Type Here to Get Search Results !

जागतिक आदिवासी दिन भाषन निबंध मराठी माहिती | Jagtik adivasi Day Speech essay in Marathi

जागतिक आदिवासी दिन भाषन निबंध मराठी माहिती | Jagtik adivasi Day Speech Marathi pdf |Jagtik adivasi Day essay in Marathi |जागतीक आदिवासी दिवस मराठी माहिती


जागतिक आदिवासी दिन भाषन निबंध मराठी माहिती

आदिवासी दिन 2022 : नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण जागतीक आदिवासी दिवस या बद्दल निबंध, भाषण आणि सूत्रसंचालन कस  करायच ते बघणार आहोत.


अनुक्रनिक (toc)

जागतिक आदिवासी दिन भाषन मराठी | Jagtik adivasi Day Speech in Marathi 


जंगलाचा मी रहिवासी 
नातं माझं निसर्गाशी,
झाडे, वेली, पशू-पक्षी सारे 
आहेत माझे मित्र खरे, 
मंजुळ पावरी वाजे 
आम्ही आहोत जंगलाचे राजे !!

नमस्कार मित्रांनो, आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. सर्वप्रथम माझ्याकडुन  सर्व आदिवासी बांधवांना जागतीक आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

मित्रांनो, संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेस 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या असे लक्षात आले की 21व्या शतकात म्हणजेच तंत्रज्ञानाच्या, संगणकाच्या युगात सुद्धा जगातील वेगवेगळ्या देशांमधील आदिवासी समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे. गरिबी, अज्ञान, आरोग्य सुविधांचा अभाव, बेरोजगारी, मजुरी अशा अनेक समस्यांनी हा समाज ग्रासलेला आहे.त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी 1994 पासून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून संपूर्ण जगभरात हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
       मित्रांनो आदिवासी या शब्दांमधील आदि म्हणजे खूप आधीपासून आणि वासी म्हणजे वास्तव्य करणारे. खूप आधीपासून, पूर्वीपासून वास्तव्य करणारे लोक म्हणजेच आदिवासी होय.आदिवासींना निसर्गा विषयी खूप आवड असते.आदिवासी लोक निसर्गाची पूजा करतात. निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते देवता मानतात. निसर्गावर त्यांची निस्सिम श्रद्धा असते. जंगलामधून कंदमुळे, फळे, तंतू, मध, औषधी वनस्पती गोळा करणे, लाकूड कटाई करणे हे आदिवासी लोकांचे मुख्य व्यवसाय आहेत.
         आदिवासी लोकांच्या बोलीभाषा देखील विविध प्रकारच्या असतात. कोरकू, कोलामी, गोंडी, गोरमाटी, वाघरी, सावरा, पावरी अशा अनेक बोलीभाषा आदिवासी लोक बोलतात. यातील बहुतेक भाषांना लिपी नाहीत. त्यामुळे या भाषा जपल्या गेल्या पाहिजेत. प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र अशी पंचायत असते.
         आदिवासी समाजामध्ये परंपरेला खूप महत्त्व आहे. आपल्या परंपरेचा ठेवा एक पिढी दुसऱ्या पिढीला कथा, गाणी, नृत्य इत्यादी माध्यमातून देते. आदिवासी लोकांची लोककला, चित्रकला, गायन, वादन, नृत्यकला, शिल्पकला अतुलनीय अशा असतात. कोकणातील वारली जमातीची वारली चित्रकला आपणा सर्वांना माहिती असेलच. किती अप्रतिम आहे ती चित्रकला. 
          महाराष्ट्रामध्ये मल्हार कोळी, महादेव कोळी, वारली, कोकणा, कातकरी, ठाकूर, पावरा, गावित, भिल्ल, कोरकू अशा अनेक आदिवासी जमाती आढळतात. या जमाती ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या पाहायला मिळतात.आदिवासी समाज आज प्रगती करत आहे.विविध क्षेत्रांमध्ये आदिवासी समाज महत्त्वाचे योगदान देत आहे. अगदी पूर्वीपासून बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या भिल्ल, किल्लेदार खेमाजी रगतवान, समशेर सिंग पारधी अशा अनेकांनी आपल्या पराक्रमाने आदिवासी समाजाची मान उंचावली आहे.आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती या एक आदिवासी महिलाच आहेत.ही आपल्या सर्वांसाठी एक गौरवाची गोष्ट आहे.

शेवटी इतकंच म्हणावसं वाटतं, 
जंगल राखले तुम्ही, परंपरा जपल्या तुम्ही 
निसर्ग देवतेचं देवपण, श्रध्देने जपलं तुम्ही 
म्हणूनच सर्व आदिवासींचा 
सन्मान करतो आम्ही |


          जय आदिवासी.............

जागतिक आदिवासी दिन निबंध | Jagtik adivasi Day essay in Marathi


       आज 9 ऑगस्ट हा दिवस सर्विकड जागतीक आदिवासी दिवस म्हणून साजरा करतात.या दिवसी सर्व जण आदिवासी बांधव एकत्र येतात आणि आपल्या आपल्या संस्कृती प्रमाणे वेशभूषा घालतात, गाणे आणि नृत्य करून हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात.मानवाची जसजशी उत्क्रांती होत गेली तसतसा मानव पृथ्वीवर निरनिराळ्या खंडापर्यंत प्रवास करू लागला. तेथील वातावरणाशी त्याने जुळवून घेतले. मग दमदमान त्यांचे शब्द, भाषाआणि संवाद अश्या प्रकारे त्यांची उत्क्रांती होत गेली, आजही जगात वेगळया वेगळया  भागात अनेक आदिवासी जमाती त्यांची बोलीभाषा, रूढी परंपरा जपत निसर्गाच्या सानिध्यात राहून जीवन जगतात.आधुनिक दुनियेच्या झगमगटापासून आजही अनेक लोक कोसो दूर आहेत.
       खूप वर्षानंतर संयुक्त राष्ट्रसंघासमोर एक अतिशय धक्कादायक बाब समोर आली,ती बाब म्हणजे अनेक जगातील मूळ राहणाऱ्या समूहाने निसर्ग जपण्यासाठी महत्वाचे कार्य केले. पन हि लोक समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ न शकल्यामुळे ह्या आदिवासी जमाती शिक्षणा पासून, आरोग्य, रोजगार व अनेक सोईसुविधा पासून वंचित राहिले आहेत. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने 9ऑगस्ट1994 या दिवश जागतीक आदिवासी दिवस म्हणून घोषित केला(International Day of Indigenous People)
      या दिवसा पासून सर्व जगभरात आदिवासी बांधवांना त्यांक्या मूलभूत सुविधा व त्यांचे हक्क मिळण्यासाठी जागतीक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झाले.पण भारतामध्ये मात्र 1950 पासूनच संविधानानुसार आदिवासी लोकांच्या विकासाची भूमिका समोर ठेऊन तरतूद करण्यात आली होती सर्वात जास्त अनुच्छेद सविधनामध्ये आदिवासी बांधवांच्या हित रक्षणाचे आहेत. आदिवासी लोकांचे एक स्वतंत्र जीवनशैली, त्यांच्या रुढी, प्रथा आणि परंपरा आणि सामाजिक कायदे सुद्धा आहेत. 
       अनेक ठिकाणी स्वशासनावर होती आधारित वटिभ शीव समाजव्यवस्था जंगलावरील त्यांचा हक्क हिरावला गेला व त्यांच्या स्वयंपूर्ण समाजव्यवस्थेवर याचा प्रतिकूल परिणाम झाला.या गोष्टी मुळे त्याना विविद्धा समस्येला तोंड द्यावे लागत होते. सर्व आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी पेसा हा कायदा अस्तित्वात आला आहे,त्या कायद्याचे प्रमुख सूत्र म्हणजे आदिवासी लोकांची संस्कृती, प्रथा आणि परंपरा याचे रक्षण करणे आणि संवर्धन करणे आणि ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासी लोकांची शासन वेवस्ता बळकट करणे हे आहे.

जागतीक आदिवासी दिन सूत्रसंचालन मराठी| Jagtik adivasi Day Sutrasanchalan


   संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तुत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत आयोजित आजच्या या विशेष सोहळ्यात सन्माननीय अध्यक्षांच, प्रमुख अतिथींच, उपस्थित मान्यवरांच आणि माय मराठीच्या तमाम लेकरांचं मी शब्द सुमनांनी स्वागत करतो

    स्वागतम स्वागतम  स्वागतम !!

मान्यवरांचे स्वागत:

स्वागत चारोळी क्रमांक १

कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असाव लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठ मन असाव लागत.

रसिकहो कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेले आदरणीय श्री ( मान्यवरांचे नाव) वेळात वेळ काढून आज आपल्यात उपस्थित आहेत आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूयात.

स्वागत चारोळी क्रमांक 2

• बोली ने चाली ने निकोप शुद्ध, ज्ञानाने तेजस कधी न क्रुद्ध मनाने निर्मळ प्रेमळ स्नेही, कर्तृत्व अफाट उदात्त ध्येयी

अतिथी म्हणून असे मान्यवर आपल्याला या कार्यक्रमात लाभले आहेत...

दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन: 

      दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करत असताना हया चारोळ्या म्हणायच्या.

अतिथीच्या आगमनाने उजळले भुवन,
दीपाच्या तेजातून येतील मांगल्याचे क्षण !
बुद्धीच्या स्वरूपासही व्हावे भावपूर्ण नमन, 
संस्कृतीचा सन्मान करूयात दीपप्रज्वलन....."

"भ्रष्टाचार, अज्ञानाचा अंधार दूर सारण्या,
मनामनात देशप्रेमाचा दीप पेटवूया !
करुनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन, 
तेज कार्यक्रमाचे वाढवूया...."

संस्कृती आहे आपली प्रकाशाची
शितलता आहे त्यात चंद्राची 
दिपप्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची
हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची
अशा या प्रसंगी मी मान्यवरांना
दिपप्रज्वलनासाठी विनंती करतो..


कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याच्यावेळी वापरायची चारोळी :


समोर अशी गर्दी असली, त्यात माणस दर्दी असली सोहळा सुंदर होणारच वेळ जरी अर्धी असली !


मान्यवरांच्या भाषण :


मान्यवरांना भाषणासाठी बोलवायचं आणि भाषण चालू होयच्या आधी काही चारोळ्या बोलायच्या .

चारोळी क्रमांक १

शब्दांना विचारांच्या चढवुया 
झुली प्रेरणा आपूली चेतवूया 
शब्दाला शब्दाचा कळू देत नाद 
होउ दे संवाद विश्वव्यापी !!

चारोळी क्रमांक २

            मन समुद्रासारख विशाल ठेवा 
       नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील 
               द्वेष नको विचार रूजवा 
    माणसं मशाल बनून तुमच्यासाठी पेटायला येतील
          तेव्हा आपल्यात विचारांचे संस्कार 
     रुजविण्यासाठी येत आहेत आदरणीय !!

भाषणानंतर वापरायची चारोळी:

चारोळी क्रमांक १

काळ जात राहतो
पण काळजात राहतो तोच खरा शब्द.....

मान्यवरांचे हे शब्द सदैव आमच्या काळजात राहतील असा विश्वास मी श्रोत्यांच्या वतीने व्यक्त करतो .

चारोळी क्रमांक २

  योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडून मिळालेले ज्ञान हे       माणसांना त्यांचे विचार आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास
           भाग पाडतात
तेव्हा मान्यवरांचे मार्गदर्शन आमच्यासाठी लाख मोलाच आहे

उपस्थित रसिकांना टाळ्या वाजविण्याचे आवाहन करणाऱ्या चारोळ्या :


सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे कार्यक्रमाच्या यशासाठी रसिका फक्त दाद दे !!

रसिकांच्या टाळ्या हिच मैफलीची जान आहे
सर्वांनाच रसिकांच्या टाळ्यांची तहान आहे कलाकार महान असतील किंवा नसतील ही 
पण मनापासून दाद देता रसिक खरा महान आहे !!

आभार प्रदर्शन: 


आपण मान्यवरांचे आभार वक्त करायचे आपण सर्व जण येथे आलात तुमचे मनापासून आभार मानतो.

आभार तुमचे मानावेत इतके तुम्ही परके नाही आठवणीतून भेटत राहु भेटलो जरी सारखे नाही सुंदरशा या सोहळ्यासाठी नेहमीच आपण ऋणातराहू 
नाते हृदयी जपण्यासाठी एक दुसऱ्याच्या मनात राहू !!


कार्यक्रम संपण्यापूर्वी : काही  विनोदी चारोळी सादर करा जसे की,

घरी जाऊनी जेवण करूनी सोफ्या वरती पसरू नका उशीर झाला म्हणूनी आणि घरच्यांवरती घसरू नका चूक भूल जर असली काही साफ मनाने माफ करा भविष्यात अन भेटू तेव्हा या सूत्रसंचालकाला विसरू नका.

एवढं बोलून कार्यक्रम झाला म्हणून घोषित करायच धन्यवाद!

जागतिक आदिवासी दिन कविता मराठी| Jagtik adivasi Day poem in Marathi


कवितेचे शिर्षक : आम्ही आदिवासी

आम्ही आदिवासी या भूमीचे 
मुलनिवासी या जगीचे, 
डोंगर, दन्यात आमचा निवारा 
भिती न आम्हा तिमिर, तरसाये ॥ ॥

संस्कृती या संपूर्ण जगाची 
उगम पावते आमच्यापासूनि, 
निसर्गाशी निगडित संस्कृती 
जपतो आम्ही क्षणोक्षणी ॥ २ ॥

अशिक्षित, गरीब जरी असलो आम्ही 
निसर्ग देव आमच्या प्रत्येक मनी, 
माणुसकीचे जपतो नाते 
भेदभाव ना आमच्या ध्यानी ॥३॥

सोयी, सुविधा जरी नसल्या आम्हा 
नाही आम्हा त्याची आस, 
माणुसकी आमच्या प्रत्येक मनी 
हेच आमचे वैशिष्ट्य खास ॥४॥

सरकार, शासन नाही समजून घेत 
आमचे भाव, समस्या अन दुख्खे, 
अजुनही आमचे बांधव आहेत 
कुपोषित, दरिद्री अन भूखे ॥ ५॥

होऊन गेला तो एकलव्य 
ज्याने दिला अंगठा दान, 
होईल का कोणी असा आता 
एकलव्याहून अधिक महान ॥ ६॥

आम्ही आदिवासी या भुमीचे 
मुलनिवासी या जगीये.......
हे पण वाचा⤵️


FAQ
Q.1) जागतीक दिन कधी साजरा केला जातो ?
Ans.9 ऑगस्ट हा दिवस सर्विकड जागतीक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो.

Q.2) आदिवासी या शब्दाचा अर्थ काय आहे ?
Ans.खूप आधीपासून, पूर्वीपासून वास्तव्य करणारे लोक म्हणजेच आदिवासी होय.

Q.3) साविधनामध्ये सर्वात जास्त अनुच्छेद कोणाचे आहेत ?
Ans.सर्वात जास्त अनुच्छेद सविधनामध्ये आदिवासी बांधवांच्या हित रक्षणाचे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad