Type Here to Get Search Results !

मकर संक्रांत हळदी कुंकू स्पेशल उखाणे मराठी | makar Sankranti Haldi Kunku ukhane

मकर संक्रांत हळदी कुंकू स्पेशल उखाणे मराठी |मकर संक्रांत मराठी उखाणे| makar Sankranti Haldi Kunku ukhane |Makar sankranti special ukhane in Marathi

मकर संक्रांत मराठी माहिती 2022:   नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नवीन वर्षाचा पहिला सण आणि सर्व महिला मंडळाच्या आवडीचा सण म्हणजे मकर संक्रांत. हा सण सर्व देशभरात मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो आणि या दिवशी सर्व महिला एकत्र येतात आणि एकमेकींना वान देतात व तसेच या दिवसी महिला हळदीकुंकाचा कार्यक्रम मकर संक्रांतीच्या दिवशी ठेवतात.व सर्व महिला उखाणे घेतात ही आपली प्रथा आहे.तर चला बघूया या वर्षाचे नवीन नवीन स्पेशल हळदी कुंकवाचे उखाणे.

मकर संक्रांत हळदी कुंकू स्पेशल उखाणे मराठी | makar Sankranti Haldi Kunku ukhane 

हळदी कुंकवाचे स्त्रियांचे स्पेशल उखाणे 

तिळासारखा असावा स्नेह गुळासारखी असावी गोडी ईश्वर सुखी ठेवो माझी आणि रावांची जोडी 


संक्रांत फेमस उखाणा 

तुळजापूरच्या देवीला अलंकराचा साज...रावांच नाव घेते संक्रांत आहे आज


संक्रांत हळदी कुंकवाचे उखाणे 

ताजमहल बांधण्यासाठी कारागिर होते कुशल..,रावांच नाव घेते संक्रांतीकरीता स्पेशल 


Haldi Kunku special ukhana 

पतीच्या हृदयात असते प्रेमाची आस...रावांच नाव घेते संक्रांतीच्या सणाकरीता खास


हळदी कुंकवाचे स्त्रियांचे स्पेशल उखाणे 

संक्रांतीचा हलवा कागदाच्या पुड्यात ..रावांच नाव घेते मैत्रिणीच्या वाड्यात


हळदी कुंकवाचे स्त्रियांचे स्पेशल उखाणे 

संक्रांत किंक्रांतीच्या आधी असते भोगी.. रावांच्या सेवेला सदा असते उभी


हळदी कुंकवाचे स्त्रियांचे स्पेशल उखाणे 

संक्रांतीच्या सणाला असतो सुगड्याचा मान ...रावांच्या जिवावर देते हळदीकुंकाच वाण 


Haldi Kunku special ukhana 

आईसारखी माया जगात नसते कुणाला... रावांच नाव घेते संक्रांतीच्या सणाला 


संक्रांत हळदी कुंकवाचे उखाणे 

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी....रावांच नाव घेते संक्रांती दिवशी


Sankrant Marathi ukhana

संसाररूपी जिवनात सासुसासरे आहेत होशी ..रावांच नाव घेते संक्रांती दिवशी 


हळदी कुंकवाचे स्त्रियांचे स्पेशल उखाणे 

कुंकु म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ.. रावांच नाव घेते हळदी कुंकाची वेळ 



मकर संक्रांतीचे उखाणे लिहिलेले ⤵️


हे पण वाचा ⤵️


FAQ
Q.1) या वर्षी मकर संक्रांत कधी आहे?
Ans.15 जानेवारी या रोजी मकर संक्रांत साजरी केली जाणार.

Q.2)संक्रांतीच्या दिवशी महिला काय करतात?
Ans. या दिवशी महिला एकत्र येतात आणि एकमेकींना वान देतात.

Q.3)दक्षिणी भारतात हा सण कोणत्या नावाने ओळखला जातो?
Ans.दक्षिणी भारतात हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad