Type Here to Get Search Results !

मकर संक्रांत माहिती मराठी | मकर संक्रांत निबंध मराठी | makar Sankrant Marathi mahiti

मकर संक्रांत माहिती मराठी | मकर संक्रांत निबंध मराठी |makar Sankrant Marathi mahiti |makar Sankrant essay in marathi|Makar sankran popular ukhane in Marathi 

  
मकर संक्रांत माहिती मराठी | मकर संक्रांत निबंध मराठी

 नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नवीन वर्षाचा पहिला सण आणि सर्व महिला मंडळाच्या आवडीचा सण म्हणजे मकर संक्रांत. हा सण सर्व देशभरात मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो आणि या दिवशी सर्व महिला एकत्र येतात आणि एकमेकींना वान देतात व तसेच या दिवसी महिला हळदीकुंकाचा कार्यक्रम मकर संक्रांतीच्या दिवशी ठेवतात.व सर्व महिला उखाणे घेतात ही आपली प्रथा आहे.तर चला आपण मकर संक्रांतीची माहिती बघूया मकर संक्रांतीचे उखाणे मराठी 2022

अनुक्रनिका (toc)

मकर संक्रांत माहिती मराठी | मकर संक्रांत निबंध मराठी | makar Sankrant Marathi mahiti 

मकर संक्रांती हा एक हिंदू सण आहे. हा वर्षांचा पहिला सण असतो. दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी ला हा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्याचे संक्रमण मकर राशीमध्ये होते. सर्व हिंदू धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात.
       मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित सण आहे. दक्षिणी भारतात हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वीवरूनन पाहिले असता,सूर्याच्या उगविण्याची जागा या दिवसापासून दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
     संक्रांतीचा आदला दिवस भोगी या नावाने साजरा होतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंगभाज्या, फळभाज्या यांची तीळाचे कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे महत्व विशेष आहे. थंडीच्या दिवसात उष्ण अशा तिळाचे आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते.

➡️चंपाषष्ठी मराठी माहिती 2022

      महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी, संक्रांत व किंक्रांत अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.
      नवविवाहित वधूचे हळदीकुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांचे कौतुक केले जाते. लहान बालकांनाही संक्रांती निमित्त काळ्या रंगाचे कपडे घालणे, हलव्याचे दागिने घालणे अशी पद्धती दिसून येते. चुरमुरे, बोरे, हरभरे, ऊसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर घातले जाते. अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्कीटे घालण्याची हौसही दिसते. याला बोरन्हाण असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.
    संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोताणे, वावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करायचा. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतु तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे. खरचं! "तिळ गुळ घ्या गोड बोला" या शब्दात केवळ अर्थ भरला आहे. आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.


      संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोताणे, वावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करायचा. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतु तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे. तिळ गुळ घ्या गोड बोला "
अश्या प्रकारे आपण मकर संक्रांत सणाची माहिती मराठी निबंध हे सर्व आपण बघीतले आहे.तर माहिती आवडल्यास नक्की शेअर आणि कमेंट करा धन्यवाद.

मकर संक्रांतीचे उखाणे ⤵️


मकर संक्रांतीचे उखाणे लिहिलेले ⤵️


हे पण वाचा ⤵️

हे पण वाचा⤵️



FAQ
Q.1) मकर संक्रांत हा सण कधी साजरा केला जातो?
Ans.दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी ला हा सण साजरा केला जातो.

Q.2)दक्षिणी भारतात हा सण कोणत्या नावाने ओळखला जातो?
Ans.दक्षिणी भारतात हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो.

Q.3)महाराष्ट्रात हा सण कीती दिवस साजरा केला जातो व त्याची काय नाव आहेत?
Ans.महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी, संक्रांत व किंक्रांत अशी नावे आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad