Type Here to Get Search Results !

गणेश चतुर्थी मराठी माहिती | Ganesh Chaturthi Marathi Mahiti

गणेश चतुर्थी मराठी माहिती |Ganesh Chaturthi essay in Marathi | Ganesh Chaturthi Marathi Mahiti pdf | गणेश चतुर्थी निबंध मराठी 

गणेश चतुर्थी मराठी माहिती

गणेश चतुर्थी २०२२:आज आपण पाहतो प्रत्येक वर्षी गणपतीच्या आगमनाची वाट लाखो भक्त मोठ्या उत्सुकतेने आणि आतुरतेने पाहत असतात. गणेश चतुर्थी च्या दिवसी मोठ्या जल्लोषाने व आनंदाने गणरायांचे स्वागत केले जाते.
      आता सुदधा नेहमीप्रमाणे ह्या वर्षी देखील पुन्हा एकदा सर्व गणेशभक्तांच्या लाडक्या आराध्य दैवताचे म्हणजेच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे.म्हणुन आज ह्याच आनंदाच्या उत्सवाच्या निमित्ताने आपण गणेशचतुर्थी म्हणजे काय,गणेश चतुर्थी कधी आणि केव्हा साजरी करतात, गणेश चतुर्थी मराठी कविता व निबंध इत्यादी गोष्टी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. 

अनुक्रनिका (toc)

गणेश चतुर्थी निबंध मराठी | Ganesh Chaturthi Nibandh in Marathi 

      आपल्या देशात अनेक जाती धर्माचे लोक राहतात.त्यामुळे वर्षभर विविध सण साजरे केले जातात. आणि त्यातीलच एक सण ज्याची, प्रत्येक जण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो, तो सण म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सव हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे. भाद्रपद चतुर्थीस गणरायाचे आगमन होते.
     अकरा दिवस चालणारा हा उत्सव अनंत चतुर्थीला गणपतीच्या विसर्जनानंतर संपतो.गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी महिनाभर आधीपासून घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये सजावट करण्याची तयारी सुरू होते. या सजावटी मधून काही न काही चांगला संदेश समाजाला दिला जातो.
     गणपती बाप्पाची मूर्ती आणताना खूप वाजत-गाजत आणली जाते. सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण असते, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा अर्चना करून मूर्तीची स्थापना केली जाते. गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो, त्यानंतर आरती होते, टाळ व टाळ्यांच्या आवाजाने घर दुमदुमून जाते. गणपती निमित्त सर्व मित्र परिवार व नातेवाईक
घरी एकत्र येतात, आनंदी आनंद होतो. गणेश उत्सवाच्य दिवशी सार्वजनिक मंडळांमध्ये तसेच घरी विविध स्पर्धा भरविल्या जातात. लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत सर्व स्पर्धेत सहभागी होतात. घर-अंगण अगदी प्रसन्न होऊन जाते.
       छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गणेश उत्सव साजरा केला जातो, पूर्वी हा उत्सव कुटुंबापर्यंत सिमीत होता. सन १८९३ पासून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे रूप दिले. सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावे, धर्मवाद, जातिवाद दूर व्हावे, सर्वांनी मिळून मिसळून रहावे जेणेकरून लोकांमध्ये एकी राहील एकोपा राहील हा यामागील उद्देश होता.
गणेशोत्सव हा सण माझा आवडता आहे.याचे कारण, या सणात घरातील सर्व नातेवाईक, मित्र मंडळी, समाजातील विविध जाती धर्माचे लोक वाद-विवाद, राग रुसवे विसरून एकत्र गणपतीचा सण साजरा करतात. सर्वजण आनंदी असतात. हा सण घरच्यांना व समाजाला एकत्र आणण्याचे काम करतो.
        लोक गणपत्ती दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा अकरा दिवस हा सण साजरा करतात. अकराव्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचे वाजत गाजत विसर्जन केले जाते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, पण मन उदास असते, कारण बाप्पांचे विसर्जन होणार असते. बाप्पा आपल्याला सोडून जाणार असतात.म्हणूनच तर म्हणतात,गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा हा गणेश उत्सव उत्साहाने आणि आनंदाने साजरा होतो.


गणेश चतुर्थी म्हणजे काय | What is Ganesh Chaturthi

        गणेश चतुर्थी हा सण समस्त हिंदू धर्मातील 
लोकांद्वारे एकत्रितपणे साजरा केला जाणारा सण आहे हा सण भारतातच नाही तर बाकीच्या देशात सर्व गणरायाचे भक्त मोठ्या जल्लोषाने आणि उत्साहाने साजरा करतातहा दिवस महाराष्ट्रात मोठ्या जल्लोष मध्ये हा सण साजरा करत असतात. आणि आपल्या हिंदू धर्मातील पुराणात सुद्धा हे लिहिलेले आहे की या दिवशी गणपती बाप्पा चा जन्म झाला होता म्हणुन गणेश चतुर्थी हा दिवशी भक्ता द्वारे गणपती ची पुजा, आराधना केली जात असते व तसेच गणपती बाप्पा चया मूर्तीची स्थापना केली जाते आणि नऊ दिवस सर्व गणेशभक्त भक्तिभवणेने गणरायाची आरती करतात.
    गणेश विसर्जना एक दिवस अगोदर गणपती बाप्पाच्या मूर्तीची सजावट करत असतात ती बघण्यासाठी दूरदूर वरून भविकबक्त बघण्यासाठी येतात हे आपल्याला दिसून येते आणि नंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना झाल्यावर नऊ दिवसानी एखाद्या जवळपासच्या नदीत समुद्रात गणपतीचे विसर्जन केले जाते.

2022 मध्ये गणेश चतुर्थी कधी साजरी केली जाणार आहे?

२०२२ मध्ये गणेश चतुर्थी ही ३१ ऑगस्ट रोजी बुधवार या दिवशी सर्व गणेशभक्तांद्वारे साजरी केली जाणार आहे. 

गणेश चतुर्थी केव्हा आणि कधी साजरी करतात?

हिंदू धर्माच्या पांचांगमधे स्पष्ट लिहिलेले आहे की प्रतेक वर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल चतुर्थीच्या दिवसी सर्व हिंदु धार्मिक लोक गणेश चतुर्थी हा सण मोठ्या जल्लोषाने साजरा करतात.
 

गणेश चतुर्थी मराठी कविता | Ganesh Chaturthi Marathi Kavita


ढोल-ताशा जयघोष उडे गुलाल अंबरी 
गणेशाची स्वारी आली चतुर्थीला घरोघरी !!

गजानन गणराज स्वार मूषकाच्या वरी 
लंबोदर वक्रतुंड मूर्ती दिसते साजरी !!

दहा दिवस मुक्काम राखू त्यांचा मान-पान 
लाडक्या या पाहुण्याला घरामध्ये उच्च स्थान !!

एकवीस मोदकांचा रोज नैवेद्याचा थाट 
बाप्पापुढे गोडधोड पंचपक्वान्नाचे ताट !!

पुष्पहार दुर्वांकुर रोज रांगोळ्या आरती 
आपापल्या कुवतीने भक्त पूजन करती !!

सेवा करून ही का हे देव भक्तांवर रुसले 
रूप नेहमी सारखे नाही बाप्पांचे खुलले !!

सांगा गणराया आम्हा काय आमचे चुकले 
झाले काय अघटीत भक्त शरणाशी आले !!

किती घालता धिंगाणा बोले गणेशा 
गर्जून रोज रात्रीचा तमाशा अरे गेलो रे थकून !!

कळती रे आपोआप मला मनातले भाव 
कान - कर्कश आवाज नाही भक्ती त्याचे नाव !!

माझ्या डोळा पाहवेना लूटमार देणगीची 
चढाओढ मारामाऱ्या स्पर्धा नको दिखाव्याची !!

नैवेद्याच्या नावाखाली किती नासाडी अन्नाची 
ज्यांच्या पोटी भूक तिथं करा कमाई पुण्याची !!

एकतेला जपण्यास सुरु झाला होता 
सण भ्रष्ट झाले जगी सारे त्याने दुःखी माझे मन !!

ध्यास विकासाचा ठेवा त्यात आपली प्रगती 
वेळ सत्कारणी लावा जपा आपली संस्कृती !!

गणेश चतुर्थीच्या व्रताचे नियम जे आपण पाळणे गरजेचे आहे?

  • गणेश चतुर्थी च्या दिवशी व्रत करतेवेळी आपण पिवळ्या रंगाचे कपडे घालायला हवीत  
  • गणेश चतुर्थी या दिवशी गणपत्ती बाप्पाला दुर्वा  वाहावेत.
  • गणेश चतुर्थी च्या दिवश  आपण गणपतीची पूजा करतो तेव्हा गणपती समोर सुपारी सुद्धा तेवायला पाहिजे.
  • गणपती बाप्पाला तुळस ही वज्र करण्यात आली आहे अस म्हणतात म्हणुन आपण गणपतीची आरती तसेच पुजा करताना अजिबात त्यात तुळस वापरायची नाही.
  • गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाच्या समोर मोदक आणि तीळ या दोघांचा प्रसाद आठवणीने ठेवला पाहिजे.
  • गणेश चतुर्थी च्या दिवशी चंद्राचे दर्शन अजिबात करू नये कारण अस म्हणातात की या दिवशी आपण चंद्राचे दर्शन केले तर आपल्यावर खोटा कलंक तसेच आरोप लागतो.
  • गणेश चतुर्थी या दिवशी कोन्हाशिही भांडणे करू नये व कोणाशीही कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये आणि तुम्हाला शक्य असेल तर एखादय गाईला चारा खायला टाकावा व तिची सेवा करावी.  
  • गणेश चतुर्थी या दिवशी  दिवशी ब्राम्हमणाला जेवणाचे आमंत्रण देयला पाहिजे आणि त्याला जेऊ घालून त्यांना थोडीफार दक्षणा द्यावी. 
  • आपण गणरायाची पूजा जेव्हा जेव्हा करतो तेव्हा आपण आपला चेहरा नेहमी पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला ठेवावा.

       अश्या प्रकारे आपण गणेश चतुर्थी बद्धल सविस्तर माहिती बघितली आहे. आजचा लेख आपल्याला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि ही महिती जास्तीत जास्त ठिकाणी शेयर करा.
 
हे पण वाचा ⤵️

 
FAQ
Q.1) या वर्षी गणेश चतुर्थी कधी आहे ?
Ans. या वर्षी गणेश चतुर्थी ३१ऑगस्ट बुधवार या दिवशी आहे.

Q.2)गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे रूप कोणी दिले ?
Ans.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे रूप दिले.

Q.3) लोक गनपत्ती कीती दिवस मांडतात ?
Ans.लोक गणपत्ती दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा अकरा दिवस हा सण साजरा करतात.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad