Type Here to Get Search Results !

दसरा सणाची माहिती मराठी | Dussaehra Festival Marathi Mahiti

दसरा सणाची माहिती मराठी pdf  | Dussehra Festival Marathi Mahiti | विजयादशमी मराठी माहिती | Vijayadashmi Marathi Mahiti | दसरा सणाची निबंध मराठी | Dussehra Festival Essay in Marathi


दसरा सण 2022 : नमस्कार मित्रानो आणि मैत्रीणींनो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपन् दसरा मोट्या आनंदाने साजरा करणार आहोत.तर या वर्षीचा दसरा हा 5 ऑक्टोबर म्हणजेच बुधवारी येणार आहे.तुम्हाला दसरा या सणाची पूर्ण माहिती बघायची असेल तर खालील दिलेला लेख शेवट परेंत वाचा.


दसरा सणाची माहिती मराठी  | Dussehra Festival Marathi Mahiti 

हिंदू संस्कृतीत सर्वात महत्वाचा व मोठा असलेला सण 'दसरा' हा सन आश्विन शुद्ध दशमीला येतो.या आश्विन महिन्या मधील पाहिले नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा नऊ दिवस झाल्यावर दहावा दिवस म्हणजेच 'दसरा' यालाच विजयादशमी असेही म्हणतात.
       दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' या काव्यातच ह्या सणाची माहिती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीपूजन आणि शस्त्रपूजन हे केले जाते.आपल्या या दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला.
     प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले.पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता ज्यावेळी राजच्या घरी गेले त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. आज्ञात वास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली तो हाच दिवस.
      छत्रपती शिवाजी राज्यानी प्रतापगडावर जाऊन भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी सुरवात केली.याचं दिवशी शूर, पराक्रमी राजे दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत. दसरा म्हणजेच विजयादशमी. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस.
       आपट्याच्या पानाला सोन्याच मोल कां? कसं हे कसं आल या बद्दल एक कथा सांगितली जाते. ती कथा अशी  आहे की खुप वर्षापूर्वी वरतंतू नावाचे एक गुरू त्यांच्या  आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते. बराच मोठा शिष्यवर्ग त्यांचेकडे वेदाभ्यास, शास्त्राभ्यास करीत होता.एकदा काय झालं गुरु वरतंतू यांच्याकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कस्य नावाच्या शिष्याने त्यांना विचारले गुरुजी तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले, शहाणं केलं त्या बद्दल्यात आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा द्यावी.

     हे झाल्यावर गुरु कौत्सा ला म्हणाले "बाळ कौत्सा, अरे ज्ञान हे दान करायचे असते.ज्ञानाचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो. कसं आता तुम्ही शहाणे झालात ज्ञानी झालात आता हीच माझी गुरुदक्षिणा आहे बरं.पण कौत्स मात्र ऐकेन झाला सारखा मी तुम्हाला काय देऊ असे विचारू लागला मग त्याला गुरु म्हणाले " मी तुला चौदा विद्या शिकविल्या त्यामुळे तू मला चौदा कोटी सुवर्ण मोहरा दे."कौत्स हे ऐकून गांगरून गेला.कौत्स रघुराजाकडे गेला.पण राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केला होता त्यामुळे खजिना संपला होता, तरीहि सुद्धा रघुराजाकडे  कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि रघुराजाकडे इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले.आणि इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहित होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याच्या झाडाच्या पानाची सुवर्ण नाणी बनवून, ती  इंद्राने पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली.
     त्या पडलेल्या सुवर्णमुद्रा घेऊन कौत्स हा वरतंतू ऋषींकडे गेला आणि गुरूंना गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी त्यापैकी १४ कोटी सुवर्णमुद्रा परत घेण्यास रागाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून, लोकांना लुटायला सांगितल्या.लोकानीं त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता. म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरु झाली.म्हणूनच दसरा हा पराक्रमाचा आनंद देण्या-घेण्याचा, परस्परांत प्रेम वाढवण्याचा सुंदर सण आहे.


हे पण वाचा ⤵️

FAQ
Q.1)दसरा हा सन कधी साजरा केला जातो ?
Ans.आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते.त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच 'दसरा' या दिवशी साजरा करतात.

Q.2)दसऱ्याच्या दिवशी देवीने कोणाचा वध केला ?
Ans.याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला.

Q.3)या दिवशी प्रभू रामचंद्राने कोणाचा वध केला ?
Ans.या दिवशी प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad