Type Here to Get Search Results !

कॅन्सर कसा टाळावा मराठी माहिती | How to prevent cancer

कॅन्सर कसा टाळावा मराठी माहिती |कॅन्सर प्रतिबंध मराठी माहिती pdf |Cancer full Information in Marathi|How to prevent cancer| Jivanshaili and cancer pratibandh


    नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण या ठिकाणी जाणून घेणारा जीवनशैली कशी असावी व त्याचा कॅन्सरशी काय संबंध. तर चला मग जाणून घेऊ जीवनशैली आणि कॅन्सर मधील दुवा. हे तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री करतो.

अनुक्रनिका (toc)

 कॅन्सर कसा टाळावा मराठी माहिती | Cancer full information in Marathi 

   काही दशकांपूर्वी जगभरात संसर्गजन्य रोगांचं माजलेलं स्त्रोम सर्वश्रूत आहे. या साथींनी लाखो रुग्णांना आपलं भक्ष केलं. नव्या पीढीने २०१९ साली प्रथमतःच अनुभवलेल्या कोरोना महामारीची व संपूर्ण मानवजातीच्या झालेल्या हालअपेष्टांची तुलना त्या काळातील महामारीसदृष्य परिस्थितीशी करता येईल. वैद्यकीय विज्ञानातील अमुलाग्र प्रगती, लसी तसेच प्रतिजैवीके (Antibiotics) सारख्या औषधांचे लागलेले शोध यामुळे या आजारांवर व त्या अनुषंगाने होणाऱ्या परिणामांवर मात करणे शक्य झाले. रुग्णांचे आयुर्मान वाढवण्यात या संशोधनांचा मोलाचा वाटा होता.

    औद्योगिकरणाची लाट, त्यासोबत वाढलेले शहरीकरण यामुळे लोकांच्या जीवनशैलीत व्यापक परिवर्तन घडत गेले आणि त्याचे सकारात्मक परिणाम समाजाच्या एकंदर जडणघडणीवर होत गेले. समाजातील विविध स्तरांमधे आर्थिक व सामाजिक स्थैर्य प्रस्थापित होऊ लागले. परंतू या प्रक्रियेतील 'शारिरीक व मानसिक स्वाथ्यावर झालेले परिणाम निराशाजनक होते. भारतासारखी विकसनशील राष्ट्रे या औद्योगिकरणाच्या व जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत गेली तीन दशके सक्रियपणे सहभागी होत असताना त्या प्रक्रियेतील अनिष्ट परिणामांपासूनअलिप्त राहणं भारतासारख्या देशाला शक्य नव्हतं.

या काळात असंसर्गजन्य आजार आपल्या समाजात बळावले. मधूमेह, रक्तदाब, इतर हृदयासंबंधीत आजार व कर्करोग अशा आजारांमधे लक्षणीय वाढ झाली. हे आजार " क्रोनिक" किंवा जुनाट असून जुनाट स्वरुपाचे ते योग्य काळजी न घेतल्यास मेडिकल इमर्जन्सी निर्माण करत नसले तरी कालांतराने जीवघेणे ठरु शकतात. महत्वाचं म्हणजे हे आजार आपलं शरीर हळूहळू पोखरत कालातंराने आपल्या शारीरिक स्वास्थ्यास हानी पोहोचवितात.

    एक कर्करोगतज्ञ म्हणून मी खात्रीशीरपणे सांगू शकतो की कैंसर हा रुग्णांना शारिरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या हतबल करणारा आजार असला तरीही वेळीच निदान झाल्यास उपचारांअंती हा आजार पूर्ण बरा करता येईल; किमान दिर्घ व दर्जेदार आयुष्य देता येईल इतकी प्रगती वैद्यकिय क्षेत्रात नक्कीच झालेली आहे. ११ लाखाहून अधिक कँसरचे रुग्ण दरवर्षी भारतात सापडतात. त्यापैकी ६०% ते ७०% रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात आमच्याकडे येतात ही चिंताजनक बाब आहे.

जीवनशैलीतील पुढील काही बदल कर्क रोगापासून आपला बचाव करु शकतात


१) आपल वजन नियंत्रणात ठेवा, अति वजन हे बऱ्याचश्या असंसर्गजन्य रोगाचं मूळ आहे.
२) नियमीत ३०-४५ मिनिटे व्यायाम करा. व्यायामाइतका स्वस्त प्रतिबंध उपलब्ध नाही.
३) तंबाखुचे सेवन वर्ज्य करा. तंबाखुमुळे तोंडातील अवयवांचे व फुफ्फुसांचे कर्करोग होऊ शकतात.
४) गर्भाशयमुखाच्या कर्करोगांसाठी प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे. मुलींना योग्य वयात लस देण्यासाठी आपल्या स्त्रीरोगतज्ञ किंवा नजीकच्या कर्करोगतज्ञांचा सल्ला घ्या.
५) मद्यप्राशन थांबवा, निदान नियंत्रणात ठेवा.
६) जेवण्याच्या वेळा निश्चित करा; गरजेपेक्षा खाणे हानीकारक आहे.
७) घरी केलेला स्वयंपाक पौष्टिक आणि निरोगी आहे. त्याला प्राधान्य द्या.
८) संतुलित आहार घ्या. आहारात फळे व तंतूजन्य पदार्थांचा समावेश करा... जंक फूडचे सेवन टाळा.
९) ७-८ तासांची झोप नियमीत घेणे आवश्यक आहे.


निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. ती जतन करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे.


हे पण वाचा⤵️


FAQ
Q.1)लोकांच्या जीवनात कशामुळे व्यापक परिवर्तन घडत गेले.
Ans:औद्योगिकरणाची लाट, त्यासोबत वाढलेले शहरीकरण यामुळे लोकांच्या जीवनशैलीत व्यापक परिवर्तन घडत गेले.

Q.2) दरवर्षी भारतात कॅन्सरचे किती रुग्ण आढळतात.
Ans:११ लाखाहून अधिक कँसरचे रुग्ण दरवर्षी भारतात सापडतात.

Q.3) वर्ल्ड हेल्थ डे कधी साजरा केला जातो.
Ans:वर्ल्ड हेल्थ डे ७ एप्रिल रोजी साजरा केला जातो.

Q.4) नियमित किती झोप घेणे आवश्यक आहे.
Ans:७-८ तासांची झोप नियमीत घेणे आवश्यक आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad