Type Here to Get Search Results !

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती 2022 मराठी माहिती | Dr.Babasaheb ambedkar marathi mahiti

डॉ.बाबासाहेबा आंबेडकर जयंती 2022 मराठी माहिती |Dr.Babasaheb ambedkar jaynti marathi mahiti 2022.


डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भरतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. भीमराव यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील महू गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई व वडिलांचे नाव रामजी होते.       डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. तसेच असामान्य प्रतिभावंत लेखक होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. त्यांनी मूकनायक बहिष्कृत भारत सारख्या इतर उत्तम वृत्तपत्रांचे संपादन केले. त्यांना प्रत्येक क्षेत्रात परिपूर्ण ज्ञान माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक व पत्रकारिता कायदा अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. व्यायामाने शरीर सदृढ बनते तर वाचनाने मस्तक सुधारते, मन खंबीर बनते यावर त्यांचा गाढ विश्वास होता.         भीमरावांना वाचनाची प्रचंड आवड रामजींनी लावली. शालेय शिक्षण घेताना भीमरावांना महार जातीचे असल्याने अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. त्यांचे माध्यमिक व महाविदयालयीन शिक्षण मुंबईत झाले. बडोदयाचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या आर्थिक साहाय्याने परदेशात जाऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम्. ए., पीएच्. डी. या पदव्या मिळवल्या आणि ते बॅरिस्टरही झाले.       मुंबईतील सिडनहॅम महाविदयालयात काही काळ ते प्राध्यापक होते. सरकारी विधी महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केल व नंतर काही वर्षे प्राचार्यपदही सांभाळले.उच्चवर्णीयांकडून वर्षांनुवर्षे होणाऱ्या .या  पिळवणुकीने दलित समाज भरडला जात होता. अशा या निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे अवघड कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. भीमरावांनी आपल्या समाजासाठी वकिली करण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्यांनी २० जुलै १९२४ रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली. 'शिकवा, चेतवा व संघटित करा हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते.       डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अशिक्षित बांधवांना एक दिव्य संदेश दिला, 'वाचाल, तर वाचाल.' वसतिगृहे स्थापन करून अस्पृश्य मुलांना निवासाची सोय पुरवून त्यांना शिक्षण देणे, वाचनालये काढणे, रात्रीच्या शाळा भरवणे, तरुणांसाठी क्रीडामंडळे चालवणे अशा कार्यांवर 'बहिष्कृत हितकारिणी सभेचा भर होता. आपल्या उत्तर आयुष्यात बाबासाहेबांनी 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' ही संस्था स्थापन करून मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय व औरंगाबाद येथे 'मिलिंद महाविदयालय' या संस्था काढल्या व नावारूपास आणल्या दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १९२७ मध्ये डॉ.आंबेडकरांनी महाडला 'चवदार तळे' येथे अहिंसक सत्याग्रह केला. अस्पृश्यांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशासाठीही सत्याग्रह करण्यात आला. समाजातील भेदभाव नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.     डॉ. आंबेडकरांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळावर काम केले. १९४२ साली ते केंद्र सरकारात मजूरमंत्री होते. गोलमेज परिषदेसाठी ते दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले आणि स्वातंत्र्योत्तर काळात ते स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार झाले. आपल्या बांधवांना जागृत करण्यासाठी त्यांनी विद्वत्तापूर्ण असे अनेक ग्रंथ लिहिले. मुंबईतील त्यांच्या 'राजगृह' या निवासस्थानी त्यांचा स्वत:चा फार मोठा ग्रंथसंग्रह होता.बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला.       ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे डॉ. आंबेडकरांचे महानिर्वाण झाले. 1990 साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.


नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भाषण,निबंध,कविता आणि त्यांचे विचार बघणार आहोत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जयंती मराठी  निबंध|Dr.babasaheb ambedkar jaynti marathi nibandh.

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भरतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील महू गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणी आईचे नाव भीमाबाई होते.

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. तसेच असामान्य प्रतिभावंत लेखक होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. त्यांनी मूकनायक बहिष्कृत भारत या सारख्या त्यांनी इतर उत्तम वृत्तपत्रांचे संपादन केले. भिमरावांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान माहिती होती.             
                       शैक्षणिक,आर्थिक,राजकीय,धार्मिक,सामाजिक व पत्रकारिता कायदा अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा छापा उमटवला. व्यायामामुले शरीर मजबूत बनते तर वाचनाने मस्तक सुधारते आणी मन खंबीर बनते यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. 

       भीमरावांना वाचनाची प्रचंड आवड रामजींनी लावली. शालेत शिक्षण घेत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महार जातीचे असल्यामुले त्यांना अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. त्यांचे माध्यमिक व महाविदयालयीन शिक्षण मुंबईत झाले. बडोदयाचे महाराज सयाजीराव गायकवाड आणी कोल्हापूरचे राजे शाहू महाराज यांच्या आर्थिक साहाय्याने डॉ.आंबेडकर हे परदेशात जाऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषया मध्ये एम्. ए., पीएच्. डी. ह्या पदव्या त्यांना प्राप्त झाल्या आणि ते बॅरिस्टरही झाले.

     डॉ.आंबेडकर हे मुंबईतील सिडनहॅम या प्रसिद्ध महाविदयालयात काही काळ ते प्राध्यापक होते. सरकारी विधी महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केल व नंतर काही वर्षे प्राचार्यपदही सांभाळले.उच्चवर्णीयांकडून वर्षांनुवर्षे होणाऱ्या .या  पिळवणुकीने दलित समाज भरडला जात होता. अशा या झोपेत असलेल्या समाजाला जाग करण्याचे कठीण काम डॉ. आंबेडकरांनी केले. भीमरावांनी आपल्या समाजासाठी वकिली करण्याचा निश्चय केला. डॉ.आंबेडकरानि दलितांसाठी त्यांनी २० जुलै १९२४ या रोजी 'बहिष्कृत हितकारिणी ही सभा स्थापन केली. 'शिका, जागे व्हा व संघटित होऊन संघर्ष करा हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते.

      डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अशिक्षित बांधवांना एक दिव्य संदेश दिला, 'वाचाल, तर वाचाल.' वसतिगृहे स्थापन करून अस्पृश्य मुलांना निवासाची सोय पुरवून त्यांना शिक्षण देणे, वाचनालये काढणे, रात्रीच्या शाळा भरवणे, तरुणांसाठी क्रीडामंडळे चालवणे अशा कार्यांवर 'बहिष्कृत हितकारिणी सभेचा भर होता. आपल्या उत्तर आयुष्यात बाबासाहेबांनी 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' ही संस्था स्थापन करून मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय व औरंगाबाद येथे 'मिलिंद महाविदयालय' या संस्था काढल्या व नावारूपास आणल्या दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १९२७ मध्ये भिमरावांनी महाडला 'चवदार तळे' येथे अहिंसक सत्याग्रह केला. अस्पृश्यांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशासाठीही सत्याग्रह करण्यात आला.डॉ आंबेडकरांनी समाजातील भेदभाव नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

     डॉ. आंबेडकरांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळावर काम केले. १९४२ साली ते केंद्र सरकारात मजूरमंत्री होते. गोलमेज परिषदेसाठी ते दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले आणि स्वातंत्र्योत्तर काळात ते स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार झाले.त्यांनी  आपल्या बांधवांना जागृत करण्यासाठी  विद्वत्तापूर्ण असे अनेक वेगळे ग्रंथ लिहिले.मुंबईमध्ये डॉ.आंबेडकर जिथे राहत होते तिथे 'राजगृह' नावाचा फार मोठा ग्रंथसंग्रह होता. डॉ.बाबासाहेबांनी त्यांच्या लाखो अनुयायांसोबत १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्म स्वीकारला.
      ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे डॉ. आंबेडकरांचे महानिर्वाण झाले. 1990 साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.


डॉ.बाबासाहेबा आंबेडकर मराठी कविता| Dr.Babasaheb ambedkar marathi kavita.


कवितेचे शीर्षक: चल तुला आंबेडकर दाखवतो


शोधलं अनेकांनी 
त्याला बौध्द विहारात
तो कोणालाच भेटलाच
नाही !!

शोधलं अनेकांनी त्याला
निर्जीव पुतळ्यात
तो कोणालाच भेटला नाही !!

डिजेवरती वाजवली गेली
अयथयाट करणारी गाणी
विचार त्या घटनाकाराचा
कोणाला पटलाचं नाही !!

आपटली कित्येकांनी डोकी
मिरवणुकीत नाचले तुफानी
चोरून दारू पिऊन, दिल्या घोषणा
महापुरुषांचा विजय असो अशा !!

लाखोंचा खर्च केला 
जयंतीवरती दिलखुलास
शिकून संघटित होऊन
संघर्ष करण्याचा विचार
जयंतीतून दिसलाच नाही !!

फेसबुकवर वाजवली जातील गाणी दणक्यात
टिकटॉक वरून पाजल जाईल ज्ञान भारताला
तो भीमराव कसा होता याचं !!

शोधलं जाईल त्याला मूर्तीमध्ये
पुजले जातील निर्जीव
पुतळे एका दिवसा पूरते !!

काचेच्या तस्वीरींना घातले
जातील महागडे हार
पेहेराव प्रत्येकाचा निळे फेटे आणि
सदरे एकदम डौलात !!

छातीवरती जय भिम बिल्ला
मिरवला जाईल थाटात 
दिखाऊ पणा मुळे फक्त
महापुरुषांचे भक्त व्हाल !!

विचारांना लाथाडून नकली अनुयायी बनाल
भीमराव न वाचता आचरणात न दिसता||
घ्याल भिमाच नाव छाताड फुटेपर्यंत
व्हाल चळवळीतील गद्दार !!

दिसला न मजला पुतळ्यात भीम
दिसला न मजला तस्वीरित भीम
दिसला न मजला पुतळ्यात भीम 
दिसला न मजला तस्वीरित भीम !!

ते भीमतत्व शोधलं मनातून 
पुस्तकं वाचून, ज्ञान ग्रहण करुन !!

समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व पेरणे
या विचारातच मजला आजन्म भिम
या विचारातच मजला आजन्म भिम !!

सांगणे भिमाचे अक्षय मांडती आहे
सांगणे भिमाचे अक्षय मांडती आहे
डोक्यात थे तत्व सांगतो आहे !!

नाचून कोणी मोठादिसला न मजला 
परिवर्तन जगाचे वाचून घडते आहे !!


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मराठी | Dr.Babasaheb ambedkar vichar.

  • अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो.
  • विश्वास देवावर नाही तर स्वतःच्या मनगटावर ठेवा.
  • मी नदीच्या प्रवाहाला वळवणाऱ्या भक्कम खडका सारख आहे.
  • तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणी ही जाणार नाही,वाघ बनून जगा.
  • माणसाला आपल्या दारिद्र्याची ,आपल्या गरिबीची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गंदीची.
  • मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या रांगा जेव्हा वाचनालया कडे जातील, त्यादिवशी माझ्या देशाला महाशक्ती बनण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.
  • मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.
  • ग्रंथ हेच गुरू, वाचाल तर वाचाल.
  • शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या ते स्वातंत्र्या साठी लढले पाहिजे.
  • जो मनुष्य मरायला तयार होतो, तो कधीच मरत नाही.
  • अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्या अंगी येण्या साठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.
  • जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने, त्यांच्या बुद्धीने चालतात ती माणसे निश्चितच त्यांची ध्येय गाठतात.
  • एखादा खरा प्रेमी ज्याप्रमाणे आपल्या प्रियसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे मी माझ्या पुस्तकांवर प्रेम करतो.
  • माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल.
  • स्वत:ची लायकी तुम्ही विद्यार्थी असतांनाच वाढवा.
  • जर तुमच्याकडे पैसे असतील तर काही रुपयाची भाकरी आणि काही रुपयाचे पुस्तक घ्या. कारण भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल.
  • संविधान कितीही चांगले असो, ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक नसतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही.
  • ज्या दिवशी मला वाटेल की, संविधानाचा दुरुपयोग केला जात आहे त्या दिवशी मी ते जाळून टाकील.
  • जसा माणूस उपासमारीने अशक्त होतो,तसा तो शिक्षणा अभावी जिवंतपणी दुसऱ्यांच्या गुलाम होतो.
  • जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका या जगात काहितरी करून दाखवायचे आहे अशी महत्वकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे.
  • लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.
  • नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा.
  • अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही.
  • इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सदगुण हे शोधावे.
  • मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ घालवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने सुरुवात करणे अधिक चांगले असते.
  • जीवन हे मोठे नाही तर महान असले पाहिजे.
  • शक्तिचा उपयोग वेळ आणी काळ पाहून करावा.
  • माणूस कितीही मोठा विद्वान असला जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वतःला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती घरलेल्या आंधळ्या सारखा असतो.
  • बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.
  • शब्दांना कृतींचे तोरण नसेल तर शब्द निरर्थक ठरतात.
  • मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यांची शिकवण देतो.
  • धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.
  • बौद्ध धर्म हा जगातील सर्वात महान धर्म आहे. कारण बोद्ध धर्म हा एक धर्म नसून महान सामाजिक सिद्धांत आहे.
  • कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात नाही,एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही आहे.
  • सामाजिक समतेचा बुद्धा इतका मोठा पुरस्कर्ता जगात कोणीच झाला नाही.
  • मी समाजकार्यात आणि राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.
  • मी सर्वप्रथम आणि सर्वात शेवटी भारतीयच आहे.
  • तुमच्या मताची किंमत मीठ मिर्ची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल, तेव्हा मत विकत घेऊ पाहणाऱ्याइतके कंगाल कोणीच नसेल.
  • साऱ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा. मग बघा काय चमत्कार घडतो ते.
  • मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो.
  • लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करू नये.
  • तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेऊ नये, की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल.

हे पण वाचा⤵️



FAQ
Q.1)डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय?
ANS.भीमराव रामजी आंबेडकर हे त्यांचे पूर्ण नाव आहे.

Q.2)डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला?
ANS.14 एप्रिल 1891 या रोजी झाला.

Q.3)डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा कधी स्थापन केली?
ANS.२० जुलै १९२४ या रोजी स्थापन केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad