Type Here to Get Search Results !

होळी सणाची माहिती मराठी निबंध | information about Holi in Marathi

होळी सणाची माहिती मराठी निबंध | information about Holi in Marathi     

       नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण सर्वांचा आवडीचा सन होळी याबद्दल मराठी माहिती निबंध बघणारा आहोत.हे तुम्हाला नक्कीच आवडेल.
अनुक्रनिका (toc)

होळी सणाची माहिती मराठी निबंध | information about Holi in Marathi     

  आपल्या देशात बरेच सण साजरे केले जातात त्यापैकी माझा सर्वात आवडीचा सण म्हणजे होळी. सर्वजण आनंदात आणि उत्साहात हा सण साजरा करतात. होळी हा सण मुख्यतः हिंदू धर्माचे लोक साजरा करतात.

फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. हा दोन दिवस चालणारा सण आहे. पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते. या दिवशी सर्वजण होळीची पूजा करतात.होळीच्या भोवती सर्वजण नाचतात, गातात. ठोबांच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी पंचपक्वान बनविले जातात, पुरणपोळी बनविली जाते. नातेवाइक तसेच शेजाऱ्यांना गोडधोड पदार्थ तसेच मिठाई वाटली जाते.

होळी पेटत असताना त्या अग्निमध्ये सर्व पापांचा सर्वनाश होतो,वाईट गोष्टींचा अंत होतो असे मानले जाते. वाईट गोष्टींना मागे टाकून आयुष्याची एक नवीन सुरूवात करणे हा त्यामागच उददेश असतो. होळीचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमी किंवा धुलीवंदना या दिवशी सगळे एकमेकांना रंग लावतात. होळीच्या आधीच सर्वजण बाजारातून रंग, गुलाल, पिचकारी यासारख्या 'वस्तू खरेदी करतात. धुलीवंदनाच्या दिवशी सर्वजन आपल्या नातेवाईकाकडे तसेच मित्रमंडळीकडे जाऊन त्यांना रंग, गुलाल लावताता आपआपसातील वैर भाव विसरून सर्वजण होळीच्या रंगामध्ये रंगून जातात:

अशाप्रकारे सर्वांना आनंद देणारा, उल्हास देणारा "हा सण आहे सगळ्यांना एकत्र येण्यास तसेच मनामध्ये एकात्मतेची भावना निर्माण करण्यास हा सब मदत करतो.

होळी सणाचा 10 ओळी मराठी निबंध|Holi festival 10 row essay in Marathi

1.होळी हा भारतातील एक प्रमुख सण आहे..
2.या सणाला आपण 'शिमगा' असेही म्हणतो.
3.हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेल साजरा केला जातो..
4.होळी हा सण दोन ते तीन दिवस साजरा केला जातो.
5.होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते.
6.या दिवशी लोक लाकडे, गोवऱ्या इ. गोळा करून होळी पेटवतात...
7.सर्वजण पेटलेल्या होळीभोवती गाणी म्हणत,नाचत प्रदक्षिणा घालतात.
8.या दिवशी भगवान विष्णूने आपला भक्त प्रल्हाद याला राक्षस राजा हिरण्यकश्यपू व होलिकापासून वाचवले होते.
9.होळीच्या दुसऱ्या दिवसाला धूलिवंदन किंवा धुळवड असे म्हणतात..
10.या दिवशी घरोघरी स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात.

होळी हा सण आपल्याला एकतेची व बंधुभावाची  शिकवण देतो..हे पण वाचा ⤵️


FAQ
Q.1) होळी हा सण कधी साजरा केला जातो ?
Ans- फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो.

Q.2) या वर्षी होळी कधी साजरी केली जाणार आहे?
Ans- या वर्षी होळी 8 मार्च ल साजरी केली जाणार आहे.

Q.3) होळी चा दुसरा दिवस कोणता आहे?
Ans -होळीचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमी किंवा धुलीवंदना या दिवशी सगळे एकमेकांना रंग लावतात. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad