Type Here to Get Search Results !

संत ज्ञानेश्वर निबंध भाषण मराठी माहिती | sant dnyaneshwar essay in marathi

संत ज्ञानेश्वर निबंध भाषण मराठी माहिती |संत ज्ञानेश्वर महाराज मराठी माहिती pdf| sant dnyaneshwar essay in marathi |Sant dnyaneshwaer Maharaj speech essay in Marathi 

संत ज्ञानेश्वर निबंध भाषण मराठी माहि

     नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर आज आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विषयी माहिती निबंध मराठी भाषण बघणारा आहोत ते तुम्हाला तुमच्या शाळेत कॉलेज आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा मध्ये कामी येईल तर चला बघूया संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विषयी माहिती 

➡️ख्रिसमस नाताळ निबंध मराठी

संत ज्ञानेश्वर निबंध भाषण मराठी माहिती | sant dnyaneshwar essay in marathi

"महाराष्ट्राच्या क्षितिजावरती 
दिव्य चमकला तारा 
अंधरूढीच्या येथे थांबला
बलशाली हा वारा."
      मानवतेची मूल्ये समाजाला देणारे, ज्ञानियांचा राजा, वेदांचा ज्ञाता, ज्ञानाचा सागर संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म इ.स. १२७५ मध्ये भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ असलेल्या आपेगाव या गावात झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई आणि वडिलांचे नाव विठ्ठलपंत असे होते.

ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळातच विरक्त संन्याशी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला. ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.

       विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी येथे स्थायिक झाले. त्या काळी संन्यास्याची मुळे म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. कारण तत्कालीन सनातनी समाजात एका संन्यासी व्यक्तीने गृहस्थाश्रम स्वीकार करणे मंजूर नव्हते. शास्त्री - पंडितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतांनी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले.आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना फार भास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे त्यांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.

➡️गुरुनानक जयंती मराठी भाषण निबंध 2022 

     संत ज्ञानेश्वर यांनी 'भगवद्गीता' या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा 'भावार्थदीपिका' अर्थात 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ लिहिला. तसेच त्यांनी अमृतानुभव' हा ग्रंथ लिहिला. त्यांनी आपल्या ग्रंथांतून व अभंगांतून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचारता येईल, असा आचारधर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. संत ज्ञानेश्वर प्रसिद्ध संत, कवी, योगी व तत्त्वज्ञ होते.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही. कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरीतील 'पसायदान' उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ व संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत.


''जो जे वांछील तो ते लाहो' असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त 'माऊली' म्हणतात.

    आपल्या मराठीचे भाग्य असे आहे की तिचा पहिलाच कवी एवढा मोठा महाकवी होऊन गेला की त्याच्या काव्यशक्तीला स्पर्श करणारे सामर्थ्य अजून निर्माण झालेले नाही. अमृताची गोडवी आपल्या मराठी भाषेच्या गोडवीपुढे कमी पडते. संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्र भूमीत घडलेला सर्वांत मोठा महान चमत्कार आहे.संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी इ.स. १२९६ मध्ये संजीवन समाधी घेतली. त्यानंतर अवघ्या वर्षभरातच निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.

"अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र । 
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपाल। 
तथा आठविता महापुण्यराशी। 
नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराशी ।।"

हे पण वाचा ⤵️

FAQ
Q.1)संत ज्ञानेश्वर महाराजांचा यांचा जन्म कधी झाला?
Ans.संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म इ.स. १२७५ मध्ये भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला झाला.

Q.2)संत ज्ञानेश्वर महाराजांचा यांचा जन्म कुठे झाला?
Ans.महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ असलेल्या आपेगाव या गावात झाला. 

Q.3) संत ज्ञानेश्वर महाराजांचा यांचा आई वडिलांचे नाव काय आहे?
Ans.त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई आणि वडिलांचे नाव विठ्ठलपंत असे आहे.

Q.4)संत ज्ञानेश्वरांनी कधी व कुठे समाधी घेतली?
Ans.संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी इ.स. १२९६ मध्ये संजीवन समाधी घेतली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad