श्रीकृष्णाची आणि कृष्णाची प्रियशी राधा यांच्या प्रेमाचा आनंद दर्शवणारा दिवस म्हणून मोठ्या प्रमाणात उत्साहात सर्व भारतभर साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमीला कृष्णशतामी, श्रीकृष्ण जयंती, श्रीजयंती इ. अनेक नावाने ओळखले जाते. भगवान श्रीकृष्णाचा वाढदिवस म्हणून जन्माष्टमी साजरी केली जाते. हा उत्सव केवळ भारतातच नाही तर प्रदेशात राहणारे भारतीय सुद्धा मोठ्या विश्वासाने आणि भक्तिभावाने साजरे करतात.
➡️९ ऑगस्ट क्रांती दिन भाषण निबंध मराठी माहिती
➡️जागतिक आदिवासी दिन भाषन निबंध मराठी माहिती
श्रीकृष्णाचा जन्म १२ वाजता त्याचा मामा कंसाच्या तुरुंगात झाला. त्याच्या वडिलांचे नाव वासुदेव आणि आईचे नाव देवकी आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लोक उपवास ठेवतात आणि मध्यरात्री बारा वाजता कृष्णाच्या जन्मानंतर श्रीकृष्णाची आरती केली जाते या नंतर लोक त्यांच्या नातेवाईका आणि शेजाऱ्यांसोबत उपवास सोडतात.
ज्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे, त्या दिवशी मंदिरे खास सजावट केलेली केलेली असतात. जन्माच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास ठेवतात. या दिवशी मंदिरात भजन-कीर्तने गायली जातात आणि श्रीकृष्णाला पाळण्यात बसवून पाळणा म्हणतात. या दिवशी रामलिला देखील आयोजित केली जाते.
श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात.मंदिरात एक पाळणा बांधला जातो. त्या पाळण्यात कृष्णाला ठेवतात व इतर खेळणी कृष्णाभोवती ठेवली जातात.उत्तर प्रदेशातील मथुरा- वृंदावन येथे कृष्ण वाढलेल्या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या प्रदेशातील कृष्ण मंदिरे सर्व सुंदर दिवे आणि फुलांच्या सजावटीने उधळली जातात. मथुरा वृंदावन मधील सर्व कृष्ण मंदिरे पाहण्यासाठी देशातील तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातून भक्त आणि पर्यटक तिथे खूप गर्दी करतात. या दिवशी गुजरातमधील द्वारका येथे एक वेगळा उत्सव साजरा केला जातो. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील शेतकरी बैलगाड्या सजवतात आणि बैलगाड्यांवर कृष्णाची मूर्ती ठेवून नाचत नाचत मिरवणुका काढल्या जातात. कृष्ण जन्माष्टमी हा महाभारतात कंसाचा मारेकरी आणि अर्जुनाचा सल्लागार भगवान विष्णूच्या आठव्या पुनर्जन्मच्या जन्माचा उत्सव आहे. कृष्ण जन्माष्टमी विशेषतः काळया पंधरवड्या च्या म्हणजेच कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी श्रावणातील हिंदू लूनी-सौर दिनदर्शिकेत साजरी केली जाते.
श्री कृष्ण जन्माष्टमी पाळणा मराठी | Shri Krishna Janmashtami palna in Marathi
कळस सोन्याचा देते डहाळ
कृष्ण जन्मला कंसाचा काळ
जो बाळा जो जो रे जो||१||
सिता सावित्री बायांनो उठा
खारीक खोबरं साखर वाटा
जो बाळा जो जो रे जो||३||
अनुसयेने वाजवली टाळी
कृष्ण जन्मला यमुना स्थळी
जो बाळा जो जो रे जो||४||
पाचव्या दिवशी सटवाई चा वेढा
लिंबू नारळ देवीला फोडा
तान्हा बाळाची दृष्ट गं काढा
जो बाळा जो जो रे जो||५||
राधा कृष्णाला घालती वारा
चला यशोदा आपुल्या घरा
जो बाळा जो जो रे जो||६||
तेथे सोनेरी मंडप लाल
यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोलं
जो बाळा जो जो रे जो||७||
श्री कृष्ण जन्मला यमुना स्थळी
गवळणी संगे लावितो खळी
जो बाळा जो जो रे जो||१३||
श्री कृष्ण जन्माष्टमी भजन मराठी | Shri Krishna Janmashtami Bhajan in Marathi
FAQ
Q.1) श्री कृष्णाच्या जन्म कुठे व किती वाजता झाला ?
Ans.श्रीकृष्णाचा जन्म १२ वाजता त्याचा मामा कंसाच्या तुरुंगात झाला.
Q.2) श्री कृष्णाच्या आई वडिलांचे नाव काय आहे ?
Ans.त्याच्या वडिलांचे नाव वासुदेव आणि आईचे नाव देवकी आहे.
Q.3) श्री कृष्णाचे पालनपोषण कोठे झाले ?
Ans.उत्तर प्रदेशातील मथुरा- वृंदावन येथे कृष्ण वाढलेल्या आहे.