Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्य दिवस भाषण मराठी 2022 | Independence Day Speech in Marathi

स्वातंत्र्य दिवस भाषण मराठी 2022 | Independence Day 2022 Speech Marathi | swatantra diwas bhashan marathi 2022


स्वतंत्र दिवस भाषण मराठी 2022

        

 स्वातंत्र्य दिवस 2022 :- नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण स्वातंत्र्य दिवसा बद्दल भाषण, निबंध आणि स्वातंत्र्य दिवसा बद्दल चारोळ्या बघणार आहोत.


अनुक्रनिका (toc)

स्वातंत्र्य दिवस भाषण मराठी 2022 | Independence Day 2022 Speech Marathi 

          रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा...
            उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा... 
          जयघोष भारताचा आसमंती गुंजावा... 
         सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा...

     सन्माननीय अध्यक्ष, पूज्य गुरुजनवर्ग, कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व येथे जमलेले माझे वर्गमित्र व मैत्रिणींनो, आज १५ ऑगस्ट. आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन मनुन आपण साजरा करत आहोत. आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन खूप अनमोल आहे हे आपण कधीच विसरू शकणार नाही. आपल्या भारत देशावर दीडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केले. या दीडशे वर्षाच्या काळात भारतीयांचे खूप शोषण केले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि अखेर इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो, तो दिवस म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ होय. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरला गेला आहे. हा दिवस आपणा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे.
      १४ ऑगस्ट १९४७ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी भारतीयांना संदेश देण्याहेतू भाषण केले. ते म्हणाले, “ सर्व जग झोपत आहे. आज मध्य  रात्रीनंतर स्वातंत्र्याची सकाळ होणार आहे. सर्वांना
स्वातंत्र्याच्या खूपखूप शुभेच्छा.” आपल्या भारत देशात अनेक जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. विविधतेत एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे.
       स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. विज्ञान, शेती, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण व वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे.

      १५ ऑगस्ट या आपल्या राष्ट्रीय सणादिवशी प्रत्येकजण आनंदी असतो. पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकविण्यात येतो. सर्वत्र देशभक्तीपर गीते गायली जातात. देशभक्तीपर भाषणे केली जातात. आज आपल्या देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे, पण त्याचबरोबर अनेक समस्याही आपल्या देशाला भेडसावत आहेत. महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयता, व्यसनाधीनता, अत्याचार या सर्व समस्या आ वासून आपल्यासमोर उभ्या आहेत.अनेक अडचणींवर मात करत आपण स्वातंत्र्य मिळवले आहे. हे स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर आपण या समस्यांना सामोरे जावून या समस्या मुळातूनच नष्ट केल्या पाहिजेत. मगच आपला भारत देश सुजलाम, सुफलाम बनेल.तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.जाता जाता मी एवढेच म्हणेन,

             स्वातंत्र्याची ध्वजा फडकते
                सूर्य तळपतो प्रगतीचा, 
             भारत भूमीच्या पराक्रमाला 
                 माझा मानाचा मुजरा........

                जय हिंद !! जय भारत !!

स्वातंत्र्य दिवस निबंध मराठी|Independence Day Nibandh in Marathi | swatantra diwas nibandh marathi

        १५ ऑगस्ट हा आपल्या भारत देशाचा स्वतंत्रता दिवस.या दिवशी ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या विळख्यातून भारत स्वतंत्र झाला. त्यामुळेच आपण १५ ऑगस्ट या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन महणून सर्वच जण हा दिवस उत्साहाने आणि आनंदाने पूर्ण भारत भर साजरा करतो. आपल्या देशात स्वतंत्र दिवस हा राष्ट्रीय सण म्हणून सर्व भारत भर साजरा करता.१५ ऑगस्ट दिवशी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची जाणीव चिरकाल टिकावी यासाठी हा सुवर्ण दिवस सर्वत्र साजरा केला जातो. प्रत्येक राज्यात जिल्ह्यात, तालुक्यात, गावागावात लाल किल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते.
     ध्वजारोहणानंतर देशाचे प्रधानमंत्री आणि आपल्या तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख सर्व थोर नेत्यांना आणि शुरविराना श्रध्दांजली वाहतात.यादिवशी शाळा, महाविद्यालये, संस्था, ऐतिहासिक ठिकाणे तसेच काही सार्वजनिक ठिकाणी सुद्धा १५ ऑगस्ट दिवशी ध्वजारोहण आणि ध्वजवंदन मोठ्या आदराने, आपुलकीने साजरे करतात.राष्ट्रीय ध्वजामध्ये तीन रंग आहेत म्हणूनच आपण याला तिरंगा म्हणतो. हा तिरंगा आपल्याला एकात्मतेचा संदेश देतो. तिरंगा मध्ये प्रथम केशरी रंग आहे तो त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांतीचे प्रतीक तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. व मधला निळ्या रंगाचे अशोकचक्र हे प्रगतीचे प्रतीक असे मानले आहे.
         १५ ऑगस्ट हा दिवस आपण ज्यांच्यामुळे पाहू शकलो त्यांची आठवण आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो.या दिवशी आपल्याला ब्रिटिशांच्या गुलामीतून सर्व भारताला स्वतंत्र मिळालं आणि भारत देश संधराज्य म्हणून सार्विकडे ओळखला जात होता. आपल्या देशातील लोकांनी 150 वर्ष त्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीत काढले.किती हाल सहन केले. कित्येकांना नागरिकांना ब्रिटिशांनी फासी दिली आणि कितेकाना तुरुंगात राहावे लागले. ब्रिटिशाविरुद्ध त्यावेळी अनेक युद्धे झाली त्यावेळी अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. कित्येक लोकांचे संसार नष्ट झाले. अनेक नेत्यांनी मिळून आंदोलने केली. या सर्वच ज्ञात अज्ञात लोकांमुळे त्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळेच हा सोनियाचा दिवस आपण पाहू शकलो. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यावर आपली एक राज्य पद्धती अवलंबण्यात आली.
      आपले एक संघराज्य निर्माण झाले. त्यामध्ये लोकांनी निवडलेले लोकप्रतिनिधी कारभार पाहणार. कोणी राजा नाही आणि कोणी प्रजा नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाची राज्यघटना लिहिली. डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या  या राज्यघटने नुसारच आपल्या सर्व देशातील कायदेकानून आणि कारभार चालतो, त्यामुळे आपण सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार असेही म्हणतात.
       आपल्या या स्वतंत्र भारत देशात सर्व धर्माचे लोक राहतात.म्हणूनच आपला देश हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून सुद्धा ओळखलाजातो. आपल्या देशाने सर्व जात, धर्म समान आहेत असे मानले आहे. त्यामुळे आपला भारत देश सर्वात मोठा लोकशाही असलेला सर्वात मोठा देश मानून जगात ओळखला जातो. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपले योगदान दिले. महात्मा गांधी यांच्याकडे देशाचे नेतृत्व आल्यावर सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने जाण्याचा संदेश त्यांनी सामान्य जनतेला दिला त्याचबरोबर स्वावलंबन असहकार अशा मार्गांनी सर्व भारतीयांना ब्रिटिशाविरुद्ध आंदोलने करण्याची शिकवण दिली. आपल्या देश्यतील महान अश्या थोर नेत्यांनी,आणि शूरवीरांनी खूप प्रयत्न करून आपल्या भारत देशाला ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळवून दिले. खरचं आपण आपले सर्वांचे भाग्य समजले पाहिजे की, अशा या स्वतंत्र भारतात आपला जन्म झाला. यामुळे आपण सर्वांनी 15 ऑगस्ट या दिवस  सर्व महान लोकांना ज्यांनी देशासाठी बलिदान दिले आणि त्या थोर नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहिले पाहिजे.आणि सर्वांनी एकत्र मिळून हा दिवस साजरा केला पाहिजे. 
    कारण बरेच लोक यादिवशी ध्वजारोहण करण्यासाठी जाण्याचा कंटाळा करतात. सुट्टीचा दिवस म्हणून फिरायला जातात. परंतु जर या शूरवीरांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले नसते तर कदाचित आपल्याला ही हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या असत्या आणि आपण आज स्वातंत्र्यात आनंदाने जगू शकलो नसतो. त्यामुळे आपण सर्वांनी या खास दिवशी या  शुरविरांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून  उपस्थित राहिले पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे.
      सलाम त्या शूरवीरांना नागरिकांना आणि थोर नेत्यांना ज्यांच्यामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्यामुळेच आपण आज सुखाने जीवन जगात आहोत.

स्वातंत्र्य दिवस  मराठी चारोळ्या | swatantra diwas charolya | Independence Day Marathi charolya.

तिरंगी आमचा भारतीय झेंडा 
उंच उंच फडकवू प्राणपणाने 
लढून आम्ही शान याची वाढवू !!

देशभक्तांच्या बलिदानामुळे 
स्वतंत्र झालो आपण, 
कुणी विचारल्यावर गर्वाने 
सांगतो आम्ही भारतीय आहोत !!

विविधतेत एकता आहे आमची शान,
म्हणूनच आहे आमचा भारत देश महान !!

तिरंगा झेंडा फडफडे 
जय जयकार बोला 
15 ऑगस्ट आज आमुचा 
भारत स्वतंत्र्य झाला !!

ज्याचा मुकूट आहे हिमालय जिथे वाहते गंगा, 
जिथे आहे विविधतेत एकता आणि सत्यमेव जयते आहे नारा, तोच आहे भारत देश माझा !!

उत्सव आज तीन रंगांचा उत्सव आज देशप्रेमाचा ! उत्सव आज प्रत्येक भारतीयाचा उत्सव आज स्वातंत्र्य दिनाचा !!

देश विविध रंगाचा, 
देश विविध ढंगाचा देश विविधता जपणाऱ्याएकात्मतेचा !!

दें सलामी... या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे!!

स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा भारत भूमीच्या पराक्रमाला आमुचा मानाचा मुजरा !!

मुक्त आमुचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने स्वैर उडती पक्षी नभी आनंद आज उरी निनादे !!

किती आक्रोश तो जाहला किती रक्तांच्या नद्या वाहिल्या सडा पडला मृतदेहांचा तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला !!

हे पण वाचा⤵️


FAQ
Q.1) स्वतंत्र दिवस कधी साजरा केला जातो ?
Ans.१५ ऑगस्ट ला स्वतंत्र दिवस साजरा केला जातो.

Q.2) ब्रिटिशांनी भारतावर किती वर्ष राज्य केले ?
Ans. ब्रिटीशांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले.

Q.3) आपल्या देशाची राज्यघटना कोनी लिहिली ?
Ans. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad