Type Here to Get Search Results !

डांग्या खोकला काय असतो | What is Whooping Cough

डांग्या खोकला काय असतो |What is Whooping Cough | whooping cough information in marathi

     
डांग्या खोकला काय असतो

नमस्कार मित्रांनो आज आपण डांग्या खोकला या भयानक रोगाबद्दलची माहिती बघणार आहोत त्यामध्ये डाग्या खोकला होण्याची कारणे, डांग्या खोकल्याची लक्षणे, लस, औषधी उपचार, घरगुती उपाय ही सर्व माहिती आपल्याला खालील लेखात पहायला मिळेल.

डांग्या खोकला मराठी माहिती | whooping cough information in marathi 

डाग्या खोकला (whopping cough) हा एक मोठा संसर्गजन्य आजार आहे. ह्या आजारामध्ये श्वसनमार्गाचे संक्रमण फार मोठ्या प्रमाणात होते. या आजाराची सुरुवात ही अचानक होते व  सुरुवातीला सर्दी, पडसे ही लक्षणे दिसतात व कालांतराने परिस्थिती गंभीर स्वरूपाची होऊन खोकला येतो आणि खोकलत असताना उबळ हुप असा आवाज येतो. 

लस(vaccine) निर्माण होण्याच्या अगोदर डांग्या खोकला (Whooping Cough)हा लहान मुलांचा आजार मानल्या जात होता. आजच्या काळात डांग्या खोकला (Whooping Cough) हा सुरुवातीला लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत आढळून येतो. ज्या मुलांची (Adult.teenagers) रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्या मुलांनी लस (vaccine) घेण्याचा कोर्स पूर्ण करावा.  

डांग्या खोकल्याने(Whooping Cough) मृत्यू होण्याचा धोका खुप कमी प्रमाणात आढळून येतो पण नवजात बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो.यामुळे हे गर्भवती महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहे-आणि दुसरे लोक जे नवजात बालकांच्या जवळ असतात त्यांनी डांग्या खोकल्याची लस(vaccine) घेणे गरजेचे आहे.  
 

  डांग्या खोकल्याची कारणे | Couses of Whooping Cough:  

     डांग्या खोकला हा एका प्रकारच्या bacteria मुळे होणारा आजार आहे त्याच नाव आहे  Bordetella Pertussis.जेव्हा एखादा आजारी व्यक्ती शिंकतो किंवा खोकलतो त्या वेळी bacteria असलेले लहान droplets हवेमध्ये पसरतात आणि जर एखादा व्यक्ती जवळ असेल तर श्वसनमार्गाद्वारे जंतू आत प्रवेश करतात.  
 
डांग्या खोकल्याची वॅक्सिंग तुम्ही लहान असताना घेतली असेलच पण ही लस घ्यायला  टीनेजर किंवा अडल्ट मुले  विसरतात आणि त्यांना डांग्या खोकल्याच्या प्रादुर्भावाला सामोरे जावे लागते. 
 
जी लहान मुलं बारा महिन्यांचे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे आहेत ज्यांनी vaccine घेतलेली नाहीये किंवा डॉक्टरांनी सांगितलेला लसीचा कोर्स पूर्ण केलेला नाही त्यांना सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेशन आणि मृत्यूचा धोका आढळून येतो.  
    
  हवामानातील बदलामुळे (environmental factors):थंड किंवा उष्ण वातावरणात बदल पाहिल्या प्रमाणे उष्ण वातावरणात डांग्या खोकला होण्याचे चान्सेस कमी असतात. सगळ्या ऋतूंमध्ये डांग्या खोकल्याचे रुग्ण असतील तरीही मार्च आणि एप्रिल या महिन्यात रुग्णांचे प्रमाण खूप जास्त असते.
 

डांग्या खोकल्याची लक्षणे | symptoms of whooping cough

 जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा डांग्या खोकल्याचा संसर्ग होतो त्यावेळी चिन्हे व लक्षणे दिसून यायला सात ते दहा दिवस लागतात केव्हा केव्हा तर ते जास्त दिवसही राहू शकतात.साधारनता पहिल्यांदा जास्त त्रास देतात आणि सर्दी सारखी दिसू लागतात. 
  • नाक गळणे. 
  • नाक गच्च होणे. 
  • लाल आणि पाणावलेले डोळे दिसतात. 
  • ताप येतो. 
  • खोकला येतो. 
  • सर्दी होते.  
एका आठवड्यानंतर चिन्हे व लक्षणे खूप वाईट दिसायला लागतात. श्वसन नलिका मध्ये थिक mucus अडकायला लागतो. सतत खोकलाा चालू असतो. भयानक आणि जास्त वेळ खोकलाा असल्यामुळे हे दिसून येते.. 
  • उलटी होते (vomiting). 
  • लाल आणि निळा चेहरा.(red and blue face)
  • खूप थकवा जाणवतो. 
  • पहिल्यांदा साधा खोकला असतो व नंतर त्याचे रूपांतर एका विशिष्ट रूपात होते. खोकला इतका भयानक असतो की सारखा सारखा खोकला  येऊन लहान मुल लाल भडक पडतात आणि श्वास रोखलयासारखा होऊन हुप असा आवाज होतो व उलटी होते.   

 

डांग्या खोकला झाल्यास डॉक्टरांकडे कधी जावे:

जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला सतत खोकला येत असेल तसेच त्या सोबत  
  • उलटी  
  • Cough लाल किंवा निळा 
  • श्वास घ्यायला त्रास 
  • श्वास घेताना हुप असा आवाज  
असं सर्व काही होत असेल तरच डॉक्टरांकडे जावे. 
 

डांग्या खोकल्याचे विपरीत परिणाम | side effects of whooping cough

Teenager आणि adult यांना डांग्या खोवल्या पासून रिकव्हर व्हायला काहीच अडथळा येत नाही. केव्हा प्रॉब्लेम येतो जेव्हा की डांग्या खोकल्याचे विपरीत परिणाम जसे की...  
  • Ribs ला चिरा पडतात 
  •  हर्निया 
  • स्किन वरील शिरांना damage होतो, डोळे पांढरे होतात.  
जी लहान मुलं सहाा महिन्याच्या आतील आहेत त्या मुलांना डांग्या खोकल्याचे विपरीत परिणाम जसे की.. 
  • निमोनिया. 
  • हळु किंवा थांबतो श्वास. 
  • जेवण्याच्या त्रासामुळे वजन कमी, dehydration. 
  • तिरंगी /फेफरे.
  • मेंदूला दुखापत. 
लहान मुलांना डांग्या खोकलायापासून खूप मोठा धोका
 असतो.  त्यांना लवकरात लवकर उपचारांची गरज असते.
 


डांग्या खोकल्यापासून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्यावी | Preventions of whooping cough

डांग्या खोकला रोखण्यासाठी सगळ्यात भारी उपाय म्हणजे Pertussis vaccine . डॉक्टर यासोबतच combination मध्ये आनखी दोन भयानक रोगासाठी लस देतात (diptheria and titanus). डॉक्टर सुचवतात की मुले लहान असताना त्यांना लस द्यावी.  

 या लसीची एकुण पाच injection ची सिरिज आहे. साधारणता त्यांना या वयामध्ये त्यांना दिली जाते.. 
  • दोन महिने. 
  • चार महिने. 
  • सहा महिने. 
  • पंधरा ते अठरा महिने. 
  • चार ते सहा वर्षे.  
  1. मुलास स्वतंत्र ठेवावे. 
  2. गरम कपडे घालावेत. 
  3. मुलांना थंड वार्‍यापासून सुरक्षित ठेवावे. 
  4. ताप असेपर्यंत साधा आहार खावा. 
  5. शक्यतो मुलांना शांत बसवण्याचा प्रयत्न करावा कारण त्यामुळे खोकला येणार नाही. 
  6. कपड्यांचे निर्जंतुकीकरण करावे. 
  7. छाती शेकावे. 

लसीचे विपरीत परिणाम (side effects): 

     लसीचे विपरीत परिणाम हे जवळजवळ मोठी असतात जसे की ताप, डोकेदुखी, थकवा आणि दुःख होते जिथे लस घेतली तीथे. 
 

लसीचा बुस्टर शॉट (booster shot) कधी घ्यावा :

  • Adolescence(पौगंडावस्थेतील):       

      रोगप्रतिकारक क्षमता यामुळे Pertussis vaccine  मुलांना अकरा या वयात देतात. डॉक्टर सुचवतात की booster shot याच वयात डांग्या खोकला,डिपथेरिया आणि धनुर्वात यांचा घेणे आवश्यक आहे. 
 

  • तारूण्य (Adult): 

      काही प्रकारांमध्ये प्रत्येक दहा वर्षांमध्ये डिप्थीरिया आणि धनुर्वात लस हि सुद्धा डांग्या खोकल्यापासुन वाचण्यासाठी वापरली जाते. ही लस तुमचा डांग्या खोकला लहान मुलांमध्ये पसरवण्या पासूनचा धोका सुद्धा कमी करते. 
 

  • गर्भवती महिला (pregnant women): 
       आता डॉक्टर सुचवतात की गर्भवती महिलांनी गर्भधारणेच्या २७ ते  ३६ आठवड्यांच्या मध्ये Pertussis vaccine घ्यावी.  हे तुमच्या लहान बाळाच्या आयुष्याच्या  पहिल्या काही महिन्यांपर्यंत रक्षण करू शकत.३६गभ

  

डांग्या खोकला तुम्ही कसा ओळखाल | Diagnosis of whooping cough

  डांग्या खोकला हा ओळखायला खूप अवघड असतो कारण सर्दी, फ्लू, ब्रोंकाइटिस यांची चिन्हे व लक्षणे सारखीच दिसून येतात. 

काहीवेळ डॉक्टर चिन्हे व लक्षणांवरून ओळखु शकतात किंवा काही मेडिकल टेस्ट करून जसे की... 

  •  छातीचा एक्स-रे: 
  • रक्त तपासणी: 
  • नाक आणि घसा culture तपासणी: 

 

डांग्या खोकला औषधी उपचार | treatment of whooping cough

अँटिबायोटिक treatment: 
  • क्लारिथरोमाइसिन (clarithromycin) bacteria च्या growth ला थांबवतो. ब्रँड नाव (claribid 500,250mg,crixan gel) 
    
  • ईरिथरोमाइसिन (Erythromycin) bacteria ला वाढण्यासाठी लागणारा protein ला थांबवतो. ब्रँड नाव (Althrocin 500,250mg ,Erythocin,Altocin-Ds) 

  • अझिथोमाइसिन(Azithromycin) हा अँटिबायोटिक आहे आणि बॅक्टेरिया synthesis साठी लागणारा प्रोटीन याला ब्लॉक करतो.bacteria चया growth ला पूर्णपणे थांबवतो. ब्रँड नेम (Azithral 500,Aze 500,Azicip 500).  
    
अँटीपायरेटिक treatment: याचा उपयोग ताप ह्या लक्षण रोखण्यासाठी होतो आणि जी केमीकल मेशेंजर ताप आणि पेन साठी कारणीभूत असतात त्यांला ब्लॉक करतात . उदाहरणार्थ पेरासिटामोल (paracetamol or Acetomenophen). 
 
सर्दी रोखण्यासाठी Antiallergic मेडिसिन: याचा उपयोग सर्दीची लक्षन कमी करण्यासाठी होतो. 
उदाहरणार्थ (citrizine.leocitrizine, Diphenhydramine). 
   

 वरील औषधी उपचार ही डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यावे ही विनंती.


डांग्या खोकल्यासाठी घरगुती उपाय | home remedies of whooping cough

      खालील काही घरगुती tips वापरून पहा डांग्या खोकला ठीक करण्यासाठी.  
 

  • पुरेसा विश्राम करा:  एकांत, थंड आणि अंधारी बेडरूम ही तुम्हाला रिलॅक्स आणि चांगल्या आरामासाठी मदत करु शकते.   

   

  • भरपूर दृव प्या: पाणी, ज्युस ही चांगली choices आहेत. लहान मुलांमध्ये dehydration ची लक्षणे दिसुन येतात जसे की ..कोरडे ओठ,बिना अश्रूंच रडण आणि सतत मुत्रविसरजन करणं.

  • कमी खावे: खोकल्या नंतर उलटी करण्यापासून वाचण्यासाठी कमी खावे. 

 

  • हवा साफ असावी: तुमचं घर हे खोकलयाला प्रवृत्त करणाऱ्या पासून साफ ठेवाव जसे की.. तंबाखूचा धुर, फटाक्यांचा धूर. 

 

  • प्रसारण प्रतिबंधित करा: तुमच्या खोकल्याला थांबवा आणि हात नीट धुवा, जर तुमच्याजवळ कोणी असेल तर मास्क घालावा.

 

वरील सर्व माहितीही अचूक असून या माहिती वाचून आनंद घ्यावा.



हे पण वाचा ⤵️








FAQ
Q.1) डांग्या खोकल्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ?
Ans.डांग्या खोकल्याला इंग्रजीमध्ये whooping cough  म्हणतात.

Q.2)  डांग्या खोकला कोणत्या जंतुमुळे होतो ?
Ans.Bordetella Pertussis या जंतुमुळे डांग्या खोकला होतो.



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad