Type Here to Get Search Results !

स्वतंत्र्य दिवस सूत्रसंचालन मराठी | Independence Day Sutrasanchalan Marathi

स्वातंत्र्य दिवस सूत्रसंचालन मराठी | Independence Day Sutrasanchalan in Marathi


स्वतंत्र दिवस सूत्रसंचालन मराठी


स्वातंत्र्य दिवस 2022 नमस्कार मित्रांनो प्रत्येक कार्यक्रमती सूत्रसंचालकाच्या प्रभावी बोलण्यामुळे कार्यक्रम उठून दिसत असतो त्यासाठी हवी असतात दमदार वाक्य आणि आकर्षक चारोळ्या हे सर्व आपण बघणार आहोत.  

अनुक्रनीका (toc)

स्वातंत्र्य दिवस सूत्रसंचालन मराठी | Independence Day Sutrasanchalan in Marathi


 • कार्यक्रमाची सुरुवात:
आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन !

" उत्सव आज तीन रंगांचा,
उत्सव आज देशप्रेमाचा !
उत्सव आज प्रत्येक भारतीयाचा,
उत्सव आज स्वातंत्र्य दिनाचा !!"

    दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेला आपण स्वातंत्र्यदिन उत्साहात, आनंदात आणि जल्लोषात साजरा करतो. कारण आजच्याच दिवशी इंग्रजांच्या जुलमी सत्तेच्या वेडीतून आपली भारतमाता मुक्त झाली. आजचा हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचे पर्व, आजचा दिवस देशभक्तीचे स्फुरण चढलेला प्रत्येक भारतीयाचा गर्व! तर चला मग सुरुवात करुया, आजच्या या पावन सोहळ्याला.....

" सर्वजण ज्या मंगल दिवसाची, 
पहात होते आतुरतेने वाट ! 
रविकिरणांनी मिटला अंधार, 
उजाडली स्वातंत्र्यदिनाची पहाट !
भारतमातेला वंदन करुनी, 
करतो मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात !!"

 • मान्यवरांचे स्वागत:
सभा मंचकावर विराजमान झालेल्या सर्व मान्यवरांचे तसेच या प्रांगणात जमलेल्या शारदेच्या मानकऱ्यांचे सहर्ष स्वागत....

मानून आमुचे अतीत 
झालात आपण उपस्थित...
आधी आभार मानून आपले 
करितो आम्ही स्वागत....


स्वागत ! स्वागत ! स्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !! देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला, देशभक्तीचा सुगंध दरवळलेला, तिरंग्याच्या रंगात रंगलेला, आजचा हा मंगलमय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा ! सर्वप्रथम मी.............. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो व कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत करतो. 

" झाला आज जनसमुदाय गोळा, 
भरला आज मान्यवरांचा मेळा !
आपणा सर्वांचे स्वागत करितो प्रेमभावे, 
स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा !!"


अध्यक्ष निवड :

     कार्यक्रमाची पुढील आणि महत्त्वाची पायरी म्हणजे अध्यक्ष निवड ! कोणताही कार्यक्रम म्हटला की, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी, कार्यक्रमाची धुरा सांभाळण्यासाठी अध्यक्षांची गरज असते..... 

'जीवन जगत असताना संगत असते मित्रांची, 
" सोडवण्या अवघड उदाहरणे मदत होते सूत्रांची ! शोभा वाढवण्या कार्यक्रमाची, 
मदत होते अध्यक्षांची......."


आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान..................यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो.

अनुमोदन -

    आताच.................सरांनी / मॅडमांनी जी सूचना मांडली त्यास मी आपणा सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो.

 • प्रतिमापूजन / दीपप्रज्वलन / ध्वजारोहण :
"अतिथीच्या आगमनाने उजळले भुवन,
दीपाच्या तेजातून येतील मांगल्याचे क्षण !
बुद्धीच्या स्वरूपासही व्हावे भावपूर्ण नमन, 
संस्कृतीचा सन्मान करूयात दीपप्रज्वलन....."

"भ्रष्टाचार, अज्ञानाचा अंधार दूर सारण्या,
मनामनात देशप्रेमाचा दीप पेटवूया !
करुनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन, 
तेज कार्यक्रमाचे वाढवूया...."

संस्कृती आहे आपली प्रकाशाची
शितलता आहे त्यात चंद्राची 
दिपप्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची
हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची
अशा या प्रसंगी मी मान्यवरांना
दिपप्रज्वलनासाठी विनंती करतो....

    उपस्थित सर्व मान्यवरांना ही विनंती करतो की, त्यांनी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करावे. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय..................... यांनी ध्वजस्तंभाचे पूजन व ध्वजारोहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो.

(मान्यवर ध्वजस्तंभाकडे जाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना सावधान स्थितीत राहण्याची ऑर्डर देण्यात यावी, ही जबाबदारी क्रीडा शिक्षकाने एका शिक्षकाने घ्यावी. मान्यवरांनी ध्वजारोहण करताच उपस्थित सर्वांना ध्वजास सलामी देण्याची ऑर्डर द्यावी व राष्ट्रगीतास सुरुवात करण्यात यावी. राष्ट्रगीत संपल्यानंतर घोषणा देण्यात याव्यात.) भारत माता की जय ! भारत माता की जय !! भारत माता की जय !!! ( विजयी विश्व तिरंगा प्यारा.... या झेंडागीताचे गायन घेण्यात यावे व गीत झाल्यानंतर) सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो.


 • मान्यवर परिचय व स्वागत :
 1. व्यासपीठावरील मान्यवरांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा नुसार परिचय करून देण्यात यावा.
 2. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व इतर मान्यवर या क्रमाने....
 3. पुस्तक स्वरुपात / झाडाचे रोप देऊन / तुमच्या नियोजनानुसार मान्यवरांचे यथोचित स्वागत करावे.
 • कार्यक्रमाचे प्रास्ताविक :
"आजचा सोहळा आहे मांगल्याचा- आनंदाचा, आजचा सोहळा आहे स्वातंत्र्यदिनाचा ! 
विकासाकडे वाटचाल करावी भारताने दिवसागणिक, बोलावितो मी ......................सरांना/मॅडमांना सादर करण्या प्रास्तविक..."

प्रास्ताविक :

"उत्सव आज तीन रंगांचा सजला,
स्वातंत्र्यदिन सोनियाचा आज आला. 
देशभक्तीच्या रंगात सारा देश रंगला, 
अभिमानाने आज तिरंगा फडकला !"

आजच्या या पावन सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करतो व माझ्या प्रास्ताविकास सुरुवात करतो..........

       आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यदिन ! परंतु आज आपण हा दिवस मुक्तपणे साजरा करू शकतो. कारण गेल्या दीड दोन वर्षापासून कोरोनाने आपल्या देशावर, संपूर्ण जगावर घातलेले थैमान ! कोरोनाची पहिली लाट गेली, दुसरी लाट गेली आणि आता तिसरी लाट येऊन खूप लोक मृत्यू पावली.आता कोरोनाचा प्रभाव कमी असला तरी सुद्धा आपण योग्य ती काळजी घ्यावी,आणि आजचा स्वातंत्र्य दिवस साजरा करूया.महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक,स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, अशा अनेक महापुरुषांच्या प्रयत्नांतून; भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बाबू गेनू, शिरीष कुमार अशा अनेक क्रातिकारकांच्या बलिदानातून स्वातंत्र्याची पहाट उगवली......

"तोड चुके हैं, गुलामी की जंजिरे, 
आजादी हमने पायी हैं। 
आजाद पंछी है हम, 
खुशियों की घडी आज आई है।"

    मित्रांनो, स्वातंत्र्यदिन असा उत्सव आहे, जो आपणास आपल्या राष्ट्रीयत्वाची, बंधुत्वाची, देशप्रेमाची, महान नेत्यांची, स्वातंत्र्यसैनिकांची, क्रांतीकारकांची आठवण करून देतो. देशाविषयी असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देतो. केवळ सोशल मीडियावर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे ! आपले घर, परिसर जरी आपण स्वच्छ ठेवला तरी ते देशप्रेम आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन, पाण्याचा काटकसरीने वापर आपण नक्कीच करू शकतो आणि आज या कोरोनाच्या महामारीत शासन निर्देशांचे पालन करणे, नियमित मासक, सुरक्षित अंतर व स्वच्छता या त्रिसुत्रीचा...
वापर करणे, अठरा वर्षांवरील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे हे देखील देशप्रेमच आहे. शेवटी मी एवढेच म्हणेन की.......

"आजच्याच दिवशी तुटली होती बेडी गुलामीची,
भारतीय स्वातंत्र्याच्या या सोनेरी दिवसाला,
आजच्याच दिवशी उगवली होती पहाट स्वातंत्र्याची! चला संकल्प करू हरवूया कोरोनाला......

जय हिंद ! जय भारत !!


 • विद्यार्थी व शिक्षकांची भाषणे :

प्रास्ताविक वाचनानंतर क्रमवार विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे घ्यावीत. आपल्या नियोजनानुसार इतर कार्यक्रम स्पर्धा घ्याव्यात.

 • अध्यक्षांचे मनोगत :

"मुस्कान आपकी हमारे लिए वरदान हैं, 
आपका मार्गदर्शन हमारे लिए सन्मान हैं। 
आप आये रब हम पर मेहरबान हैं, 
बडे नसीबोंवाले है हम जो आप हमारे मेहमान हैं।"

    आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष................यांना मी विनंती करतो की, त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे.


 • आभार प्रदर्शन :

आभार प्रदर्शनापूर्वी :

काही नाती नावापुरती असतात 
आणि काही नात्यांना नाव नसतं 
आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात 
कारण त्याचं ह्रदयातच एक गाव असतं

आभार आपले मानावे किती ? 
असाच स्नेह असूद्या आमच्याप्रती !
के मार्गदर्शन दिले नवविचार, 
धन्यवाद आपले खूप खूप आभार !!" 
" मान्यवरांसोबत जमला जनसमुदाय,
जमले श्रोतागण, प्रेक्षक, ग्रामस्थ !
दिला टाळ्यांनी भरभरून प्रतिसाद, 
आपणा सर्वांचे लाख लाख धन्यवाद!!"

      पुनश्चः एकदा आपणा सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला, असे जाहीर करतो.

 • खाऊ वाटप व समारोप :   
     खाऊ वाटप कुटे व केव्हा होणार आहे हे सर्वांना सांगायचं आहे.

भारत माता की जय, धन्यवाद !

    अश्या प्रकारे आपण स्वतंत्र दिवसा बद्दल आकर्षक सूत्रसंचालन बघितलं आहे अशी नविन नविन महिती बघण्यासाठी आमच्या साईट ल भेट द्या धन्यवाद.हे पण वाचा⤵️FAQ
Q.1) स्वतंत्र दिवस कधी साजरा केला जातो ?
Ans.१५ ऑगस्ट ला स्वतंत्र दिवस साजरा केला जातो.

Q.2)ध्वजारोहण करतानि विद्यार्थ्यानी कोणत्या स्थितीत ऊभे राहिले पाहिजे ?
Ans.ध्वजारोहण करते वेळस सावधान स्थितीत ऊभे राहिले पाहिजे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad