Type Here to Get Search Results !

संविधान दिन भाषण मराठी निबंध 2022 | samvidhan divas Bhashan nibandh marathi

संविधान दिन भाषण मराठी निबंध 2022 | samvidhan divas Bhashan nibandh marathi |constitution Day information speech essay in Marathi 
   

 संविधान दिन 2022 :  नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज 26 नोव्हेंबर संविधान दिन सर्व भारत भर साजरा केला जातो. संविधान दिन भाषण मराठी मध्ये तसेच त्याचा उपयोग संविधान दिन निबंध साठी होऊ शकतो. माहिती आवडल्यास नक्की शेअर व कमेंट करा.


संविधान दिन 2022 भाषण मराठी निबंध | samvidhan divas Bhashan nibandh marathi |

     आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजनवर्ग आणि माच्या सर्व मित्रांनो आज 26 नोव्हेंबर संविधान दिन याबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे तर ते तुम्ही शांत पणे एकावे ही माझी नम्र विनंती.

" समता, बंधुता, न्याय समानता,
लोकहिताचा सर्वस्वी विचार,
समता आणि स्वातंत्र्याचे
 संविधानाने दिले आम्हा अधिकार |
   " होय, मित्रांनो भारतीय संविधानानेच प्रत्येक भारतीयाला 'माणूस' म्हणून जगण्याचे अधिकार तर दिलेच पण सोबतच देशाप्रती जागरूक, जबाबदार असण्याची जाणीवही दिली. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरीकांच्या मूलभूत हक्क, कर्तव्ये, अधिकार आणि जबाबदान्या यांची दिशा ठरविणारा ऐतिहासिक ग्रंथ आहे. आपल्या प्रदीर्घ अभ्यास आणि चिंतनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श संविधान लिहून या देशावर अनंत उपकार केले आहेत.

        संविधानाची निर्मिती हा देखील दीर्घ प्रवास होता. २ वर्षे ११ महिने कामकाज, १४४ दिवस चर्च, ३८e विद्वान सदस्य अशा मंथनातून संविधान अस्तित्वात आले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी मसूदयाला मान्यता दिल्या  नंतर २६ जानेवारी १९५० संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि प्रजासत्ताक भारताची मुहुर्तमेढ रोवली.

       मित्रांनो, भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. अनेक संविधानिक 'मूल्यांनी भारतीय संविधान सामाजिक समता, तसेच लोकशाही जीवनमूल्यांची जगाला शिकवण दिली आहे. आपण रोज संविधानाची उद्देशिका परिपाठात म्हणतो तेव्हा संविधानाची महती आपल्याला कळते. 

भारतीय संविधानाने आपल्याला अनेक अधिकार आणि हक्क दिले आहेत. मग आपणही संविधानातल्या मूल्यांचा आणि तत्वौचा अंगिकार करून जबाबदार नागरीकाचे वर्तन करायला हवे. संविधानानेच लोकशाही व मानवाचे अधिकार अबाधित रहाणार आहेत.

शेवटी एक च म्हणतो-

" संविधानाचे जाणूनी महत्व, 
संविधानाचा राख्या सन्मान,
 लोकहितवादी लोकशाहीला, 
संविधानाचा असे अभिमान
 चला राख्या संविधानाची शान ॥


हे पण वाचा ⤵️


हे पण वाचा⤵️


FAQ
Q.1) संविधान दिन कधी साजरा केला जातो ?
Ans.26 नोव्हेंबर संविधान दिन साजरा केला जातो.

Q.2) संविधान कोणी लिहिले ?
Ans.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले.

Q.3) संविधान कसे अस्तित्वात आले ?
Ans.२ वर्षे ११ महिने कामकाज, १४४ दिवस चर्च, ३८e विद्वान सदस्य अशा मंथनातून संविधान अस्तित्वात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad