Type Here to Get Search Results !

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन शायरी | Marathwada Mukti sangram din shayari

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन शायरी | Marathwada Mukti sangram din shayari | मराठवाडा मुक्ती संग्राम दिन शेर शायरी | मराठवाडा मुक्ती संग्राम दिन चारोळ्या | Marathwada Mukti sangram din charolya 


मराठवाडा मुक्ती संग्राम दिन : नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या दिवसा बद्दल शेर शायरी बघणार आहोत.जसे की आपल्याला शाळेमध्ये भाषणात, निबंध लिहताना त्याचा वापर होतो ते खालील दिलेल्या शायरी आपण वाचाव्यात अशी नंब्र विनंती.

150 वर्षांच्या गुलामगिरीनंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश्याला स्वतंत्र मिळाले. परंतु मराठवाड्यावर निजमांची सत्ता होती.या निजामाच्या अन्यायाला आणि अत्याचाराला जनता खूप कंटाळली होती.या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाखाली एक चळवळ उभारण्यात आली.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन शायरी | Marathwada Mukti sangram din shayari 


अखंड महाराष्ट्राची, मीच शान आहे! 
मराठी भाषेचा, मी अभिमान आहे!!
मराठवाडा मी, आलीशान आहे!
आघात किती झाले, तरी पाषान आहे!!

भेटले होते स्वातंत्र्य, तरी होतो आम्ही पारतंत्र्यात ! झाला चोहीकडे प्रकाश, तरी मराठवाडा अंधकारात !! पेटले ते पुन्हा पेटले स्वातंत्र्यासाठी, निधड्या छातीचे रणात ! देश सारा उजळे मराठवाडा, जिंकला भारताच्या हृदयात !!

निजाम तोंडघशी पडला...
मराठवाडा भारताचा झाला ...!
हजारो सलाम या दिवसाला... 
महाराष्ट्राचा हा एक राष्ट्रीय सण झाला...!!

महाराष्ट्राच्या शिरपेचात रोवून मानाचा तुरा मराठवाडा गातो गुलामगिरी मुक्ततेची गाथा !
निजामशाहीला दाखवून दिला लढवय्या बाणा लोहपुरुषांच्या चरणी झुकवू आदराने माथा !!

थोर संतांचा येथे निवारा!
त्यात निजामाचा बसला डेरा !! 
क्रांतीची ही धगधगती ज्वाला ! 
मराठवाडा सोडुनि निजाम पळाला !!

जरी जाहला स्वतंत्र भारत देश !
मराठवाडा होता निजामाचा प्रदेश !!
लोहपुरुषाने फौजेला दिला आदेश !
मराठवाडा मुक्तीसंग्राम देतो राष्ट्रीय एकतेचा संदेश !!


मराठवाडा आमुचा मान, सन्मान अन अभिमान 
म्हणून तर उत्साहाने साजरा करू
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन !!

सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपले 
कणखर नेतृत्व दाखविले ! 
जुलमी निजामशाहीस देशबांधवा
समोर झुकविले !!

मराठवाड्यातून वाहतात पूर्णा, पैनगंगा
मांजरा, सिंधफना गोदावरी !
हिऱ्या मोत्यांनी बहरली 
आमची शिवार सारी !!

माझ्या मराठवाड्यात यादवांची राजधानी ! 
जगप्रसिद्ध इथली अजिंठा वेरूळ लेणी !! 
साऱ्या जगात नावलौकीक आहे
आमची पैठणी !!

अशा या संपन्न मराठवाड्याचा मला 
आहे अभिमान ! 
म्हणून तर गातो मी मराठवाड्याचे
गुणगान !!


हे पण वाचा ⤵️

FAQ
Q.1)मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा करतात ?
Ans.मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर या दिवश साजरा करतात.

Q.2) भारत देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले ?
Ans.15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश्याला स्वतंत्र मिळाले.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad