Type Here to Get Search Results !

नागपंचमी मराठी माहिती 2022|Nagpanchmi Marathi Mahiti 2022

नागपंचमी मराठी माहिती 2022 | Nagpanchmi Marathi Mahiti 2022


नागपंचमी मराठी माहिती 2022


    नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण नागपंचमी विषयी माहिती,कवता आणि नागपंचमी ची कहाणी बघणार आहोत.


अनुक्रनिक (toc)

नागपंचमी मराठी माहिती 2022 | Nagpanchmi Marathi Mahiti 2022

     श्रावण महिन्यात येणारा पहिला महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी.हा सण श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी सर्वत्र आनंदात व उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी स्त्रिया तसेच मुली या सणाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. नागपंचमीच्या दिवशी ग्रामीण भागातील स्त्रिया वारुळा जवळ जाऊन नागाची आरती व पूजा करतात. नागदेवतेला दूध, लाह्या तसेच पुरणाची दिंड इ. यांचा नैवेद्य दाखवतात , झिम्मा फुगडी खेळतात,नागपंचमीची गाणी म्हणतात.      शहरी भागातही स्त्रिया देवापुढे नागदेवतेचा फोटो काढून किंवा नागदेवतेचे चित्र भिंतीवर चिकटवून त्याची पूजा करतात. या सणाच्या आदल्या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदी काढतात तसेच आपल्या भावाच्या प्रगतीसाठी व चांगल्या आरोग्या साठी उपवास करतात. त्यास भावाचा उपवास असेही म्हणतात.
       भारतीय संस्कृतीत प्राण्यांना पक्ष्यांना विशेष आदराचे स्थान दिले गेले आहे. नाग या प्राण्याला देखील भारतीय संस्कृतीत विशेष स्थान आहे. शेषनाग व भगवान विष्णू यांचे नाते तर आपणास माहीत आहेच . भगवान महादेवांनी देखील गळ्यात नाग धारण करून सर्व मानवजातीला नागांचे रक्षण करण्याचा जणू संदेशच दिला आहे. नाग हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे. शेतीचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांना खाऊन नाग जणू एक प्रकारे शेतकऱ्यांची मोठी मदतच करत असतो.                                        
      नागाविषयी आदर व्यक्त करण्यासाठी देशभरात नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण श्रावण महिन्यातील पंचमीला साजरा करतात. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला वंदन केले जाते. हा सण श्रावण महिन्यात साजरा होण्याचे कारण देखील आपण समजून घेतले पाहिजे. आषाढ व श्रावण महिन्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडतो. जमिनीतील सर्व भुयारे व बिळे यात पाणी शिरते. परिणामी सर्व साप आणि नाग बिळातून बाहेर ठिकाणी येतात.
      अनेकदा ते मानवी वस्तीत देखील येतात. अशावेळी माणसां कडून या सर्प प्रजातीला कोणताही धोका पोहचू नये यासाठी  देखील या सणाची परंपरा सुरू झाली असावी. याशिवाय या सणा विषयी अनेक आख्यायिका देखील सांगितल्या जातात. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस देखील श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसा पासून
 नागदेवतेची पूजा ही सर्विकडे प्रचारात आली असे मानले जाते.              

 वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः ।                 ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनञ्जयौ ॥ 
     वरील श्लोकातून पुराणातील आठ प्रमुख नागांचा उल्लेख करण्यात आला आहे. नाग या प्राण्याविषयी समाजात अनेक समज गैरसमज आढळून येतात. तो विषारी असल्याने लोक त्याला घाबरतात. तो आसपास कुठे दिसला की घाबरून त्याला मारण्यासाठी काठी उगारतात. मात्र नाग वा इतर सर्प स्वैतःहून कधीही कोणाला इजा पोहचवत नाहीत. स्वतःच्या संरक्षणासाठी प्रतिहल्ला करत असतात. म्हणून त्यांना इजा न पोहचवता सर्पमित्राच्या सहाय्याने त्याला सुरक्षित ठिकाणी सोडायला हवे.

नागपंचमी मराठी गाणी |
Nagpanchmi Marathi song

कविता.1

आषाढ मासी एकादशी
श्रावण पंचमी कोण्या दिवशी साजने बाई...

आगं त्या पंचमीची लाही 
पोळ्याने घेतली घाई साजने बाई....

आगं त्या पोळ्याचे गोंडे
गणपतीची वाकडी सोंडे साजने बाई...

गणपतीचे मोदक लाडू
महालक्ष्मीला ताट वाढू साजने बाई....


आगं या लक्ष्मीच्या गाठी 
महाळाने केली दाटी साजने बाई....

पितराची शिजते डाळ
पुढे आली घट माळ साजने बाई....


अगं त्या माळेची गाठी
शिलंगनाने केली दाटी साजने बाई....

अगं त्या शिलंगनाचं सोनं 
दिवाळीबाई ने केलं येणं साजने बाई.....

अगं या सटीचा रोडगा
संक्रांतीला दिलाय तोडगा साजने बाई....

अगं या संक्रांतीच सुगड
नव्याची पुनव आली दुगड साजने बाई...

अगं या पुनवेची लोंबी
शिमगा आलाय बोंबाबोंबी साजने बाई....

शिमग्याची मळते कणिक
रंगपंचमी आली आणिक साजने बाई...

अगं या पाडव्याच्या गुडी
आखीतीबाई ने घेतली उडी साजने बाई....

कविता.2

नेण्यास माहेरला आलास भाऊराया 
बहिणीवरी तुझी रे दिसती आलोट माया ||

हा काळ मोसमाचा हा काळ पेरणीचा 
असता विशाल शेती वाटे मला सुखाची नेण्यास....||

गोठयातील गाई हंबरतील मजला सांगू कशी मी त्यांना नेण्यास माहेराला नेण्यास....||

म्हातारे सासू सासरे नणंद एक  
दिर येऊ कशी माहेरी सोडुनी घरदार नेण्यास....||

जाऊनी सांग आईस रमली तुझी ही 
लेक कर्तव्य करीते आपुले सोडुनी सर्व गोत नेण्यास....||

शेवटी निरोप सांगते भाऊराया तुजला 
दिवाळी सणाला यावे तू न्यायाला नेण्यास....||

नेण्यास माहेरला आलास भाऊराया 
बहिणीवरी तुझी रे दिसती आलोट माया ||


नागपंचमी मराठी कहाणी | Nagpanchmi story in Marathi


  हि एक नागोबा देवाची कहाणी आहे, एक गाव होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. ब्राम्हणाच्या सर्व सूना कोण्ही त्यांच्या माहेरी,कोणी आजोबांच्या घरी,कोणी शेजारी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. धाकटी सून मन्हाली माझ्या मनात सर्वत्र नागोबा देव आहेत.अस समजून तिला न्यायला माहेरून नागोबा देव येतील अस मनू लागली.
      शेषभगवानास तिची करुणा आली.नागोबा देवाने ब्राम्हणच वेष घेतला व मुलीला नेण्याकरिता आले. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आताच कोठून आला. ब्राम्हणाने धाकट्या सूनला विचारले हा तुझा मामा आहे का तर  तिनंही हेच माझे मामा आहेत असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी केली. त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं.त्या नगदेवाने तिला खरी कहाणी सांगितली आणि तिला तिला नगदेवणे त्याच्या फानिवर बसवून त्याच्या बायकोला आणि मुलांना सांगितलं की इला कोण्ही चावू नका. 
    एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढे ती बाळंत झाली. तिची पिलं वळवळ करु लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपट भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोहचवू. पुढे ती पूर्ववत आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पोहच केली.
     नागाची पोरं मोठी झाली.आणि ते मुले त्यांच्या आई विचारपूस केली , आमची शेपटं कशान तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून तिच्या घरी आली तेव्हा या मुलीने पाटावर भिंतीवर नागाची चित्रे काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागांना, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत.तीन नागोबा देवापशी देवाची प्रार्थना केली आणि देवाला म्हणाली हे नागोबा देवा जिथे तिथे माझे लाडके भाऊ लांडोबा, पुंडोबा तिथे असतील ते खुशाल राहो,आणि त्यांना सुखसमद्धी लाभो अशी तीनी नागोबा देवाला प्रार्थना केली.हे सर्व बघून त्यांच्या मनातला सर्व राग निघून गेला.आणि त्यांना मनातून तिची दया आली.समोर त्या दिवशी तिथे वस्ती तयार केली,आणि तिथे दूध,पाणी तेवतात त्या दिवशी पहाटेच एक नवरत्नचा हार तिथे ठेऊन निघून गेली.दुसऱ्या दिवशी मुलीने तो हार उचलून गळ्यात घातला आणि तिला नागोबा प्रसन्न झाला.जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां सर्वांना नागोबा प्रसन्न हो .ही नागोबा देवाची कहाणी.
       अश्या प्रकारे नागाची आणि ब्राम्हणाची कहाणी होती,  आपल्या अशी नवनवीन माहिती हव्यात असतील तर आमच्या साईट ला भेट द्या धन्यवाद.


हे पण वाचा⤵️


FAQ
Q.1) नागपंचमी हा सण कधी साजरा केला जातो ?
Ans.नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी सर्वत्र आनंदात व उत्साहात साजरा केला जातो

Q.2)महादेवांनी नागाला थान कुटे दिले आहे ?
Ans. महादेवांनी नागाला गळ्यात थान दिलं आहे.

Q.3)कालिया नागाचा वद कोणी कीला ?
Ans. कालिया नागाचा वद श्रीकृष्णाने यमुना नदीत केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad