Type Here to Get Search Results !

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी | Christmas Essay In Marathi

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी |ख्रिसमस नाताळ निबंध मराठी माहिती pdf | Christmas Essay In Marathi 

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी


 ख्रिसमस नाताळ निबंध 2022:    नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण ख्रिसमस नाताळ या सना बद्दल माहिती निबंध बघू हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा करतात या दिवशी सर्व ख्रिश्चन बांधवांचा एकत्र येतात आणि हा सण साजरा करतात.

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी |Christmas Essay In Marathi 

        आपल्या देशात बरेच सण साजरे केले जातात त्यापैकीच एक महत्वाचा सण म्हणजे नाताळ. यालाच ख्रिसमस असेही म्हणतात. हा सण दरवर्षी 25 डिसेंबर ला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नाताळ हा ख्रिश्चन बांधवांचा सण जरी असला तरी संपूर्ण भारतभर विविध धर्मीय लोक हा सण साजरा करतात. या दिवशी भगवान येशूचा जन्म झाला होता. त्यांच्या जन्मानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. भगवान येशू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्माचे संस्थापक होते. त्यांनी संपूर्ण समाजाला प्रेम व मानवतेची शिकवण दिली. जगात ने मसीह म्हणून विख्यात झाले. त्यांना इसा मसीह असेही म्हटले जाते. 

     ख्रिश्चन धर्मीय लोक वर्षभर या सणाची वाट बघतात एक महिन्यापासूनच लोक आपल्या घराची साफसफाई करतात. घरात नवीन वस्तूची खरेदी करतात. नवीन कपडे विकत घेतात. या दिवशी चर्च, दुकाने तसेच घरांची सजावट केली जाते. विविध सजावटीच्या वस्तू तसेच लाइट लाऊन रोषणाई केली जाते. बाजारातून ख्रिसमस ट्री आणून त्याला सजवले जाते. त्यावर उपहार, चॉकलेट आणि इतर सजावटीच्या वस्तू लावल्या जातात. या दिवशी घरात पंच पक्वान बनवले जातात ब्रिसमस केक बनवन्याची सुद्धा परंपरा आहे. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना व शेजाऱ्यांना घरी बोलावून त्यांना मिठाई, केक दिले जाते.नाताळच्या दिवशी सांता क्लॉज मुलांना मध्यराती भेटवस्तू देतो अशी कल्पना केली जाते. मुलांना या सांता क्लॉज चे फार आकर्षण असते. काही मुलांकडे सांताक्लॉज चा पोशाख सुद्धा असतो. 

अशाप्रकारे प्रत्येक घरामध्ये हा सण साजरा केला जातो भारतीय सणांचे वैशिष्टय म्हणजे इथे प्रत्येक सण मोठया आनंदात साजरा होतो. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन प्रत्येक सणाचा आनंद लुटतात. नाताळ सुद्धा असाच एक सण आहे. सर्व धर्मीय लोक मोठ्या सर्व धर्मीच लोक मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात.

हे पण वाचा ⤵️

FAQ
Q.1)दरवर्षी ख्रिसमस कधी साजरा केला जातो?
Ans. ख्रिसमस हा सण दरवर्षी 25 डिसेंबर ला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 

Q.2)ख्रिश्चन धर्माचे संस्थापक कोन आहेत?
Ans.भगवान येशू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्माचे संस्थापक होते.

Q.3)नाताळच्या दिवशी मुलांना गिफ्ट कोन देते?
Ans.नाताळच्या दिवशी सांता क्लॉज मुलांना मध्यराती भेटवस्तू देतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad