Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्य दिन भाषण मराठी २०२४ | independence day speech in marathi

 स्वातंत्र्य दिन भाषण मराठी  २०२४ | independence day speech in marathi | स्वातंत्र्य दिन मराठी भाषण | स्वातंत्र्य दिन भाषण मराठी pdf | swatantra din bhashan marathi pdf| independence day Bhashan marathi 

स्वातंत्र्य दिन भाषण मराठी  २०२४


स्वातंत्र्य दिन भाषण मराठी २०२४ :- नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत अतिशय सोपे व सुंदर स्वातंत्र्य दिन भाषण मराठी. हे भाषण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा मध्ये उपयोगी पडेल तरी तुम्ही खालील लेखात दिलेले भाषण शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती.

➡️ 15 ऑगस्ट भाषण लहान मुलांसाठी 


स्वातंत्र्य दिन भाषण मराठी| independence day speech in marathi | 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी 


देशासाठी जन्म आपला 

सेवा आपले काम 

त्यांच्यासाठी चंदन होऊन

 झिजवीन माझे प्राण


आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, पूज्य गुरुजनवर्ग आणि माझ्या बंधु-भगिनिनों, नमस्कार मी .......... आपल्या सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.


आजच्याच दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी एक सोनेरी पहाट झाली आणि आपला भारत देश इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. सुमारे 150 वर्ष पारतंत्र्यात असणारा आपला देश स्वतंत्र झाला. पण मित्रांनो, हे स्वातंत्र्य आपल्याला सहजा सहजी मिळाले नाही. या स्वातंत्र्यासाठी कित्येक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.


आओ झुककर सलाम करें उनको 

जिनके हिस्से में ये मुकाम आता है 

खुशनसीब होता है वह खून 

जो देश के काम आता है।


देशसेवा हेच एकमेव स्वप्न डोळ्यासमोर ठेवुन आपल्या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांसारखे महान देशभक्त हसत-हसत फासावर गेले.


महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, वि.दा. सावरकर, नेताजी, चंद्रशेखर आझाद, मंगल पांडे, झाशीची राणी अशा अनेक महामानवांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी पणास लावले. यांसारख्या महान क्रांतीकारकांच्या त्यागातून व बलिदानातुन आपल्याला हे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. म्हणुनच आजचा हा दिवस खूपच गौरवशाली आहे.


आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी रणशिंग फुंकताना या स्वातंत्र्य- सैनिकांनी आपली जात-धर्म पाहिला नाही. अनेक जाती धर्मांच्या लोकांनी एकत्र येऊन सुमारे दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत होरपळून निघालेल्या आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्यासमोर जणू एकच उद्देश होता स्वतंत्र भारताचा. म्हणून आपणही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपली जात, धर्म हा भेदभाव विसरून आपल्या देशाच्या प्रगतीला हातभार लावला पाहिजे. अहो, म्हणतात ना 


अनेकता में एकता 

यही इस देश की शान है 

इसीलिए सारे जग में 

मेरा भारत महान है।


निश्चितच भावी पिढी म्हणून आपल्या देशाला अधिक समृदध व संपन्न बनविण्याची जबाबदारी आमच्या खांदयावर आहे. त्यामुळे या देशाचे भावी नागरिक म्हणून आजच्या या पावन दिनी आम्ही आपणास ग्वाही देतो आम्ही सर्व जाती धर्माचे भेद विसरून आपल्या देशाला अधिक सुजलाम् सुफलाम् बनवु व आपल्या देशाचे ऐक्य टिकून ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो.


ना जियो धर्म के नाम पर 

ना मरो धर्म के नाम पर 

इन्सानियत ही है धर्म वतन का 

बस जियो वतन के नाम पर ।


🙏 धन्यवाद 🙏 

जय हिंद जय भारत 



हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ स्वातंत्र्य दिन सुत्रसंचालन मराठी 

➡️ चंपाषष्ठी मराठी माहिती 

➡️ १५ ऑगस्ट मराठी भाषण निबंध 

➡️ स्वातंत्र्य दिन चारोळ्या मराठी 

➡️ रक्षाबंधन मराठी निबंध माहिती 

➡️ बैलपोळा निबंध मराठी 

➡️ श्री कृष्ण जन्माष्टमी निबंध मराठी 




FAQ

Q.1) भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले ?

Ans. भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळाले.


Q.2) भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे ?

Ans. जन गण मन हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे.


Q.3) इंग्रजांनी भारतावर किती वर्ष राज्य केलं ?

Ans. इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केलं.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad