इंदिरा गांधी भाषण मराठी | indira gandhi speech in marathi | इंदिरा गांधी निबंध मराठी | indira gandhi essay in marathi
इंदिरा गांधी जयंती 2022 : नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला इंदिरा गांधी यांच्या जयंतनिमित्त मी आपणांस इंदिरा गांधी यांच्याबद्दल मराठीत माहिती सांगणारं आहे त्या माहिती नुसार आपण इंदिरा गांधी जयंती निम्मित भाषण इंदिरा गांधी निबंध आणि सूत्रसंचालन करू शकता व तसेच आपण चारोळ्या आणि कवितेच्या आधारे आपण इंदिरा गांधी भाषण निबंध अधिक प्रभावी करू शकता.तर चला इंदिरा गांधी भाषण निबंध व सूत्रसचालन चालू करूया.
इंदिरा गांधी भाषण मराठी | indira gandhi speech in marathi | इंदिरा गांधी निबंध सूत्रसचालन मराठी | indira gandhi essay in marathi
इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी अलाहाबाद येथे झाला. कमला नेहरू व पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांचे आईवडील होते. नेहरू दांपत्याला इंदिरा हे एकमेव अपत्य होते. अलाहाबादमधील आनंद भवन येथे त्यांचे बालपण गेले. त्यांचे बालपण एकाकी आणि दुःखमय गेले.
वडील जवाहरलाल नेहरू हे अनेकदा स्वातंत्र्य चळवळीत व्यस्त असायचे. अनेकदा ते तुरुंगात देखील असायचे. तर त्यांची आई क्षयरोगाने ग्रस्त होती. लवकरच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे बालपणी इंदिरा यांना आई वडिलांचा सहवास फारसा लाभला नाही. जवाहरलाल नेहरू यांच्या सोबत बहुतेक वेळा पत्रांतूनच संवाद होत असे. मार्च 1942 मध्ये त्यांचा विवाह फिरोज गांधी यांच्याशी झाला. राजीव गांधी व संजय गांधी ही त्यांची मुलें त्यांना भारतीय राजकारणात आयर्न लेडी मानले जाते.
वेळप्रसंगी अतिशय कठोर निर्णय घेण्यास त्या कचरत नसत. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. 1966 मध्ये त्या भारताच्या तिसया पंतप्रधान बनल्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान आहेत. जानेवारी 1966 ते मार्च 1977 पर्यंत आणि पुन्हा जानेवारी 1980 ते ऑक्टोबर 1984 पर्यंत सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाची सेवा केली आहे.
इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर काँग्रेसमध्ये काही प्रमाणात फूट पडली. राममनोहर लोहिया हे गुंगी गुडिया असे म्हणून इंदिरांना संबोधत असत. अखेर त्यांनी 1967 मध्ये लोकसभेच्या 545 पैकी 297 जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली पण काँग्रेसला पूर्वीपेक्षा साठ जागेवर नुकसान झाले. मोरारजी देसाई यांच्यासोबत इंदिरांचे मतभेद वाढत गेले आणि काँग्रेस दोन गटात विभागला गेला. शेवटी इतर पक्षांचा पाठिंबा घेऊन त्यांनी सरकार गेले आणि काँग्रेस दोन गटात विभागला गेला. शेवटी वाचवले त्यांनी देशात आणीबाणी लावल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका देखील झाली. त्यांनी सर्वसामान्य भारतीयांच्या हितासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवल्या. जुलै 1969 मध्ये त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच दोन शीख अंगरक्षकांनी नवी दिल्ली येथील पंतप्रधान निवासस्थानाच्या बागेत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. अशाप्रकारे त्यांचा दुर्दैवी अंत झाला. स्त्री पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरण याचा नवा आदर्श त्यांनी आपल्या जगण्यातून जगाला दिला.
हे पण वाचा ⤵️
हे पण वाचा⤵️
FAQ
Q.1) इंदिरा गांधी यांच्या जन्म कोठे व कधी झाला ?
Ans.इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी अलाहाबाद येथे झाला.
Q.2) इंदिरा गांधींच्या आई वडिलांचे नाव काय आहे?
Ans.कमला नेहरू व पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांचे आईवडील होते.
Q.3) इंदिरा गांधी यांचा विवाह कोणाशी झाला?
Ans.मार्च 1942 मध्ये त्यांचा विवाह फिरोज गांधी यांच्याशी झाला.
Q.4) भारताच्या पाहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या?
Ans.इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान आहेत.