Type Here to Get Search Results !

९ ऑगस्ट क्रांती दिन भाषण निबंध मराठी माहिती | 9 August Revolution Day Speech Essay Marathi Mahiti

९ ऑगस्ट क्रांती दिन भाषण निबंध मराठी माहिती | 9 August Revolution Day Speech Essay Marathi mahiti | Kranti din bhashan marathi pdf


९ ऑगस्ट क्रांती दिन भाषण निबंध मराठी माहिती


9 ऑगस्ट क्रांती दिन 2022: भारताला इंग्रजाच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहूती दिली.त्यांच्या आठवणीचा दिवस म्हणजे क्रांती दिन तर आपण क्रांती दिणाबद्दल भाषण, निबंध आणि कविता बघणार आहोत.


अनुक्रनिका (toc)

९ ऑगस्ट क्रांती दिन भाषण मराठी | 9 August Revolution Day Speech in Marathi 


"आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला 
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला."

        क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन 
ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य करण्या साठी ज्या महान अश्या हुतात्म्यांनी त्यांच्या प्राणाची थोडीही पर्वा न करता आपल्या प्राणाची आहुती दिली,अश्या महान हुतात्म्याच्या त्यागाची आठवण राहण्यासाठी आपण दरवर्षी 9 ऑगस्ट या रोजी क्रांती दिन साजरा करतो.


     7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर (क्रांती मैदान) राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले होते. अधिवेशन झाल्यावर दुसऱ्या दिवशी पंडित जवाहर नेहरूं यांनी मांडलेला "छोडो भारत" हा ठराव मंजूर झाला. ठराव मंजूर झाल्यावर गांधीजींच्या  नेतृत्वाखाली पूर्ण भारत भर अहिंसक आंदोलन करण्याचा निर्णय घेन्यात आला. नंतर महात्मा गांधीजींनी सर्व लोकांना सांगितलं करेंगे या मरेंगे या भावनेने बलीदन सिद्ध होण्यासाठी गांधीजींनी स्फूर्तिदायक आवाहन केले.
     सर्व देशात ब्रिटिशांच्या सत्तेला हाकलून लांवण्यासाठी सर्व देशात आंदोलनाला सुरूवात झाली. ब्रिटिश सत्ता हादरून गेली होती. त्यामूळे ब्रिटिश सरकारने हे आंदोलन देशभरात पसरणार म्हणून  ब्रिटिश सरकारने 9 ऑगस्ट या रोजी सकाळी गांधीजी, पंडित जवाहर नेहरू,आझाद, वल्लभ भाई अश्या नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकरत्याना  पकडून ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले.आणि पोलिसांनी आंदोलनात सहभानी असलेल्या लोकांवर लाठी हल्ले आणि गोळीबार केला तरीसुद्धा लोक घाबरले नाही.    
     'चले जाव' चळवळीला सर्व थरातून पाठिंबा मिळाला. ज्यावेळी 'चले जाव' चळवळीचा जोर कमी होत आहे असे ब्रिटिश सरकारला वाटू लागले होते त्याचवेळी भूमिगत चळवळ आकारास येऊ लागली होती. भूमिगत चळवलिमध्ये बॉम्ब तयार करणे, शस्त्र अस्त्र चालिवण्याच प्रशिक्षण देणे, गुप्त रेडिओ केंद्र चालवणे अशे अनेक काम या भूमिगत चळवळीतील नेत्यांनी केली. भूमिगत चळवळीतील प्रमुख भूमिगत नेता म्हणून डॉ राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, चोटुभाई पुराणिक,युसुर मेहेर आली, उष्या मेहता, एम एम जोशी,अच्युतराव पटवर्धन,अरुणा असफअली, सुचेता कृपलानी अश्या अनेक नेत्यांचा उल्लेख करता येईल सरकारी यंत्रणेला नुकसान पोहचविणे हे या चळवळीचे मुख्य सूत्र होते.
     देशभरातील काही भागातील ब्रिटिश अधिकाऱ्यांना हाकलून लावले आणि तिथे लोकाभिमुख सरकारे स्थापन झाली, यालाच प्रतिसरकार असे म्हणतात. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यांत प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली.आणि महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली प्रतिसरकार खूप विशेष प्रमाणात गाजली होती.कारण दीर्घकाळ अस्तित्वात् राहिलेले आणि इंग्रजी सत्तेला शेवटपर्यंत दाद न दिलेले असे हे एकमेव प्रतिसरकार होते.आणि या मुळे ब्रिटिशांचे नीतीधैर्य खाच्ची करण्यात प्रती सरकारचा सर्वत्र महत्वाचा वाटा होता.
        'चले जाव' चळवळीने देशभरात आंदोलन सुरू झाली. स्वातंत्र्य मिळण्याच्या साठी लाखो भारतीयांनी असीम त्याग केले. अनेक भारतीयांनी आपल्या प्राणाच बलीदन देले. आंदोलनातील लोकांची संख्या येवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने होती कि, त्याना तुरुंगात डांबून देवण्यासाठी देशातील तुरुंग ही कमी पडले. साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला. या गाजलेल्या आंदोलनाला  'ऑगस्ट क्रांती' असेही म्हटले जाते.
        'चले जाव' चळवळ म्हणजे भारतीयांना ब्रिटिश यांच्या गुलामगरीतून मुक्त होण्याचा एक मोठा भरभक्कम पाऊल होता. आपल्या देशासाठी सतः प्राणाची बाजी लावण्याची सुद्धा लोकांची तयारी झाली होती. भारतीय जनता आपल्या विरोधात गेली असून आता आपण भारत देशावर फार काळ राज्य करू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना झाली. 

     आपल्या भारत देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व अमर हुतात्म्यांना माझे कोटी-कोटी प्रणाम ...... धन्यवाद.

९ ऑगस्ट क्रांती दिन निबंध मराठी | 9 August Revolution Day eassy in Marathi 


देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीच
रणशिंग फुंकणाऱ्या सर्व सेनानींना
आज क्रांतीदिनी रात-शत नमन !

     इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशालामुक्त करण्यासाठी
ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट अर्थात क्रांतीदिन  स्वातंत्र्यलढ्यातील मशाल पेटवत इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत देशातून करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस.इंग्रजानी भारताला स्वतंत्र करण्यासाठी दिलेला शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाच सुरुवात झाली. महात्मा गांधीनी 
     अभिवादन करण्याचा हा दिवस इंग्रजानी भारताला स्वतंत्र करण्यासाठी दिलेला शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाची सुरुवात झाली. महात्मा गांधीनी देशभर ऑगस्ट क्रांती आंदोलनाची घोषणा केली. 9 ऑगस्ट 1942 रोजी चळवळ सुरू झाली परंतु ब्रिटिश राजवटीने त्वरेने कारवाई केली, त्यांनी गांधीजींना, सरदार पटेल, मौलान अबूल कलाम अशा साऱ्या महत्त्वच्या नेत्यांना अटक केले मात्र त्यामुळे आंदोलन थांबले नाही तर गांधीजींना, सरदार पटेल, मौलान अबून कलाम उफाळून आले.9 ऑगस्ट 1942 च्या सकाळी गवालिया टंक मैदानावर (आजचा ऑगस्ट क्रांती मैदान) लाखोंच्या गर्दीवर पोलिसानी निष्ठुरपणे लाठी हल्ला केला त्याला न डगमगता अरुणा आसफ अली या युवतीने 'वंदेमातरमच्या घोषणा देत तिरंगा फडकवला.
        मुंबईतून सुरु झालेल्या या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटू लागले. निशस्त्र आंदोलकांवर ब्रिटिश सोजिरांनी लाठीचार लाठीचार्ज केला,अनुधुराच्या नळकांड्या फोडल्या, लाखोंनी तुरुंगवास भोगला, हजारी शहीद झाले. मात्र स्वातंत्र्यासाठीचा हा वणवा पेटतच राहिल 9 ऑगस्ट 1942 चा 'चले जाव' आणि 'करेंगे या मरेंगे' हा गांधीजींचा नारा म्हणजे स्वातंत्र्याचे विजय विगुल ठरले. त्यानंतर देशवासियांनी इंग्रजांना हाकलून लावे पर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवले. या आंदोलनात आपले बलिदान देणाऱ्या या क्रांतिवीरांनी श्रध्दांजली म्हणून ऑगस्ट 'क्रांती दिन साजरा केला जातो.

९ ऑगस्ट क्रांती दिन कविता मराठी| 9 August Revolution Day  poem in Marathi


स्वातंत्र्या
देशभक्तांच्या फाशीपासून शेतकर्यांच्या 
फाशीपर्यंत तुझा प्रवास,
यात नक्कीच कुठंतरी 
समान धागा आहे.

तू खरंच अस्तित्वात आहे का?
शंकेला थोडी जागा आहे..

कारण.... या देशात आता -
आत्महत्येच पीक येत, 
अन, कुणी सातबाऱ्याच्या उताऱ्यावर 
पायलीभर भीक देत.

म्हणून... मी ठरवलय,
कर्जात जगलो पण 
कर्जात मरणार नाही,
भावनेच्या भरात कधी
मी फाशी घेणार नाही.

इथली सारी व्यवस्थाच आता
मी नागरून काढणार आहे,
अन, स्वातंत्र्या पुन्हा तुझी
दुबार पेरणी करणार आहे.

शेतकर्याच जिण मातीमोल 'करणाऱ्या
सायाच योजना भडकणार आहे,
आणि नव्या संमृद्धीचा तिरंगा
माझ्या शेतात फडकणार आहे.

       अश्या प्रकारे आपण क्रांती दीन याविशियी महिती बघितली तर आपल्याला अशी नवीन नवीन माहिती बघण्यासाठी आमच्या साईट वर भेट द्या धन्यवाद......

à



हे पण वाचा⤵️



FAQ
Q.1) क्रांती दीन कधी साजरा केला जातो ?
Ans. क्रांती दिन 9 ऑगस्ट या रोजी साजरा केला जातो.

Q.2)राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कधी व कुठे सुरू झाले होते ?
Ans.7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर (क्रांती मैदान) राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले होते.

Q.3) महाराष्ट्रात सातारा जिल्हात कोणाच्या नेतृत्वाखाली  प्रतिसरकार स्थापन झाली ?
Ans.क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली प्रतिसरकार खूप गाजली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad