Type Here to Get Search Results !

वसुंधरा दिन 2022 मराठी माहिती | Earth day marathi mahiti.

वसुंधरा दिन 2022 मराठी माहिती|Earth day marathi mahiti | वसुंधरा दिन निबंध कविता मराठी माहिती

   
वसुंधरा दिन 2022 मराठी माहिती

    शुभ प्रभात मित्रनो वसुंधरा दिन म्हणजे पृथ्वी दिन याविषयी आपण अप्रतिम भाषण आणि दर्जेदार निबंध बघणार आहोत.

अनुक्रानिका toc

वसुंधरा दिन मराठी निबंध माहिती|Earth day marathi nibandh

      आपला देश सर्व जगातील सर्वात जास्त जैवविविधता असलेला आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे. भारत हा खेड्यांचा देश आहे.आपला भारत देश सर्वात जास्त परंपरा,रीती रिवाज खेड्यामध्ये पळाल्या जातात. ज्यामध्ये निसर्गाचा अनमोल ठेवा जपण्याची तसेच हिरवीगार वनराई अमूल्य ठेवा म्हणून जतन करून ठेवण्याची परंपरा आहे. पण काळाच्या ओघात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर हिरवी वनराई नष्ट होत सिमेंटची जंगले उभी राहत आहेत. वाढते प्रदूषण काळजीचे कारण बनत आहे. जागतिक तापमानात वाढ झाली आहे. अनेक स्वास्थ्याच्या व पर्यावरणाच्या, आरोग्याच्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. झाडांची कत्तल आणि वन्यप्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होणे हा आपल्यासाठी धोक्याचा दिवा लुकलुकायला लागला आहे.... असे म्हणावे लागेल.
        कोरोनाच्या संकटाने आपल्याला अनेक गोष्टी शिकविल्या. लॉकडाऊनच्या सर्वत्र ठिकाणी गाड्याचा वापर कमी झाल्या मुळे प्रदूषणात घट झाली. आज आपण विकास करण्यासाठी आपण झाडतोड करतो आणी नंतर ऑक्सजन मिळवण्यासाठी आपण यंत्रणा वापरत असतो. माझी वसुंधरा अभियान हे म्हणूनच आपल्या वसुंधरेला, आपल्या पृथ्वीला निसर्गसंपन्न हिरवाईने समृद्ध बनवण्याचे अभियान आहे.
        पूर्वी चित्रकला स्पर्धेत मुले चित्र काढायची तेंव्हा उगवणा ऱ्या सुर्याचे चित्र काढत असताना अनेक मुले दोन डोंगरां मधून उगवणाऱ्या सुर्याचे चित्र काढत असत. पण आता मुले हेच चित्र दोन इमारतींच्या मधून उगवणाऱ्या सुर्याचे चित्र काढतात. ही आताची स्तीती अवघड आणी धोकादायक असून हे सर्व परवत,नेचर,नदी,हे सर्व आपल्या पुढच्या पिढी साठी चांगलं ठेवण ही आपली सर्वांची मोठी जबाबदारी आहे पर्यावरणाचे संरक्षण करणे हे सरकारचेच नसून आपलेही काम आहे.. 'माझी वसुंधरा अभियान राबविताना यामध्ये प्रत्येकाने सहभाग द्यावा व त्यातून याला लोकचळवळीचे स्वरुप देण्यात यावे. एक झाड लावून त्याचे संवर्धन करून अशी लाखोच्या संख्येने झाडे वाढू शकतात जगू शकतात परंतु बरेचदा आपण वृक्षारोपणाचे फक्त सोपस्कार करतो. झाडाचे रक्षण व संवर्धनाची जबाबदारी मात्र घेत नाही. 
       
          म्हणून चला या अभियानाचा भाग बनू या!
            आपल्या स्वतःसाठी नाही तर 
           आपल्या येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी 
             या निसर्ग संपन्न जैव विविधतेने 
                    नटलेल्या सृष्टीचे
                वसुंधरेचे रक्षण करूया...!!!

वसुंधरा दिन मराठी निबंध|Earth day marathi mahiti

माझी वसुंधरा : वसुंधरेची एकच हाक,पर्यावरणाचा घ्या ध्यास.वसुंधरा म्हणजेच पृथ्वी, आणि पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर जीवन संभव आहे. पृथ्वीला वसुंधरा, भूमी, धरती, -, वसुधा असे अनेक नावे आहे.वसुंधरा, भूमी, धरती, वसुधा असे अनेक नावे आहे. पृथ्वी ही सूर्यापासून तिसऱ्या स्थानावर आहे. तिचा जन्म सुमारे ४.५४ अब्ज वर्षांपूर्वी झाला असे मानले जाते. या पृथ्वीवर मानवाच्या जगण्या करीता पर्याप्त संसाधने उपलब्ध आहेत. या सोबतच पृथ्वी वर आपल्या जगण्यासाठी चांगले वातावरण देखील उपलब्ध आहे.या धरतीला आईचा दर्जा देण्यात आला आहे. म्हणूनच आपण सर्वांनी या घरतीचे रक्षण करावयास हवे. पण आज मानव पुर्थी ची सुरक्षा करण्या ऐवजी तिच अस्तित्व करायला निघाला आहे. धरतीला वाचवण्याकरीता आणि लोकांना जागरूक करण्यास प्रत्येक वर्षी २२ एप्रील ला " वसुंधरा दिन” साजरा करण्यात येतो.या निमीत्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येतं. या दिवशी जागोजागी वसुंधरा संवर्धन अभियान चालवले जाते.
        माझी वसुंधरा माझी जबाबदारी हे श्रीदवाक्य सर्वांनी अंगीकारले पाहिजे. माझी वसुंधरा मी कशी समृद्ध करणार याची प्रत्ये. -काने जबाबदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्षतोड़ थांबवणे, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर न करणे, वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवणे,कचऱ्याची योग्य विल्हेवात लावणे व वसुंधरा मी कशी समृद्ध करणार याची प्रत्येकाने जबाबदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्षतोड़ थांबवणे, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर न करणे, वृक्षारोप णासारखे उपक्रम राबवणे, फचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे या सारख्य गोष्टी करणे आवश्यक आहेत. तेव्हाच आपली वसुंधरा स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचे ध्येय गाठता येईल. आणि तेव्हाच वसुंधरेचे सवंर्धन होऊ शकते.

वसुंधरा दिवस म्हणजे काय ? का आणी केव्हापासून साजरा करतात

२२ एप्रिल हा दिवस म्हणजेच Earth Day म्हणून साजरा केला जातो.पण वसुंधरा दिवस म्हणजे नक्की काय आणि केव्हापासून तो साजरा केला जातो ते पाहूयात.
      अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को गेलार्ड नेल्सन यांनी 1970 मध्ये सर्वप्रथम अर्थ डे ही संकल्पना मांडली त्यांनी अमेरिका तील २ कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यां बाबत जागृती केली.तेव्हापसून 22 एप्रिल हा दिवस प्रतिवर्षी वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो .आपल्या पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिष्ट आहे.झाडें,पर्वत, हवा,नदी,समुद्र यांमुळे या सृष्टीतील पर्यावरण चांगले राहते या घटकांची पर्यावरण संवर्धनात प्रमुख भूमिका असते आजच्या दिवशी आपण समाजात पर्यावरणाविषयी जनजागृती करु शकतो  वृक्षा रोपण करू शकतो.

वसुंधरा दिन मराठी कविता ||Earth day marathi kavita.

  
वसुंधरा मी तुम्हां सांगते
माझी जीवन कहाणी
हिरवा शालू माझा देखणा
दिसायची की देखणी ||१||


हिरवे शामल डोंगर सारे
स्वच्छ नदीचे झुळझुळ पाणी
किलबिलाट तो पक्ष्यांचा
मधुर सुस्वर मंजुळ गाणी ||२||

गरजा साऱ्या पुरवीत होते 
पण हाव मानवा लागली 
यह दिशांनी काया माझी
"स्वार्थासाठी ओरबडली ||३||

उजाड भेसूर डोंगर झाले 
दूषित झाले निर्मळ पाणी
वृक्षतोड ती भयाण केली 
विरली मंजुळ पाखरं गाणी ||४||

काय असेल भविष्य माझे
विचार करते क्षणीक्षणी
प्रदूषणाने काळवंडली काया 
आता दिसेना मी देखणी ||५||

नष्ट होईल माझी काया
श्वास तुझाही गुदमरून जाईल
माझ्यावरचे अस्तित्व तुझे 
तुझ्यामुळेच संपून जाईल ||६||

माझ्या मनाची आर्त विनवणी
आता तरी समजून घे 
पर्यावरण संरक्षण, संवर्धनाचे
वचन आज तू मला दे ||७||

किलबिलणारे बोल गोठले 
खळखळणारे झरे आटले 
शुद्ध हवा ना निर्मळ पाणी 
दुष्काळाचे मेघ दाटले ||८||

कत्तल झाली परंपरेची 
डोंगर राने उघडी पडली 
उजाड झाली अवघी सृष्टी 
हिरवी मखमल हरवून गेली||९||

सिमेंटच्या या जंगलामध्ये 
नद्या नि विहिरी तळास गेल्या 
प्रदूषणाच्या विळख्यामध्ये 
दूषित होऊन लोप पावल्या ||९||

ऋतुचक्राचे नियम चुकले 
निसर्गाचा प्रकोप झाला 
कधी कोरोना, कधी त्सुनामी 
दैवाचा हा विपरीत घाला||१०||

धरतीमाता माय आपली 
रक्षण तिचे करू चला 
झाडे लावू, प्लास्टिक बंदी 
थोडे नियम पाळू चला||११||

जलाशयांची वाढ करूनी 
वनसंवर्धन करू चला 
पाणी, इंधन अमूल्य धन हे 
जपून वापर करू चला||१२||

परिसर ठेवू स्वच्छ नेटका 
फळा-फुलांच्या बागा सजवू 
तलम रेशमी शालू हिरवा 
प्रकृतीला पुन्हा नेसवू||१३||

येथील पुन्हा दिवस सुगीचे 
पशु-पक्षीही होतील गोळा 
हिरवी क्रांती जगात होऊन 
सौख्यात्वाचा जमेल मेळा||१४||

जिथे जन्मतो, जिथे खेळतो 
अंगावरती जिच्या वाढतो
ऋण फेडू या वसुंधरेचे 
जिच्याच अंती कुशीत शिरतो||१५||

झाडे लावा आणि झाडे जगवा 
सुजल, निर्मळ भविष्य घडवा||

वसुंधरा दिन मराठी स्लोगण|Earth day marathi slogan

स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे |

परिसर स्वच्छ ठेवाल, तर निरोगी व्हाल|

व्हावया पर्जन्यवृष्टी, वृक्षांनी सजवा सृष्टी|

करूया चराईबंदी, कुऱ्हाडबंदी 
पर्यावरणासाठी ही शेवटची संधी|

ओझोन वाचवा, जीवन वाचवा|

पाणी, जमीन, झाडे, पशुपक्षी, हवा 
आपल्या सुखासाठी राखा हा ठेवा|

वसुंधरेची एकच हाक, पर्यावरणचा घ्या ध्यास|

प्रदूषण रोखा, पर्यावरण राखा|

पर्यावरण रक्षण, राष्ट्राचे संरक्षण|

ओला अन कोरडा कचरा काढा वेगळा, 
गांडूळ खत निर्मितीचा नियम हा पाळा|

पर्यावरण रक्षणाची धरा कास 
तरच होईल मानवाचा विकास |

जिथे पर्यावरणाचा रास, 
तिथे प्रदूषणाचा त्रास |

राखावया पर्यावरण, 
करू चला वनीकरण|


निसर्गासारखा नाही रे सोयरा, 
गुरू, सखा, बंधू, मायबाप, 
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप, 
मिटती क्षणात आपोआप |

पुढच्या पिढीला हक्काने सांगू, 
पर्यावरणाचा तोल आताच सांभाळू..|

नका करू अंगण तुझं आणि माझं, 
पर्यावरण तर आहे सर्वांचं |

पर्यावरण वाचवण्यासाठी
उचला पाऊल, जीवन होईल
सर्वांसाठी अनुकूल |

निसर्गामधून हा धडा गिरवूया, 
पर्यावरणाचे संरक्षण करूया |


जर पर्यावरण दूषित होईल, 
तर आरोग्य निहित असेल. 
पर्यावरण वाचविण्यासाठी पाउल उचला, 
जीवनाला पर्यावरणास अनुकूल बनवा|

कचरा आणि प्रदूषण पसरले, 
दिवसाढवळ्या अत्याचार सहन करावे लागतात, 
जगायचे असेल तर मला वाचवा, 
पृथ्वी आम्हाला हाक मारायला सांगते |

झाडे लावून प्रदूषण कमी करूया, 
पृथ्वीला स्वर्ग बनवूया |

हे उदात्त कार्य करण्यासाठी 
काही तरी निमित्त असेल, 
पृथ्वीच्या रक्षणासाठी 
सर्वांना पुढे यावे लागेल |

आजूबाजूला स्वच्छता ठेवा, 
कचरा पसरवू नका, 
प्रदूषण दूर करून, 
रोज पृथ्वी दिन साजरा करा |


दूषित धरती, दूषित वायु 
और दूषित होगा यदि पानी, 
न बचेंगे मानव धरती पर, 
न बचेगी उनकी कहानी |

ज्याने आपल्याला जीवन दिले 
तो सर्व ग्रहांमध्ये विशेष आहे, 
पृथ्वी मातेचे आभार, 
ज्यावर आपण श्वास घेतो |

ती खायला अन्न देते, प्यायला पाणी देते, 
पृथ्वी मातेची काळजी घेते, 
तिची कोणतीही हानी होऊ नये |


शुद्ध हवा, शुद्ध पाणी दिले, 
कोणताही खर्च घेतला नाही, 
पृथ्वीच्या रक्षणासाठी आपणही 
काही काम केले पाहिजे |

आपल्या स्वार्थासाठी भविष्याची शिडी कापू नका, 
पृथ्वीचे रक्षण करा आणि पुढच्या पिढीकडे सोपवा|


हे पण वाचा⤵️


FAQ.
Q.1)वसुंधरा दिवस म्हणजे काय ?
ANS.Earth day म्हणून साजरा केला जातो.

Q.2)वसुंधरा दिन जगभरात कधी साजरा केला जातो ?
ANS 22 एप्रील ला साजरा केला जातो.

Q.3)अर्थ प्रथम अर्थ दिवस कोणी व कधी साजरा केला ?
ANS.अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को गेलार्ड नेल्सन यांनी 1970 मध्ये सर्वप्रथम अर्थ दिवस साजरा केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad