Type Here to Get Search Results !

धनुर्वात लस का घ्यावी | why we should take TT Vaccine?

धनुर्वात लस का घ्यावी | why we should take TT Vaccine  | tetanus information in marathi

 
धनुर्वात लस का घ्यावी


नमस्कार मित्रांनो आज आपण धनुर्वात या रोगाबद्लदची माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये धनुर्वात का होतो, धनुर्वाताचे प्रकार, धनुर्वाताची कारणे, धनुर्वाताची चिन्हे व लक्षणे, धनुर्वात प्रतिबंधक , धनुर्वात काळजी व औषधी उपचार, धनुर्वात घरगुती उपाय व प्रतिबंध कसे करावे अशाप्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे पहायला मिळेल.

धनुर्वात काय आहे | what is tetanus

हा तीव्र संसर्गजन्य रोग असून (clostridium titany) या जंतुंच्या toxin मुळे होतो.
धनुर्वात हा एक भयानक स्वरूपाचा Nervous system चा आजार आहे आणि हा टॉकझीन बनवणाऱ्या बॅक्टेरिया पासून होतो.यामध्ये पाठीच्या आणि मानेच्या स्नायूंना ताठरपणा येऊन नंतर पेशंटला झटके (convulsions) येऊ लागतात या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. 
हा जगभरात दिसून येणारा रोग आहे. भारतामध्ये या रोगामुळे सामाजिक आरोग्य समस्या निर्माण झालेली आहे. अधिकृत माहिती (official statistic information) नुसार भारतात १९८४ साली 21 हजार 662 धनुर्वाताच्या केसेस आढळल्या होत्या. त्यापैकी 4077 रुग्ण मृत्युमुखी पडले होते.  
जास्त भयानक स्वरूपाचा धनुर्वात हा जिवंत हानी होन्यास कारणीभूत ठरतो. धनुर्वात यावर काही औषध नाही. औषधी उपचार ही लक्षणे आणि परिणाम यांना ठीक करण्यासाठी वापरली जातात जोपर्यंत धनुर्वात toxin समाप्त होत नाही तोपर्यंत.  
लसिचा(vaccine) उपयोग केल्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये धनुर्वाताची रुग्ण कमी दिसायला लागली आहेत. जे लोक लसीचा कोर्स पूर्ण करत नाहीत त्यांच्यामध्ये आजार हा तसाच राहिलेला असतो. आणि हे प्रगत देशांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आढळून येते.  

धनुर्वात का होतो जंतू | tetanus bacterial infection

clostridium titany हा जंतू अन्एरोबिक (anaerobic) आहे व ग्राम पॉझिटिव्ह आणि थोड्या प्रमाणात हालचाल (motility) करणारा आहे. हे spore तयार करणारे ऑरगॅनिझम आहेत. Spore वर केमिकलचा , उकळत्या पाण्याचा काहीही परिणाम होत नाही.अनुकूल परिस्थितीत जंतू spore बाहेर येऊन त्यांची वाढ व विकास होतो व ते toxin निर्माण करतात. अधिशयन काळ: ४ दिवस ते तीन आठवडे 

 

धनुर्वात जंतूचे ठिकाण: 

१) जंतू चा रुग्ण. 
२) गाईचे शेण. 
३) घोड्याची लीद. 
४) रस्त्यावरील धुळ. 
५) घाणीत या रोगाचे spore असतात. 
६) गंजलेले लोखंड. 
    या सर्व ठिकाणी जंतू हे खुप जास्त प्रमाणात आढळून येतात. 
 

धनुर्वात या रोगाचा प्रसार कसा होतो:  

१) दुषित मातीपासून. 
२) रस्त्यावरील धुळ व घानिपासुन. 
३) शेतात वापरल्या जाणाऱ्या खतापासून. 
४) गंजलेल्या लोखंडापासुन. 
५) जनावरांच्या विष्ठा यातील जंतू जखमेत जाऊन रोगप़सार होतो. 

   

वय (Age) : ज्या लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती नाही त्यांना कोणत्याही वयात हा रोग होऊ शकतो . नवजात बालकांच्या नाळेची काळजी न घेतल्यामुळे त्यांच्यात या रोगाचे प्रमाण जास्त आढळून येते. 

  

 लिंग (Gender): हा रोग होण्याचे प्रमाण मुलींपेक्षा मुलांमध्ये व स्त्रीयांपेक्षा पुरूषांमध्ये जास्त आढळून येते.

 

व्यवसाय (occupation): शेतकऱ्यांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक आढळते कारण त्यांचा खत, माती, चिखल यांच्याशी खूप जवळून संपर्क येतो.

 


धनुर्वाताचे प्रकार (types of tetanus):  

1)आघातकारी (Traumatic): जखम होऊन ती दूषित झाल्यामुळे होणारा धनुर्वात - जखम हे प्रमुख कारण आहे.   

2)प्युरपेरल (Puerperal): स्वाभाविक प्रसुतिपेक्षा गर्भपातानंतर धनुर्वात होतो. कारण गर्भपातामुळे रिकामा झालेला गर्भाशय हे धनुर्वाताच्या जंतू च्या वाढीसाठी अति योग्य ठिकाण बनते.  

 3)ओटोजेनिक (Otogenic): हा लहान मुलांमध्ये सापडणारा प्रकार आहे. कानांमध्ये आगंतुक वस्तू, पेन्सिल, काड्या घातल्यामुळे धनुर्वात होण्याची शक्यता जास्त असते.  

4)इडिओपेथिक (Idiopathic): या प्रकरामध्ये कोणतेही प्रत्यक्ष कारण किंवा जखम आढळून येत नाही. 

 5)टिटॅनस निओनेटोरम(tetanus neoneaorum): या सर्व प्रकारांपैकी हा प्रकार महत्त्वाचा मानला जातो. कारण या प्रकारच्या केसेस चे प्रमाण ही अधिक आहे व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे.  

 

धनुर्वाताची चिन्हे आणि लक्षणे | sign and symptoms of tetanus

    संसर्गाची चिन्हे व लक्षणे दिसण्याचा average वेळ (incubation period) हा दहा दिवसाचा आहे.हा इंक्युबॅशन पिरेड ची range 3 ते 21 दिवसांपर्यंत राहु शकते.

   1) ताप असेलच असे नाही. काहींना येतो तर काही नाही येत पण नाही. 

   2) रुग्ण चिडचिडा बनतो.  

   3) घाम खूप येतो. 

   4) गिळण्यास त्रास होतो. 

   5) गालाचे स्नायू, मानेचे स्नायू ताठर बनतात किंवा आखडतात. त्यामुळे जेवण करताना त्रास होतो. 

   6) प्रकाश डोळ्यांना सहन होत नाही. 

   7) अस्वस्थता येते. 

   8) मान, पाठ, डोके ताठर होते. त्यामुळे पाठीची धनुष्याकृती कमान होते. त्यास ओपोस थोटोनस असे म्हणतात. 

   9) झटके(seizures) येतात. 

  10) रूग्ण बेशुद्ध अवस्थेत असतो. 

  11) नवजात बालकांच्या बेंबीच्या ठिकाणी जंतुदोष आढळतो. 

   जसजसा आजार वाढत जातो तसतसे नवीन लक्षणे दिसायला लागतात जसे की.. 

    १) रक्तदाब वाढतो. 
    २) रक्तदाब कमी होतो. 
    ३)heart rate वाढतो. 
    ४)ताप.
    ५) जास्त घाम फुटतो.   

  

धनुर्वात झाल्यावर डॉक्टरांकडे तुम्ही केव्हा जावे: 

   धनुर्वात हा एक जीवन अवघड करणारा आजार आहे. जर तुम्हाला चिन्हे आणि लक्षणे दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे जावे. 
     जर तुम्हाला साधी आणि साप जखम आहे आणि तुम्ही दहा वर्षाच्या आत असतानाच धनुर्वाताची लस घेतलेली आहे. तर तुम्ही घरीच त्याचा उपचार करू शकता. 
   
  पुढील प्रकरणांमध्ये वैद्यकीय काळजी घ्या.. 
  -जर तुम्ही दहा वर्षाच्या आत असताना टिटॅनस शॉट घेतला नसेल. 
  -तुम्ही जाणून घ्या की शेवटचा डोस तुम्ही कधी घेतला आहे. 
  -जर तुमच्या जखमेत धूळ, माती, चिखल गेलेला असेल तर तुम्ही vaccine चा बूस्टर शॉट घेतला पाहिजे.  
  


धनुर्वाताची कारणे | Causes of tetanus 

     बॅक्टेरिया ज्याच्यामुळे धनुर्वात होतो त्याचं नाव आहे Clostridium tetani. बॅक्टेरिया हा मातीमध्ये आणि  प्राण्यांच्या विष्ठेमध्ये Dormant state मध्ये जिवंत असतो. 
     जेव्हा Dormant bacteria हा जखमेत प़वेश करतो-ही परिस्थिती बॅक्टेरियाच्या वाढीसाठी चांगली असते आणि पेशिंना कमजोर करतो.अस बॅक्टेरिया वाढतात आणि अलग होतात आणि ते tetanospasmin toxin सोडतात.हे toxin स्नायूंना control करणार्या nerve यांना impair करतात. 

 

धनुर्वात जोखिम घटक | Risk factors of tetanus 

    सर्वात मोठा संसर्गजन्य धोक्याचा घटक म्हणजे ज्यांनी लस घेतलेली नाही आणि १० वर्षांनी घेतल्या जाणार booster shot हा आहे. 

     बाकीचे घटक ज्यांच्यामुळे धनुर्वात संसर्ग होण्याचा धोका वाढतो जे की... 
 • Cuts आणि जखम मातीच्या संपर्कात येते तेव्हा. 
 • बाहेरच काही जखमेवर येत जसे की..नख आणि splinter. 
 • Immunity कमजोर असल्याने.  
 • संसर्ग झालेली त्वचा सोबत diabetic असणारे रूग्ण.  
 • Umbilical cord ला संसर्ग होतो जेव्हा मदर नी लस घेतलेली नसते. 
 • Sanitize न केलेल्या needle वापरणं. 
 

धनुर्वात प्रतिबंध | Preventions of tetanus

 • प्रतिबंधक लस टोचून घ्या. 
 • वेळीच tetanus toxoid चे इंजेक्शन द्यावे. 
 • A.T.S द्वारे passive प्रतीकारशक्ती निर्माण करावी. 
 • जखम साफ ठेवणे. 
 • ओपरेशनसाठी निर्जंतुक वस्तूंचा वापर करा. 
 • नाळ कापण्यासाठी वाटण्यात येणारी कात्री, ब्लेड निर्जंतुक करा. 

     

धनुर्वात काळजी व औषधी उपचार | tetanus care and treatment 

1) रूग्णास शांत व अंधारया रुम मध्ये ठेवावे. 

2) तिथे आवाज व गोंगाट होऊ देऊ नये. 

3)Antitetanus सिरम स्किन टेस्ट करून तातडीने देतात.

4) Penicillin,Gentamycin, Ampicillin ही Antibiotics सुरू करतात. 

5) झटके येत असल्यास Anticonvulsant मेडिसिन ची इनजेक्शन देतात. 

6) झोपेमध्ये झोपेमधे झटके कमी येतात म्हणून सेडेटिव मेडिसिन देतात.  

7) तोंडाची व डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी. म्हणूजे पेराटायटिस व कोरनियल अल्सर टाळले जातील. 

8) जखम असेल तर जखमेची ड्रेसिंग करून जखम साफ ठेवावी. जखमेच्या स्वच्छतेसाठी हायड्रोजन पेरॉक्साइड (H2O2) चा वापर करावा. 

9) नाकातून जठरात नळी घालून सर्व प्रकारचे अन्न घटक मिळतील असा द्रव आहर (liquid diet) घालावा. 

10)इनटेक आउटपुट चार्ज ठेवावा व सर्व दैनंदिन परिचर्या काळजीपूर्वक करावी. 

 

धनुर्वात विपरीत परिणाम | tetanus side effects : 

योग्यप्रकारे काळजी घेतल्यास व ताबडतोब उपचार केल्यास विपरीत परिणाम होत नाहीत. सिरम ची रिॲक्शन येणे किंवा रेस उठणे यासारखे परिणाम मिळतात.  

 

धनुर्वाताचे घरगुती उपचार | tetanus home remedies 

१) रक्त थांबवा. 

  
२)जखम साफ करा. 

 
३)Antibiotic वापरा.  


४)जखमेला झाकावे.  


ड्रेसिंग बदला.  


६)विपरीत परिणाम थांबवा.
 


हे पण वाचा ⤵️
FAQ
Q.1) धनुर्वात का होतो ?
Ans.(clostridium titany) या जंतुंच्या toxin मुळे होतो.

Q.2) धनुर्वात रोगाचा incubation period कीती आहे ?
Ans.धनुर्वात रोगाचा incubation period 3 ते 21 दिवसापर्यंत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad