Type Here to Get Search Results !

दत्त जयंती मराठी माहिती 2023 | Datta jayanti marathi mahiti 2023

दत्त जयंती मराठी माहिती 2023 | Datta jayanti marathi mahiti 2023 |कधी आहे दत्त जयंती? जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व |Datta jayanti date and time | दत्त जयंती माहिती |Datta jayanti mahiti 2023 |दत्त जयंतीची संपूर्ण माहिती | Datta jayanti information in Marathi


दत्त जयंती मराठी माहिती 2023


 दत्त जयंती 2023 : नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दत्त जयंती आपन आनंदाने साजरी करणार आहोत.भगवान दत्त यांच्या वाढदिवशी दत्त जयंती किंवा दत्तात्रेय जयंती असे म्हणतात.दत्त जयंतीची संपूर्ण माहिती आपण खालील लेखात मधे बघनार आहोत.


अनुक्रनिका (toc) 

दत्त जयंती मराठी माहिती 2023 | Datta jayanti marathi mahiti 2023 


    नमस्कार दत्त जयंती ही 26 डिसेंबर 2023 या दिवशी साजरी केली जाईल. या दिवशी सकाळी 5 वाजून 46 मिनिटांनी पौर्णिमेला सुरवात होत आहे तर समाप्ती 27 डिसेंबरला सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी होणार आहे. हा मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस दत्त जयंती असेल. दत्त जयंती निमित्त सर्व दत्त मंदिरामध्ये दत्त जन्म साजरा केला जातो अनी भंडार्‍याचेही आयोजन केले जाते.

      श्रीगुरुदेव दत्त हे नाथ संप्रदायातील आद्यगुरु मानले जातात. मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला दत्ताचा जन्म झाला. म्हणून यादिवशी सर्व जागृत दत्तक्षेत्रात तसेच सर्व दत्तमंदिरांमध्ये दत्तजयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'आत्रेय' यापासून बनला आहे.आपण ब्रह्म, निर्गुण व मुक्त असल्याची जाणीव ज्याला आहे तो 'दत्त'. अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्रीदत्त जन्माच्या विविध आख्यायिका सांगितल्या जातात. श्रीदत्त हे माता अनुसूया व महर्षी अत्री यांचे पुत्र आहेत.


     अत्रीऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश यांनी हवा तो वर माग असे अत्री ऋषींना सांगितले. अत्रीऋषींनी तिघांनाही विनंती केली की आपण पुत्र म्हणून माझ्या पत्नीच्या उदरी जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली आणि ते अत्रिऋषी व अनुसूयेचे पुत्र झाले. त्याचबरोबर शुभात्रेयी नावाची कन्या देखील अत्रीऋषींना प्राप्त झाली. हिंदू संस्कृतीत ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्चपरी आहे. या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच 

       श्री गुरुदेव दत्त.दत्तजयंतीला मनोभावे दत्त व्रत व दत्तपूजा केल्यास भक्तांचे सर्वमनोरथ पूर्ण होतात अशी मान्यता आहे.दत्तजयंती उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण केले जाते यालाच गुरुचरित्रसप्ताह म्हणून ओळखले जाते. यादिवशी दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. यादिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन केले जाते. अशाप्रकारे दत्तजयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली जाते.



हे पण वाचा ⤵️


FAQ
Q.1)दत्तात्रे यांचा जन्म कधी झाला ?
Ans. मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला दत्ताचा जन्म झाला.

Q.2)या वर्षि दत्त जयंती कधी आहे ?
Ans. 26 डिसेंबर 2023 या दिवशी साजरी केली जाईल. 

Q.4)श्री दत्त यांच्या आई वडीलांचे नाव की आहे ?
Ans. श्रीदत्त हे माता अनुसूया व महर्षी अत्री यांचे पुत्र आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad