Type Here to Get Search Results !

चंपाषष्ठी मराठी माहिती 2022 | champa shashti 2022

चंपाषष्ठी मराठी माहिती 2022 |चंपाषष्ठी मराठी माहिती निबंध pdf|champa shashti 2022  

       नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण चंपाषष्ठी म्हणजे खंडोबा नवरात्र हे बघणारा आहोत तर आपण खंडोबा यांची मराठी माहिती ,चंपाषष्टीचे महत्व व चंपाषष्टी कशी साजरी केली जाते आणि खंडोबा नवरात्र करण्याची पध्दत,नैवद्य कोणता द्यावा ,तळी कशी भरावी ही सर्व माहिती आपण खालील प्रमाणे बघणार आहोत तर आपण माहिती बघूया 

चंपाषष्टीचे महत्व मराठीत| champa shashti mahatv in marathi

खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत, याचा निवास आहे महाराष्ट्रातील जेजुरी गडावर. या खंडोबाच्या हातात खांडा नावाची तलवार होती म्हणूनच त्याचे नाव पडले खंडेराया किंवा खंडोबा. हा खंडोबा म्हणजे शिवाचा अवतार आणि अशा या खंडोबाचा उत्सव म्हणजेच खंडोबाचं नवरात्र आणि चंपाषष्ठी जस देवीच नवरात्र असत तसचं खंडोबाच असत पण ते षडरात्र म्हणजे सहा दिवस व रात्र असतं तर असे हे मल्हारी नवरात्र मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी सुरु होते मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेपासुन ते शुध्द षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. षष्ठी म्हणजे सहा असा हा सहा दिवसांचा उत्सव जेजुरीला मोठ्या प्रमाणात व अतिशय भक्तिभावाने साजरा होतो. जेजुरी प्रमाणेच खंडोबाच्या इतर देवळातही हा उत्सव साजरा केला जातो.

      आता आपण हा उत्सव का साजरा केला जातो त्यामागची कथा जाणुन घेऊया. मार्तंड भैरवाने आणि मल्ल या दैत्यांचा संहार केला आणि भूतलावरील मोठे अरिष्ट टळले. त्याच्याच विजयोत्सवात देवगणांनी मार्तंड भैरवावर भंडाऱ्या बरोबरच चंपाषष्ठी म्हणजेच चाफ्याच्या फुलांची वृष्टी केली म्हणुनच मार्गशीर्ष शुध्द षष्ठीला चंपाषष्ठी हे नाव मिळाले आणि या उत्सवाची सुरुवात झाली.

चंपाषष्टी कशी साजरी करावी | How to celebrate Champashashti

खंडोबाचा वार रविवार म्हणून शक्यतो त्याच दिवशी हे कुलाचार करतात कुलाचाराप्रमाणे पूजेत सुपट व टाक असतात. आता हा खंडोबाचा टाक कसा असतो तर यात घोडा आणि खंडोबा असतो या टाकाची स्थापना नवरात्रात केली जाते. नवरात्रप्रमाणेच माळा वाढवत घटावर फुलांच्या माळा लावल्या जातात. नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या 'दिवशी तो सोडतात. देवाला बेल, दवणा, चाफ्याची आणि झेंडूची फुले वाहिली जातात. सहा दिवस नंदादीप लावतात.

खंडोबा नवरात्र करण्याची पध्दत 

 कोणाकडे टाक असतो तो बसवला जातो, कोणाकडे खंडोबाची मूर्ती असते, कोणाकडे कलश असतो कलशावर ताम्हण ठेवून त्यात तांदूळ पसरतात त्यावर खंडेरायाची मूर्ती स्थापना केली जाते. कोणाकडे माळाबंधन असते म्हणजे काय तर विड्याच्या पानांच्या किंवा झेंडूच्या माळा सोडल्या जातात. काही जणांकडे उपवास केले जातात. जागरण गोंधळ असतो, तळी आरती सुध्दा असते.

नैवद्य कोणता द्यावा 

प्रथम देवघरातील सर्व देवांची पंचामृताचा म्हणजेच (साखर, दही, दूध, तूप, मध ) या मश्रणाचा अभिषेक करून पूजा करुन घ्यावी. त्यानंतर कलश, घंटा, गणपती, शंख, यांची पूजा करावी. प्रथम हळदीकुंकू वाहून मग फुले वहावीत. कलशात सुपारी फूल अक्षता वहाव्यात आणि मग त्यात विड्याची पाने ठेवावीत. नारळाला हळदी कुंकू वाहून तो कलशावर ठेवावा. कलशाखाली अक्षता ठेवून मग त्यावर कलश ठेवावा. 

त्यानंतर गणपतीची पूजा करावी यासाठी गणपती ताम्हनात घ्यावा. हळदकुंकू अक्षता वाहून दुधाचा अभिषेक करावा, नंतर पाणी घालून पुसून घ्यावा. मग गणपती जागेवर ठेवून हळदीकुंकू, फुले ववाहीत नंतर खंडोबाचा टाक ताम्हनात घ्यावा दुध व पाण्याचा अभिषेक करून पुसून घ्यावा नंतर एक विड्याचे पान घेऊन त्यावर स्वस्तिक काढावे आणि त्यावर तो टाळ ठेवावा. हळदीकुंकू वहावे. हळद जास्त वहावी कारण खंडोबाला हळद जास्त प्रिय आहे. पिवळे फूल वहावे.नंदादीप लावावा, तो सहा दिवस ठेवावा आणि तळी आरती करावी. आता आपण तळी आरती म्हणजे तळी भरण्याचा विधी पाहूया.

तळी कशी भरावी 

खंडोबाच्या उपासनेत भंडारा म्हणजेच (हळदीची पूड) फार महत्वाचा आहे. देवाला नैवद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. आता हा विधी घरी देवासमोर कसा करावा ते पाहू.

ताम्हनामध्ये विड्याची किंवा नागिणीची पाने, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे, भंडारा म्हणजेच हळदेची पूड हे साहित्य घेऊन तीन, पाच, सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळीनी एकत्र येऊन "सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार" असे मोठ्याने तीन वेळा म्हणत ताम्हण उचलावे. त्यानंतर पानाचा विडा ठेवून म्हणतात (काही घरांमध्ये डोक्यावरील टोपी, रुमाल भुवा वरत्र जमिनीवर ठेवतात) त्यावर ताम्हण ठेवतात. एक विडा देवासमोर मांडला जातो तळी उचलणाऱ्या प्रत्येका पुढे एक एक विडा ठेवाला जातो.

खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी दिवशी ठोंबरा (म्हणजेच जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालतात) तर असा ठोंबरा पुरणावरणाचा नैवद्य, कणकेचा रोडगा किंवा बाजरीचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा आणि लसुन या सर्वांचा नैवद्य करावा. या नैवद्याने तळीचे ताट सजवावे. ते कसे तर या ताटात पाच बाजरीचे रोडगे घ्यावेत त्यावर वांग्याच भरीत घालाव. एका ताटात पाच विड्याची पाने ठेवून खोबऱ्याचे तुकडे, भंडारा व रुपया ठेवावा. ऊस असल्यास पाच ऊसाची झोपडी करावी अस हे नैवद्याचे तळीचे ताट तयार झाल्यानंतर घोडा, गाय, कुत्रा यांना नैवद्याच्या ताटातील घास द्यावा.घटस्थापना करुन नातलांगाना सोबत घेऊन तळी भंडार कराव. उपस्थितांना भंडारा लावून पानसुपारी खोबरे द्यावे. अशा रितीने या चंवाषष्ठीच्या निमित्ताने खंडेरायाच नवरात्र साजरं केल जातं आणि खंडेरायाची उपासना केली जाते.


मकर संक्रांतीचे उखाणे लिहिलेले ⤵️


हे पण वाचा ⤵️

हे पण वाचा⤵️


FAQ
Q.1)महाराष्ट्राचे कुलदैवत कोण आहेत ?
Ans.खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत.

Q.2) खंडोबा यांचा निवास स्थान कोणते आहे?
Ans.याचा निवास आहे महाराष्ट्रातील जेजुरी गडावर.

Q.3) खंडोबा यांचे नाव खंडोबा कसे पडले?
Ans.खंडोबाच्या हातात खांडा नावाची तलवार होती म्हणूनच त्याचे नाव पडले खंडेराया किंवा खंडोबा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad